अटल बिहारी वाजपेयींचे हे स्वप्न शेवटपर्यत पूर्ण झालेच नाही ! 0

अटल बिहारी वाजपेयींचे लखनौ शहरासोबतचे नाते अत्यंत घट्ट होते. त्यांच्या राजकीय जीवनातील सुरुवात या शहरापासून झाली होती. लखनौ येथून ते ५ वेळा खासदार झाले होते त्यांचे या शहरावर एक प्रकारचे प्रेम होते. लखनऊमध्‍ये वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. पण, त्‍यांची खास जवळीक त्‍यांच्‍या हस्‍तरगंज परिसरातील राज्‍य संपत्‍ती कॉलनीतील त्‍यांच्‍या फ्‍लॅट नंबर- 302 शी होती. अटलजी जेव्‍हा जेव्‍हा लखनऊला येत तेव्‍हा ते गेस्‍ट हाउसमध्‍ये न राहता ते या फ्लॅटमध्ये राहणे पसंत करत. कारण हा फ्‍लॅट त्‍यांच्‍यासाठी शुभ ठरला होता. या फ्‍लॅटमध्‍ये राहत असताना त्‍यांनी लखनौचे खासदार ते देशाचे प्रधानमंत्री पदापर्यंतचा प्रवास केला.

अटल जी हे १९४७ साली लखनौ शहरात आले . ते येथे पीएचडी करण्यासाठी आले होते पण पीएचडी बाजूला राहिली व येथे यशस्वी पत्रकार व राजकारणी म्हणून नावारूपाला आले. लखनौ येथे त्यांनी राष्ट्रधर्म या मासिकाच्या संपादनाची जबाबदारी यशस्वी पार पाडली होती. ते येथे पहिल्यांदा आपले सहकारी बजरंग तिवारी यांच्या घरी राहिले नंतर शेतकरी भवन मध्ये पण राहिले. खासदार झाल्यानंतर त्यांना खासदार निवासस्थान मीराबाई रोड येथील बंगला दिला तिथे ते राहत असत.

लखनऊमध्‍ये त्‍यांचे एक घर असावे अशी अटलजींची एक इच्‍छा होती. यासाठी त्‍यांची पहली पसंद बख्‍शी येथील तलावाचा परिसर होता. तेथील हिरवा गर्द परिसर त्‍यांना प्रभावित करत होता. त्‍यांनी एकदा निवडणूक प्रचाराच्‍यावेळी जाहीर केले होते की, या परिसरात स्‍व:तासाठी एक घर बनविणार आहे. पण त्‍यांची ती इच्‍छा पूर्ण होऊ शकली नाही. त्यांना त्या परिसरात स्वतःचे घर काही कारणाने घेता आले नाही. नंतर ते आजारी पडले आणि त्यांच्या स्वप्नातील घर त्यांना काही घेता आलेच नाही. पण मनाने त्यांचे प्रेम त्या शहरावर राहिले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *