ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार करणारा डुप्लिकेट विराट कोहली कोण आहे माहीती आहे का?

निवडणूक म्हणलं की मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार हा महत्वाचा असतो. प्रचार चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी उमेदवार विविध प्रकारे नवनवीन संकल्पना वापरून प्रयत्न करत असतो. निवडणुकीच्या मैदानात उभं राहिल्यानंतर मतदारांना कसं अपल्याकडे आकर्षित करता येईल यावर उमेदवार भर देतात. ग्रामीण भागात प्रचार करण्यासाठी सेलेब्रिटीना बोलावण्याचे खूप आकर्षण असते. मोठमोठे सेलेब्रिटी प्रचारासाठी बोलावले जातात. सेलेब्रिटी ठीक आहे पण विराट कोहली सारखा स्टार खेळाडू जर ग्रामपंचायतच्या प्रचाराला आला तर? होय पुणे जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत पॅनलच्या प्रचारासाठी चक्क विराट कोहली आला आहे. सर्व देशभरात याची मागील 2 दिवसांपासून चर्चा होत आहे. पण प्रचाराला आलेला हा कोहली चक्क विराट कोहलीचा हुबेहूब ड्युप्लिकेट आहे. पुण्यातील शिरुर तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहेत. प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या निवडणुकीतील रामलिंग ग्रामविकास पॅनलने प्रचारात आघाडी घेत विराट कोहलीला प्रचाराला आणणार असल्याचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

रामलिंग ग्रामविकास पॅनलच्या पोस्टरवर प्रचार रॅलीचं मुख्य आकर्षण म्हणून खऱ्याखुऱ्या विराट कोहलीचं नाव आणि फोटो या बॅनरवर छापण्यात आला होता. त्यामुळे सगळेच जण चक्रावून गेले होते. पण त्याची पूर्तता करत शिवलिंग पॅनलने प्रचार करण्यासाठी ज्युनिअर विराट कोहली म्हणजेच विराटच्या डुप्लिकेटला प्रचारासाठी मैदानात उतरवले आहे.

रामलिंग ग्रामविकास पॅनलचे निवडणूक चिन्ह बॅट आहे. त्यामुळे हातात बॅट घेऊन हा ड्युप्लिकेट विराट कोहली पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन करताना दिसत आहे. गावामध्ये त्याची मोठी रॅली काढण्यात आली होती.

आता, ड्युप्लिकेट विराट कोहलीच्या रोड शोला नागरिकांनी, विशेषत: तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. या विराट कोहलीला पाहण्यासाठी, त्याच्याशी हात मिळवण्यासाठी तरुणांची ठिकठिकाणी मोठी गर्दी झाली होती. त्याच्या सोबतचे सेल्फी देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कोण आहे हा डुप्लिकेट विराट कोहली?

हा डुप्लिकेट विराट कोहली देहू गावातील एक सामान्य कुटुंबातील युवक आहे. क्रिकेटची आवड असलेल्या या तरुणाचं नाव आहे सौरभ गाडे. सौरभ गाडेला क्रिकेटशिवाय गाण्याची देखील आवड आहे. त्याच्या विराट कोहली सारखं दिसण्याने त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. सौरभ गाडे आता पुणे जिल्ह्यात डुप्लिकेट विराट कोहली म्हणून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. लोकही त्याला बघण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी करत आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

प्रियाचा वरीअरचा नवीन व्हिडीओ पुन्हा गाजतोय, बघा गहजब माजवतील असे इशारे..

खास अंदाजात डोळा मारून करोडो लोकांना भुरळ घातलेल्या प्रिया वरिअरचा नवीन व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियाने डोळा मारला नसला तरी त्यामध्ये तिने केलेले इशारे गहजब माजवतील असेच आहेत. फेब्रुवारीमध्ये जेव्हा तिचा पहिला व्हिडीओ व्हायरल झाला होता तेव्हा ती रातोरात स्टार बनली होती. एका रात्रीत सेलेब्रिटी बनलेल्या प्रियाला करोडो फॅन्स भेटले. नवीन व्हिडीओ देखील फॅन्सच्या पसंतीस उतरला आहे. बघा व्हिडीओ..

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री एच डि कुमारस्वामी यांच्या बद्दल माहिती नसलेल्या १० गोष्टी..

कर्नाटकमध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात भाजपचे सरकार पडले आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. भाजप सरकार पडल्यामुळे आता कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जनता दल सेक्युलरचे एच डी कुमारस्वामी हे कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून लवकरच शपथ घेतील. खासरेवर जाणून घेऊया कुमारस्वामी यांच्याविषयी माहिती नसलेल्या 10 गोष्टी…

1. हरदनहाली येथे जन्मलेले एच डी कुमारस्वामी हे भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे पुत्र आहेत.

2. एच डी कुमारस्वामी हे राजकारणात येण्यापूर्वी नावाजलेले फिल्म निर्माते होते.

3. एच डी कुमारस्वामी यांनी फेब्रुवारी 2006 ते नोव्हेंबर 2007 मध्ये कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री पददेखील भूषवले आहे.

4. एच डी कुमारस्वामी हे कर्नाटक राज्याचे जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष आहेत.

5. कुमारस्वामीना त्यांचे कार्यकर्ते कुमारअण्णा म्हणून ओळखतात. कुमारस्वामी यांनी बंगळुरूच्या नेशनल कॉलेज मधून आपले डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

6. कुमारस्वामी यांनी 1996 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता.

7. एच डी कुमारस्वामी यांनी त्यांच्या 22 वर्षाच्या राजकिय कारकिर्दीत 9 वेळा निवडणूका लढवल्या असून त्यामध्ये 6 वेळा ते विजयी झाले आहेत.

8. यावेळी त्यांनी 2 ठिकाणावरून निवडणूक लढवली होती ज्यामध्ये चांनापाटना आणि रमनगरा मतदारसंघाचा समावेश होता. त्यांनी दोन्ही ठिकाणाहून 20-22 हजार मतांनी विजय मिळवला आहे.

9. एच डी कुमारस्वामी यांचे दोन लग्न झालेले असून त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव अनिता आणि दुसऱ्या पत्नीचे नाव राधिका आहे. राधिका या कन्नडच्या अभिनेत्री आहेत. राधिका या कुमारस्वामी यांच्यापेक्षा तब्बल 29 वर्षांनी लहान आहेत.

10. काँग्रेसचे सरकार गेल्यानंतर कुमारस्वामी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कर्नाटकचा जीडीपी सर्वोच स्थानावर होता. 2007 मध्ये भाजप सोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

पंक्चर काढणाऱ्याने कशी खरेदी केली दीड कोटींची जगुआर आणि 16 लाखाचा नंबर?

RJ 45 CG 1 हा कर्नाटकमधील सर्वात महागडा गाडीचा व्हीआयपी नंबर आहे. या नंबरच्या किमतीमध्ये एक मोठी सेदान कार येऊ शकते. पण बापाची अमाप संपत्ती म्हणल्यावर असा व्यर्थ पैसे खर्च केले तर नवल वाटत नाही. कितीही खर्च केले तर संपणार नाहीत एवढे पैसे. मग एका नंबरसाठी 16 लाख खर्च केल्याने काय फरक पडणार. हे श्रीमंतासाठी ठीक आहे, पण जर हे ज्याने केलंय तो तरुण आहे राहुल तनेजा. या नावाचा व्यक्ती गरीब असेल असं नाव ऐकून वाटणारही नाही.

राहुल तनेजाचं कुटुंब मूळचे सिहोर मध्य प्रदेशातील आहे. राहुल आपल्या बहीण भावांमध्ये सर्वात लहान आहे. त्याच्या कुटुंबात त्याच्यापेक्षा मोठे चार बहीण भाऊ आहेत. राहुलचे वडील पंक्चर काढण्याचे काम करायचे. राहुलही त्यांना या कामात मदत करायचा. त्यालाही पुढे हेच करायचे आहे हे तो ओळखून होता.

पण राहुल तनेजा काही तरी मोठं करायचं या उद्देशाने मोठं शहर असलेल्या जयपूरला आला. इथे आल्यानंतर अनेक छोटेमोठे काम केले. सोबतच आपला अभ्यासही त्याने सुरू ठेवला. त्याने सुरवातीला पतंग विकले, धाब्यावर जेवण सर्व करायचं काम केलं, पेपर वाटले, होळीला रंग विकला तर दिवाळीला फटाक्यांचे स्टॉल लावले. पण काम छोटं मोठं समजणे हे आपल्यावर निर्भर असते. पण कोणतच काम हे छोटं मोठं नसतं.

राहुलने परीक्षा चांगल्या मार्कने पास केल्या. फक्त अभ्यासावर लक्ष ने देता त्याने सोबत मॉडेलिंग मध्ये सुद्धा आपलं नशीब अजमावलं. यातून यश मिळायला सुरुवात साली आणि पुढे त्याने लाईव्ह क्रिएशन्स नावाची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. त्याने एवढं यश मिळवलं की त्याच्याकडे आता मध्य प्रदेशातील सर्वात महाग नंबर असलेली कार आहे. राहुलकडे 3 महागड्या कार आहेत. त्याने जगुआर गाडीच्या नंबरसाठी तब्बल 16 लाख रुपये मोजले आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

कधी काळी धोनी राहायचा या जुन्या घरात, पाहा इंडियन क्रिकेटर्सची जुनी आणि नवीन घरे..

भारतीय क्रिकेटर आज आपल्या स्टायलिश लाइफस्टाइल साठी ओळखले जातात. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी तर कमाईचा बाबतीत खूप पुढे गेले आहेत. आज धोनी कोहली सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सपैकी एक आहेत. क्रिकेटशिवाय धोनी जाहिरातीमधूनही करोडो रूपये कमवतो. धोनीने 2016 साली आपल्या बायोपिकद्वारेच 60 कोटी रूपयांची कमाई केली होती. त्याच्या या फिल्ममध्ये त्याची पूर्वीचे सामान्य आयुष्य, त्याचे साधे घर आणि ते क्रिकेट ग्राउंड दाखविले गेले. जेथून धोनीचा प्रवास सुरु केला. कधी काळी म्हणजे अगदी 10 वर्षापूर्वीपर्यंत धोनी छोट्याशा सरकारी क्वार्टरमध्ये राहत होता.

आज सर्व क्रिकेटर यशस्वी बनले असले तरी ते एका हलाखीच्या परिस्थितीचा सामना करून इथपर्यंत आलेले आहेत. कोट्याधीश बनलेल्या काही क्रिकेटपटूंचे जुने आणि नवीन घर बघूया व्हिडीओ मधून..

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

कर्नाटकचे संभाव्य मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची पत्नी तुम्ही बघितली का?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच बघायला मिळाली. काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला तर भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापन करण्याची संधी द्यावी अशी मागणी राज्यपाल यांच्याकडे केली होती. राज्यपालांनी ही मागणी मान्य करत आज बीएस येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. जेडीएस कडून मुख्यमंत्री पदासाठी एच डी कुमारस्वामी हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. कुमारस्वामी यांची संभाव्य मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांच्याबद्दल व8विविध माहिती आणि फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये त्यांच्या पत्नीसोबतचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. कोण आहेत एच डी कुमारस्वामी यांच्या पत्नी जाणून घेऊया खासरेवर..

हरदनहाली मध्ये जन्मलेले एच डी कुमारस्वामी हे भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे चिरंजीव आहेत. तसेच ते जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष आहेत. कुमारस्वामी यांचे दोन लग्न झालेले असून त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव अनिता आहे. अनिता आणि कुमारस्वामी यांना निखिल नावाचा मुलगा आहे जो कन्नड फिल्म स्टार आहे.

कुमारस्वामी यांचे ज्या पत्नीसोबत फोटो व्हायरल झाले आहेत त्या त्यांच्यापेक्षा 29 वर्षांनी लहान आहेत. कुमारस्वामी यांनी 2006 मध्ये कन्नड अभिनेत्री राधिका सोबत दुसरं लग्न केलं होतं.

राधिकाने आपल्या अभिनयास सुरुवात 2002 साली कन्नड सिनेमा नीला मेघा शामा मधून केली. तेव्हा ती फक्त 9 वी पास झाली होती. 2000 च्या सुरुवातीला राधिका कन्नड फिल्म इंडस्ट्री मधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. राधिका ही अभिनेत्री सोबत प्रोड्युसर देखील आहे. राधिका आणि कुमारस्वामी यांचा विवाह कातील मधील दुर्गा परमेश्वरी मंदिरात 26 नोव्हेंबर 2000 ला झाला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

सुनील शेट्टींची संपत्ती बघून तुम्ही थक्क व्हाल, दुसरे अंबानीच आहेत सुनील शेट्टी..

जर तुम्हाला वाटत असेल की सुनील शेट्टी यांच्याकडे कुठलंच काम नाही,त्यांना सध्या कुठला चित्रपटही भेटत नाही म्हणून ते बाकीच्या अभिनेत्यापेक्षा कमी पैसे कमावतात. अस जर वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात !

खरं तर अस काही नाही सुनील शेट्टी यांच्याकडे एवढे पैसे आहेत की त्यांना दुसरा अंबानी म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. चला तर खासरेवर बघूया सुनील शेट्टी यांच्याकडे किती संपत्ती आहे आणि ती कुठून येते.

सुनील शेट्टी यांनी भारताचा अरनॉल्ड म्हंटल जात. त्यांचा अभिनय बाकीच्या अभिनेत्यापेक्षा वेगळा आहे. सुनील शेट्टी ने धाडकन, टक्कर, गोपी-किशन आणि मोहरा सारखे हिट सिनेमे दिलेत. त्यांनी जवळजवळ ११० चित्रपट केले आहेत. त्यांचं आजघडीला ५६ वय आहे. या व्यतिरिक्त त्यांनी मल्याळम, तामिळ आणि इंग्रजी चित्रपटात सुद्धा काम केलं आहे.

कधीकाळी त्यांचे वडील प्लेटा धुण्याच काम करत होते

एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांचे वडील रेस्टॉरंट मध्ये प्लेटा साफ करण्याचं काम करत होते. आणि ज्या रेस्टॉरंटमध्ये त्यांचे वडील काम करत होते तेच रेस्टॉरंट सुनील शेट्टी यांनी २०१३ मध्ये विकत घेतले. हॉटेलच्या उदघाटन प्रसंगी त्यांनी सांगितलं होतं की, इथेच माझे काम करत होते.

बघा किती मोठा आहे त्यांचा व्यवसाय

पण ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत आहे की, ते एक चांगल्या अभिनेत्या व्यतिरिक्त एक यशस्वी उद्योगपती सुद्धा आहेत. व्यवसाया व्यतिरिक्त त्यांनी खेळांमधून सुद्धा बरेच पैसे कमावले आहेत. याचबरोबर त्यांनी सामाजिक काम सुद्धा करतात. आज जरी सुनील शेट्टी यांना कमी चित्रपट मिळतात पण ते दरवर्षी १०० कोटींपेक्षा जास्त कमावतात. सुनील शेट्टी रेस्टॉरंट व्यतिरिक्त पॉपकॉर्न एंटरटेनमेंट हे प्रोडक्शन हाऊस सुद्धा चालवतात.

खेळांना प्रोत्साहन देतात सुनील शेट्टी

चित्रपटांपासून दूर असलेले सुनील शेट्टी यांनी खेळावर आपल लक्ष केंद्रित केलं आहे.दुसऱ्या फिल्म स्टार्स सोबतच त्यांनी सुद्धा सेलिब्रेटी क्रिकेट लीग ची टीम विकत घेतली आहे आणि तेच स्वतः कॅप्टन आहेत.सुनील शेट्टी रेस्टॉरंट आणि प्रोडक्शन हाऊस व्यतिरिक्त बरेच व्यवसाय आहेत.सुनील शेट्टींनी बॉलिवूड बिझनेस कल्चरला एक नवीन रूप दिल आहे.त्यांच्याकडे बघून बऱ्याच सेलिब्रेटीनी स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

फेसबुकवर आहेत सेलिब्रिटी पेक्षाहि जास्त फॅन, बघा पप्प्या गायकवाड व्हिडीओ बायोग्राफी खासरे वर

पप्पु गायकवाड वय २३ वर्ष शिक्षण: BCA या नावाने त्याला कोणीच ओळखणार नाही. फेसबुकवर एक वेगळ जग आहे बऱ्याच लोकांना याबाबत माहिती नाही. या जगाचा सर्व खेळ चालतो फोटो आणि लाईकवर तुम्ही नेहमी बघत असाल कि स्टेस्टस येतात भावांनो फोटो सोडलाय धूर करा, राडा करा, कमेंट ब्लॉक करा या जगाचा बादशाह पप्या गायकवाड हा आहे. तब्बल ९ लाख लोक पप्याला फेसबुकवर फॉलो करतात. एका सामान्य कुटुंबातील व खेड्यातील मुलगा एवढा प्रसिद्ध कसा झाला ? हा प्रश्न सहाजिकच तुम्हाला पडणारा आहे.

‘लागीर झालं जी’ मालिकेत महत्वाची भूमिका असलेल्या या अभिनेत्रीचा जोडीदार तुम्ही बघितला आहे का?

झी मराठीवर मागील वर्षी 1 मेला सुरू झालेल्या लागीर झालं जी या मालिकेने आता प्रसिद्धीचे शिखर गाठले आहे. या मालिकेने आता मराठी रसिकांच्या मनावर चांगलीच पकड बनवली आहे. फौजींसाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील एका फौजीची लव्हस्टोरी मांडण्यात आली आहे. मुख्य पाट असलेले अजिंक्य आणि शीतल आज प्रेक्षकांना खूप आवडतात. महत्वाचे म्हणजे ही मालिका बनवताना सर्व नवोदित कलाकारांची निवड निर्मात्यांनी केली होती. अजिंक्यची भूमिका निभावणारा नितीश चव्हाण आणि शितली म्हणजेच शिवानी बावकर यांनी सुद्धा आपल्या अभिनयाची छाप पाडत या मालिकेत रंगत आणली.

नुकतेच 1 मे ला या मालिकेला एक वर्ष पूर्ण झाले. या मालिकेची निर्मिती श्वेता शिंदे या मराठी अभिनेत्रीनर केलेली आहे. लागीर झालं जी मधील सर्वच पात्र लोकांना प्रचंड आवडतात. आणि महत्वाचे म्हणजे ही मालिका सांगली जिल्ह्यात फक्त शूटच करण्यात आली असे नाही. या मालिकेत अभिनय करत असलेले जास्तीत जास्त कलाकार सांगली आणि सातारा जिल्ह्यातील आहेत. मालिकेतील अज्या अन विक्या हे देखील मूळचे साताऱ्याचे आहेत. पण या कलाकारांना निवडण्यामागे अजून एक महत्वाची बाब म्हणजे मालिकेची निर्माती श्वेता शिंदे या देखील साताऱ्याच्या आहेत.

कोण आहेत श्वेता शिंदे?

श्वेता शिंदे यांनी मराठी मालिकांमध्ये आणि चित्रपटात सुद्धा काम केलेले आहे. त्यांची स्टार प्रवाहवरील लक्ष्य ही मालिका खूप गाजली होती. याशिवाय काटा रुते कुणाला, चार दिवस सासूचे, अवघाची संसार या मालिकांमध्ये आणि इश्य लाडी गोडी, अधांतरी या चित्रपटात काम केले आहे.

श्वेता शिंदे यांनी एका हिंदी कलाकाराशी लग्न केलेले आहे. वह रहने वाली मेहलोन की या मालिकेतील खास भूमिकेमुळे शिल्पाचे पती चांगलेच चर्चेत आले. संदीप भन्साळी असे तिच्या पतीचे नाव असून ते एका मालिकेदरम्यान श्वेताला भेटले होते. 2008 साली या दोघांचं लग्न पुण्यातच झाले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

सैराट मधील परशाचे करमाळ्यातील घर बघुन तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल..

नागराज मंजुळेंनी दिग्दर्शित केलेल्या व मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक ठरलेल्या ‘सैराट’ या सिनेमामध्ये आकाशने ठोसरने परश्या (प्रशांत काळे)ची भूमिका साकारली होती. आकाशने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या या त्याच्या पहिल्या चित्रपटाने एका रात्रीत त्याला एक सामान्य मुलगा ते स्टार बनवलं. एका रात्रीत सैराट चित्रपटामुळे सेलेब्रिटी ठरलेला लाडका परशा उर्फ आकाश ठोसर अतिशय सामान्य कुटुंबात वाढला असून आकाश मुळचा पुण्याच्या औंध येथील रहिवाशी आहे. आकाशच्या घरची परिस्थिती खूप साधारण असून त्याचे वडील गवंडीकाम करतात. आकाश आता एक सेलेब्रिटी म्हणून लाइफ जगत आहे.

आकाशचे करमाळा येथे एक घर आहे. जे बघून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तुम्ही हे घर पाहून म्हणाल कि सेलेब्रिटीचं असं घर शक्य नाही. पण हे सत्य आहे. बघा आकाशच्या घराचा व्हिडिओ..