सलमान खानच्या रेस-3 ने तीन दिवसात किती पैसे कमावले? आकडा बघून थक्क व्हाल..

सलमान खानचा ‘रेस 3’ सिनेमा रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत. सलमान खानचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुक्ता होती कारण ईदच्या दिवशी रिलीज होणार सलमानचा प्रत्येक चित्रपट चांगलीच कमाई करतो. पण रेस-3 कडून प्रेक्षकांना ज्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. सिनेमा रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर रेस-3 आणि सलमान खानला ट्रोल करत नेटिझन्सनी चित्रपट चांगला नसल्याची टीका केली होती.

चित्रपटाबद्दल चांगले रिव्ह्यु आले नव्हते त्यामुळे फ्लॉप होईल का असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण सलमान खानचा चित्रपट फ्लॉप होणे अशक्य असल्याचे दिसत आहे. कारण चार दिवस झाले हा चित्रपट सर्वत्र हाऊसफुल्ल आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 29 कोटींचा गल्ला कामावल्यानंतर नंतर कमी होईल अशी मागणी शक्यता होती. पण आता सलमानच्या रेस-3 ने 3 दिवसात किती कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहे.

हिट चित्रपटांची परंपरा कायम ठेवत सलमानच्या ‘रेस 3’ने तीनच दिवसात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. ही कमाई तेव्हा झाली आहे जेव्हा या चित्रपटाबद्दल निगेटिव्ह रिव्ह्यू देण्यात येत होते.

सलमान खानसारख्या सुपरस्टारला 100 कोटी क्लबमध्ये सामिल होणे काही मोठी गोष्ट नाही हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. याअगोदरही सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’, ‘सुल्तान’ आणि ‘एक था टाइगर’ या चित्रपटाने 3 दिवसांत 100 कोटींची कमाई केली. रेस 3 चित्रपटाने पहिल्याच दिवशी 29 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘रेस 3’ कमी वेळात सर्वात जास्त कमाई करणारा 2018 सालचा पहिला चित्रपट ठरला आहे.

ट्रेड रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी या चित्रपटाने 38.14 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी रविवारीसुध्या चित्रपटाने 39 कोटींची कमाई केली. असे करत वीकेंडला सलमानने 105 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. चित्रपटाचे बजेट 150 कोटी आहे आणि अशीच कमाई सुरु राहिली तर येत्या तीन दिवसात चित्रपट 200 कोटींचा पल्ला गाठणार हे नक्की. रेस 3 चित्रपटात सलमान खानशिवाय बॉबी देओल, अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडिस, साकिब सलीम आणि डेजी शाह आहेत. हा चित्रपट जगभरात 4000 स्क्रिनवर रिलीज करण्यात आला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

TVS कडून सामान्यांची कशी केली जाते फसवणूक वाचा एका ग्राहकाला आलेला अनुभव महत्वपूर्ण माहिती

नमस्कार,
आज मी तुमाला खूप महत्त्वाची माहिती देउ इच्छितो. मी 20 मार्च 2018 ला TVS Ntorque125 हि गाडी कळमकर TVS मोटर्स हडपसर पुणे मधून विकत घेतली. गाडी चे दोन servecing पूर्ण झालेत. गाडी चे running आतापर्यंत 2367km झाले आहे. अचानक 30 मे ला माझी गाडी जेव्हा मी चालू करायला गेलो तेव्हा ती चालू झाली नाही. म्हणून मी showroom ला phone केला. त्यांनी माझी गाडी shoroom मध्ये नेली. त्यादिवशी त्यांनी मला battery मध्ये problem असेल असे सांगितलं. पण दुसऱ्या दिवशी मी जेव्हा showroom ला गेलो तेव्हा मला त्यांनी सांगितलं कि compresser किंवा magnet मध्ये problem आहे.

असे तीन दिवस मला वेगवेगळे problem सांगितले. तिसऱ्या दिवशी मी showroom भेट दिली तर बघतो काय माझी गाडी पूर्ण disassemble केली होती. अगदी engine सुद्धा खोलले होते.सगळे part खोलून ठेवले आहेत. तेही मला न सांगता. मी त्यांना विचारले तर त्यांनी मला नवीन problem सांगितला कि valve खराब झाले. Head assembly बदलावी लागेल. मला एकच प्रश्न पडला कि दोन महिन्यात गाडीचे engine खोलावे लागते तेही सगळे primery precaustion घेऊन. म्हणून मी त्यांना म्हणालो कि मला गाडी repalce करून पाहिजे. त्यांनी सरळ नकार दिला. ते म्हणाले कि आहे हीच गाडी repair करून देउ शकतो. पण तुमीच पहा दोन महिन्यात जी गाडी खोलावी लागते ती गाडी defected असणार ना मग आपण कशी ती गाडी घेऊ शकतो. Showroom वाल्यानी आमचे ऐकलं नाही म्हणून आम्ही TVS Motor सर्विस station ला संपर्क केला पण त्यांनी पण आम्हाला अपेक्षित अशी मदत केली नाही.

आता आमच्याकडे कोणता पर्याय राहिला नाही म्हणून आम्ही हा पर्याय निवडला. जनजागुर्ती. आम्हाला ते काय गाडी बदलून देणार नाहीत. पण अजून दुसऱ्या कोणावर हा अन्याय होउ नये म्हणून मी हि माहिती share केली. हि माहिती आम्ही share करू नये म्हणून आमच्यावर त्यांनी दबाव टाकला. आपण सेटलमेंट करू अशी भाषा वापरली. पण आम्हाला जे आमच्याबरोबर झालं ते दुसऱ्या बरोबर होउ द्यायचे नाही. आम्हाला तुम्हा सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. आम्हाला योग्य तो न्याय मिळावा यासाठी तुमची साथ हवी आहे.

हि माहिती जास्तीत जास्त share करा जेनेकी कोणावर आमच्या सारखी वेळ येऊ नये. आणि इथून पुढे TVS कंपनी च्या गाडी घेताना जरा विचार करून घ्या. असे faulty गाडी देऊन customer ची फसवणूक केली जात आहे. TVS ची service चांगली नाही.
-रोहित गोडसे

अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी जिंकल्यानंतर अजिंक्य रहाणेने जे केले त्याची जगभरात होतेय चर्चा..

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत दमदार सुरुवातीनंतरही भारताचा पहिला डाव 474 धावांवर आटोपला. या कसोटीत भारताच्या शिखर धवन आणि मुरली विजय यांनी दमदार 168 धावांची सलामी दिली होती. धवनने तर पहिल्या दिवसाच्या उपहारापूर्वीच शतक ठोकलं होतं. त्यामुळे भारत अफगाणिस्तानविरुद्ध धावांचा डोंगर उभा करेल अशी अपेक्षा होती. मात्र मधली फळी ढेपाळल्यामुळे भारताला 500 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारताकडून शिखर धवन (107), मुरली विजय (105) यांनी शतकं झळकावली. तर हार्दिक पंड्या (71), के एल राहुल 54 यांनी अर्धशतकं ठोकली.

दुसऱ्याच दिवशी अफगाणिस्तान संघाला दोन वेळा ऑल ऑऊट अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियाने बंगळुरु कसोटीत अफगाणिस्तावर विक्रमी विजय साजरा केला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजाच्या फिरकीच्या जोरावर अफगाणिस्तानं अक्षरश: लोटांगण घातलं. बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच भारतानं अफगाणिस्तानचा एक डाव आणि 262 धावांनी धुव्वा उडवत विक्रमी विजय साजरा केला.

पण सामना जिंकल्यानंतर कर्णधार राहणेनं पहिलीच कसोटी खेळणाऱ्या अफगाणिस्तानला टीम इंडियाच्या विजयी जल्लोषात सामील करुन घेत खेळभावनेचं अनोखं दर्शन घडवलं. त्याच्या या खेळभावनेचे संपूर्ण क्रिकेट विश्वात कौतुक होत आहे. टीम इंडियाचं विजयी करंडकासह फोटो सेशन सुरु असतानाच रहाणेनं अफगाणिस्तानच्या खेळाडूंना पुढे येण्याची विनंती केली. त्यानंतर दोन्ही संघांनी कॅमेरासमोर एकत्रित पोझ दिली. त्यामुळे भारतानं हा सामना तर जिंकलाच पण खिलाडूवृत्तीमुळे अफगाणी खेळाडूंबरोबरच तमाम क्रिकेटरसिकांची मनंही जिंकली.

भारतानं अफगाणिस्तानचा पहिला डाव 109 धावांत गुंडाळला. 365 धावांची भली मोठी आघाडी मिळाल्यानंतर टीम इंडियानं अफगाणिस्तानवर फॉलोऑन लादला. पण फॉलोऑननंतर अफगाणिस्तान दुसरा डाव 103 धावांत आटोपला.

एकाच दिवसात दोनवेळा ऑल ऑऊट करण्याची कामगिरी टीम इंडियाने केली. भारताकडून रविंद्र जाडेजानं दोन्ही डावांत मिळून सहा तर अश्विननं पाच फलंदाजांना माघारी धाडलं. 2 दिवसात कसोटी सामना जिंकण्याची कामगिरी करणारी टीम इंडिया आशिया खंडातील पहिलीच टीम ठरली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

हनीमूनला नेमकं कुठं जायचं? हनीमूनसाठी भारतातील 5 सर्वात रोमॅंटिक डेस्टिनेशन

सध्या लग्नाचा सिजन चालू झालाय. लग्न म्हंटलं की अगोदरच्या खरेदीपासून ते लग्न झाल्यानंतर हनिमूनला कुठे जायचे या प्रश्नांवर अनेक जण विचारात पडतात. लग्न झाल्या झाल्या नव्या जोडप्यासह सर्वांनाच हनीमूनची उत्सुकता असते. प्रत्येक जोडप्याच्या मनात आपल्या हनीमूनबद्दल अनेक इच्छा आकांक्षा असतात. लग्नाच्या आधीपासूनच बरेच जण स्पेशल जागेचा शोध घेणं सुरु करतात. पण अनेक दिवस ठिकाणच फायनल होत नाही. त्यामुळे हनीमूनला नेमकं कुठं जायचं? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तशी तर प्रत्येकालाच हनीमूनसाठी परदेशात जाण्याची इच्छा असते. पण सर्वसामान्य कपल्सना ते शक्य होत नाही. त्यामुळे आज आपण भारतातील असे 5 ठिकाणं जाणून घेणार आहोत हे हनिमूनसाठी खूप रोमँटिक आहेत.

5.अलप्पुझा

केरळमधील हे ठिकान कपल्ससाठी एक उत्तम पर्याय आहे
दिवसभर चालणा-या या हाऊसबोटवर तुम्हाला हॉटेलच्या रूमसारखी सेवा मिळेल. इथे कपल्स पाण्यात आपला दिवस घालवू शकतात. ही बोट जंगलात तयार झालेल्या कॅनोलमधून जाते. ज्यामुळे कपल्स निसर्गाचा अगदी जवळून आनंद घेऊ शकतात. यासोबत इथे असलेले हेरिटेज मेंशन आणि वेअर हाऊस या ठिकाणाला परफेक्ट डेस्टिनेशन बनवतात.

4.लडाख

हे ठिकाण नेहमीच प्रत्येकासाठी आकर्षण राहिलं आहे. नवीन लग्न झालेले बहुतांश कपल्स येथे हनिमून साठी जाणे पसंत करतात. या ठिकाणाला लॅंड ऑफ लामा आणि लिटील तिब्बत म्हणूनही ओळखले जाते. येथील डोंगरातील रस्ते, द-या तुमच्यातील उत्साह जागा करतील. येथे जाण्यासाठी एक समस्या म्हणजे आरोग्याची समस्या असलेल्या लोकांना इथे येण्याआधी हेल्थ चेकअप करणे गरजेचे आहे. कारण इथे उंच डोंगरात श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

3.कसौनी

भारताची राजधानी दिल्लीजवळ असलेलं कसौनी सर्वात लोकप्रिय हनीमून डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. उत्तराखंडमधील ही जागा हनीमूनसाठी देशभरात चांगलीच लोकप्रिय बनली आहे. नैनीताल आणि अल्मोडा जाणा-या कपल्सनी इथे नक्की जावं.

2.मनाली

मनालीला हनिमून डेस्टिनेशन म्हणून कोण नाही ओळखत. अगदी सर्वसामान्य व्यक्तींना सुद्धा उआ ठिकाणाची बऱ्यापैकी माहिती असते. हे ठिकाण भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हिमाचलमधील मनालीत प्रत्येक सीझनमध्ये जबरदस्त वातावरणाचा आनंद तुम्हाला घेता येऊ शकतो. हनीमूनसाठी ही जागा सर्वात चांगला पर्याय ठरू शकते. या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे बर्फांच्या डोंगरातून निघणारी नदी. ही नदी या जागेला अतिशय सुंदर बनवते. यासोबतच इथे राफ्टिंगसोबत ट्रेकिंग आणि स्कीईंगचाही आनंद घेता येईल.

1.शिमला

भारतीयांसाठी हनीमूनसाठी शिमला नॉर्थ इंडियातील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. शिमलाला क्वीन ऑफ हिल्स या नावानेही ओळखलं जातं. येथील बर्फांचे डोंगर आणि शांत वातावरण या जागेला परफेक्ट हनीमून डेस्टिनेशन बनवण्यासाठी पुरेषे आहेत. यासोबतच स्कीईंग आणि स्केटींगचाही आनंद घेता येतो. इथे कोणत्याही वातावरणात तुम्ही जाऊ शकता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

संजय दत्तने सांगितलेल्या 308 गर्लफ्रेंड च्या यादीत आहेत या सहा सुप्रसिद्ध अभिनेत्री, नावं ऐकून थक्क व्हाल..

सध्या संजय दत्तची बायोपीक असलेल्या संजू या सिनेमाची सर्वत्र मोठया प्रमाणावर चर्चा चालू आहे. सिनेमाचे टीजर लॉन्च झाल्यापासूनच लोकांच्या मनात सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. सिनेमाच्या ट्रेलरने काही दिवसातच करोडो व्युजचा टप्पा ओलांडला आहे. या सिनेमात संजय दत्तची भूमिका अभिनेता रणबीर कपूरने निभावली आहे. रणबीर कपूरने ज्याप्रकारे सिनेमात ही भूमिका निभावलेली दिसत आहे त्यावरून त्याची खूप चर्चा आणि प्रशंसा होताना दिसत आहे. हा सिनेमा कधी एकदाचा रिलीज होतो या प्रतीक्षा प्रेक्षकांना आहे. या सिनेमात संजय दत्तच्या आयुष्यातील सर्व उतार चढाव खूप चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आले आहेत.

हा सिनेमा या महिन्याच्या शेवटी 29 तारखेला रिलीज होईल. या सिनेमात बऱ्याच कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. सिनेमात रणबीर व्यतिरिक्त विक्की कौशल, परेश रावल, अनुष्का शर्मा, दिया मिर्जा, सोनम कपूर, मनीषा कोईराला, जिम तर्थ आणि करिष्मा तन्ना यांच्या भूमिका आहेत. या सिनेमाच्या ट्रेलर मध्ये दाखवण्यात आले आहे की संजय दत्तच्या आयुष्यात तब्बल 308 गर्लफ्रेंड होत्या. पण तुम्हाला धक्का बसेल की या लिस्टमध्ये बॉलीवूडच्या काही प्रसिद्ध अभिनेत्रीचे नावे देखील आहेत. बघूया कोण आहेत या अभिनेत्री.

1 टीना मुनीम-

एकेकाळी संजय दत्त टीना मुनीमवर खूप प्रेम करायचा. दोघांच्या नात्याची सुरुवात रॉकी सिनेमापासून झाली होती. त्यावेळी दोघांनी लग्न केल्याच्या पम बातम्या आल्या होत्या. पण संजय दत्तच्या व्यसनाला कंटाळून टिनाने ब्रेकअप केले.

2. ऋचा शर्मा-

संजय दत्त आणि ऋचा शर्मा आग ही आग या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान भेटले होते. काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. दोघांची एक मूलगी पण झाली जीचे नाव त्रिखला ठेवण्यात आले. पण काही काळानंतर दोघांनी तलाक घेतला आणि ऋचाचं ब्रेन कॅन्सरने निधन झालं.

3. माधुरी दीक्षित-

माधुरी दीक्षित आणि संजय दत्तच्या प्रेमाचे किस्से खूप प्रसिद्ध आहेत. साजन सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली. दोघांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला. पन माधुरीच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हते. कारण संजय दत्तचे अगोदर लग्न झालेले होते. नंतर मुंबई बॉम्बस्फोटात नाव आल्यानंतर माधुरीने स्वतःला दूर करण्यास सुरू केले.

4. रिया पिल्लई-

माधुरी सोबत नातं तुटल्यानंतर संजय प्रसिद्ध मॉडेल रिया पिल्लईच्या प्रेमात पडला. दोघांनी 1998 मध्ये लग्न केले. पण लग्नानंतर संजयचे अनेक जणांशी असलेले अफेअर दोघांमध्ये कटुता निर्माण करणारे ठरले आणि दोघांनी 2005 मध्ये तलाक घेतला.

5. लीजा रे-

मुंबई बॉम्बस्फोट मध्ये नाव आल्यानंतर लीजा सोबतच्या नात्याची बातमी बाहेर आली. पत्नी ऋचाच्या मृत्यूनंतर संजयला लीजाने धीर दिला. पण काही कारणाने त्यांचं पण नातं जास्त काळ टिकलं नाही.

6. रेखा-

एकेकाळची प्रसिध्द अभिनेत्री रेखा संजय दत्त सोबत रिलेशनशिप मध्ये होती. जमीन आसमा सिनेमाच्या दरम्यान दोघांचं प्रेम सर्वांसमोर आलं. दोघांना अनेकदा काही खाजगी कार्यक्रमात एकत्र पाहिल्यानंतर दोघांनी लग्न केल्याच्या चर्चा देखील होत्या. पण असे काही नव्हते आणि दोघांचं नातं लवकरच संपुष्टात आले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

सैराटचा हिंदी रिमेक “धडक” एका दिवसात २ करोड पेक्षाही जास्त लोकांनी बघितला व्हिडीओ

नागराज मंजुळेच्या गाजलेल्या ‘सैराट’चा ‘धडक’ हा अधिकृत हिंदी रिमेक आहे. त्यामुळे या सिनेमाच्या ट्रेलरची सगळ्यांना खूपच उत्सुकता होती. या चित्रपटात जान्हवी कपूर पार्थवी अर्थात ‘आर्ची’च्या पात्रात तर इशान खट्टर मधुकर म्हणजेच ‘परश्या’च्या भूमिकेत दिसणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्स, झी स्टुडिओ, हिरू यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असलेल्या धडक सिनेमाच्या शूटिंगला डिसेंबरमध्ये सुरुवात झाली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खैतान यांनी या ट्रेलरबाबत ट्विटरवर म्हटलं आहे की – “या क्षणाला मी स्वत: खूप उत्सुक आहे, पण सोबतच मी नर्व्हसही आहे. जान्हवी आणि ईशान यांनाही अशीच उत्सुकता वाटत असेल याची मला खात्री आहे.”

भैय्यूजी महाराज यांच्या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पानात धक्कादायक खुलासा, कुटुंबाच्या नावावर नाही केली संपत्ती..

आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी काल डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मृत्यूपूर्वी त्यांनी इंग्रजी भाषेत सुसाईड नोट लिहिली होती. सुसाईड नोट सापडली असून, आपल्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार न धरण्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. भैय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येच्या सुसाईड नोट बाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे त्यांच्या सुसाईडचे दुसरे पान ज्यात त्यांनी महत्वाची गोष्ट मांडली आहे.

पोलिसांना भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केलेल्या खोलीमध्ये एक सुसाईड नोट सापडली होती . पोलिसांना सापडलेली सुसाइड नोट इंग्रजीत लिहिलेली होती. आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे तणाव निर्माण झालेले आहेत. ते सहन होत नाही, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे भय्यूजी महाराजांनी लिहिले होते. आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नका असेही त्यांनी चिठ्ठीत लिहिलेले आहे. हे चिठ्ठी चे पहिले पान होते त्यांनतर च्या दुसऱ्या पानात त्यांनी महत्वपूर्ण गोष्ट मांडली आहे.

त्यांनी आपले सर्व अधिकार आर्थिक जबाबदाऱ्या आश्रम व संपत्तीचे अधिकार त्यांनी आपला विश्वासू विनायक याच्या ताब्यात देण्याची सूचना केली आहे.त्यांनी लिहिले आहे कि ते विनायक वर विश्वास करतात त्यामुळे त्याला सर्व अधिकार देत आहे. विनायक हा १५ वर्षांपासून भैय्यूजी महाराज यांच्यासोबत आहे. विनायक हा मूळचा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील आहे. विनायक नेहमी भय्यू महाराजांसोबतच असे. भय्यू महाराजांच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत विनायक सहभागी असे. त्यांच्या दुसऱ्या पानांमुळे एक गोष्ट समोर आली कि त्यांनी आपल्या कुटुंबातील कोणाला उत्तराधिकारी नेमले नाही याचा अर्थ कौटुंबीक कलह हा मोठ्या प्रमाणावर वाढला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

भैय्यूजी महाराज यांनी का केली आत्महत्या ?? सुसाईड नोट मध्ये काय सांगितले वाचा?

पोलिसांना भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केलेल्या खोलीमध्ये एक सुसाईड नोट सापडले आहे. पोलिसांना सापडलेली सुसाइड नोट इंग्रजीत लिहिलेली होती. आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे तणाव निर्माण झालेले आहेत. ते सहन होत नाही, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे भय्यूजी महाराजांनी लिहिले होते. आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नका असेही त्यांनी चिठ्ठीत लिहिलेले आहे.

भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलबाहेर गर्दी केली. मध्यप्रदेश सरकारने काही महिन्यांपूर्वी त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता. भैय्यूजी महाराज यांच्या आत्महत्ये मागे घरगुती कारण आहे असे मध्यप्रदेश मधील स्थानिक न्यूज पेपर दैनिक भास्कर ने न्यूज दिली आहे कि त्यांची दुसरी पत्नी व मुलगी यांच्यात संपत्तीवरून वाद सुरु होते त्याचा तणाव त्यांना होता. आत्महत्या पूर्वी पण मुलगी आणि दुसरी पत्नी यांच्यात कुर कुर झाली होती तेव्हा त्यांनी स्वतःला एका रूम मध्ये बंद केले होते आणि तिथेच त्यांनी आत्महत्या केली.

थोडक्यात जाणून घ्या भैय्यूजी महाराज बद्दल: भय्यूजी महाराजांचा जन्म 1968 मध्ये मध्यप्रदेशात झाला होता. मध्यप्रदेशातील शुजालपूर येथील जमीनदार कुटुंबातील ते होते. त्यांचे मुळ नाव उदयसिंह देशमुख होते.कधीकाळी त्यांनी एका कपड्याच्या ब्रँडसाठी मॉडलिंग केले होते. त्यानंतर मुंबईत नोकरीही केली होती. नोकरीचा राजीनामा देऊन भय्यूजी महाराज यांनी सदगुरु दत्त धार्मिक ट्रस्टची स्थापना केली होती. या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक काम सुरु होते. इंदूरमधील बापट चौकात त्यांचा आश्रम आणि ट्रस्ट आहे. येथूनच त्यांचे सामाजिक कार्य चालत होते.भय्यूजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे नाव माधवी निंबाळकर होते, त्यांचे माहेर मराठवाड्यातील होते. माधवी यांच्या निधनानंतर भय्यूजी महाराज यांनी 30 एप्रिल 2017 रोजी ग्वाल्हेर येथील डॉ. आयुषी शर्मासोबत दुसरे लग्न केले होते. पत्नी आयुषी सोबत ते आश्रमात राहात होते. पहिली पत्नी माधवीपासून त्यांना कुहू नावाची मुलगी आहे. ती सध्या पुण्यात शिक्षण घेत आहे.

FacebookTwitterGoogle+EmailWhatsAppShare

दिल्ली कोठा नंबर ६४ छुप्या कॅमेरातून नक्की बघा हा व्हिडीओ

चरितार्थासाठी तसेच अधिक धनाच्या वा मौल्यवान वस्तूंच्या मोबदल्यात प्रस्थापित झालेले दोन परक्या व्यक्तींमधील लैंगिक संबंध म्हणजे वेश्यावृत्ती वा वेश्याव्यवसाय, असे स्थूलमानाने म्हणता येईल. पैशाच्या आमिषाने, कमीअधिक प्रमाणात अनिर्बंधित स्वैर स्वरूपाचे कायमचे अथवा तात्पुरते लैंगिक संबंध ठेवण्याची पद्धत म्हणजे वेश्याव्यवसाय होय. दिल्लीचा जीबी रोडवरील हा कोठा याच कामा करिता प्रसिद्ध आहे नक्की बघा येथे मध्ये काय चालते वरील व्हिडीओ मध्ये

पठ्ठ्याला दहावीत मिळाले 625 पैकी 624 मार्क्स तरीही पेपर टाकला रीचेकिंगला, पुढे जे झाले ते बघून थक्क व्हाल..

नुकतेच दहावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले.दहावीच्या परीक्षांमध्ये चांगले मार्क मिळावे ही प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते. चांगल्या गुणासह आपल्या कॉलेजच्या जीवनाला सुरुवात करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण एखाद्या विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत 625 पैकी 624 मार्क मिळाल्यानंतर तो पेपर रीचेकिंगला टाकेल असा विचार कोणी करू शकतो का? मात्र एवढे मार्क्स घेऊनही दहावीच्या या विद्यार्थ्याने पेपर रिचेकिंगला पाठवला. रिचेकिंगमध्ये जो निकाल आला आहे तो ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

बेळगावमधील मोहम्मद कैफ मुल्लाला दहावीत 625 पैकी 264 मार्क मिळाले. संयुक्तपणे एका विद्यार्थ्यासोबत तो टॉपर होता. मात्र त्याने हा एक गुण कसा गेला, याचा शोध घेण्यासाठी त्याने पेपर रिचेकिंगला पाठवला. खरे तर एवढे चांगले मार्क्स मिळाल्यानंतर कोणी पुन्हा रीचेकिंगला पेपर टाकण्याचा विचारही करणार नाही. पण मोहम्मद कैफने पेपर रीचेकिंगला टाकला आणि त्याचा स्वतःच्या अभ्यासवरील आत्मविश्वास दाखवून दिला. महत्वाचे म्हणजे रिचेकिंगमध्ये त्याला गमावलेला एक मार्क मिळाला आणि तो बोर्डात टॉपर म्हणून घोषित करण्यात आला.

मोहम्मद कैफने विज्ञान वगळता सर्व विषयांमध्ये शंभर टक्के मार्क मिळवले. बोर्डातील तेरा लाख विद्यार्थ्यांपैकी त्याने शंभर टक्के मार्क घेत पहिला क्रमांक पटकावला. त्याच्या या आत्मविश्वासाने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

”मला शंभर टक्के मार्क मिळतील याची खात्री परीक्षा दिल्यापासून होती. पण 99.86 टक्के मार्क मिळाले, केवळ एकच मार्क विज्ञान विषयात गमावला होता. पण रिचेकिंगनंतर मला अपेक्षित असा निकाला लागला,” असं कैफ एका वेबसाईटशी बोलताना म्हणाला.

मोहम्मद कैफ आता अकरावीत विज्ञान शाखेला प्रवेश घेणार आहे. त्याचे आई आणि वडील दोघेही शिक्षक आहेत. मोहम्मद कैफ सोशल मीडियावर कधीही वेळ व्यर्थ घालत नाही, त्याने असाच अभ्यास करावा असी इच्छा असल्याचं त्याचे वडील सांगतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…