भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा संपूर्ण जीवनपट व्हिडीओ स्वरुपात नक्की बघा 0

वाजपेयी याना आधुनिक राजकारणाचा भीष्म पितामह चा रूपात ओळखले जाते. ते आपल्या भाषणाने सगळयांचे मन मोहून घेत. विरोधक देखील त्यांच्या भाषणा मुळे आणि त्यांच्या स्वभावामुळे त्यांचा कडे आकर्षित होत, त्यांना मान सन्मान देत. आज त्याचा वाढदिवसा निमित्य अटल जी बद्दल काही रौचक गोष्टी ज्या सहसा कोणाला माहिती नाहीत. ते देशातील पहिलेच नेते ज्यांनी 1977 मध्ये संयुक्त राष्ट्रा च्या सभेत हिंदीत भाषण दिल. या अगोदर कोणी तिकडे हिंदी मध्ये भाषण दिले नव्हते. अटलजी यांनीच हिंदीला संयुक्त राष्ट्रांत ओळख मिळवून दिली.ते धाडसी निर्णय घ्यावयास अजिबात घाबरत नसत. भारताने 11 मे 1998 रोजी पोकरण येथे अणू चाचणी घेतली. त्या वेळी अटलची यांचं सरकार होत. यामुळे सर्व विकसित देशांनी भारतावर खूप प्रकारचे निर्बंध लादले. याची कल्पना असताना अटलजींनी भारताला नुक्लिर स्टेट बनवायला हे जोखीम घेतली. त्यांचा काळातच अग्नी 2 आणि आणू यांची यशस्वी चाचणी भारताने घेतली.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *