ते सध्या काय करतात ? अटलजीच्या परिवाराविषयी संपूर्ण माहिती 0

एखाद्या नेत्याचा नातेवाईक किंवा जवळील व्यक्ती त्याची हवा काय असते हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु अटलजीच्या परिवाराविषयी फार कमी लोकांना माहिती आहे आणि त्यांनी आपल्या परिवाराचा स्वार्थ कधी बघितला पण नाही. हे सर्वांनाच माहिती आहे. अटलजी प्रमाणे त्यांचे कुटुंब काय करतात हे एक गूढच आहे. परंतु आम्ही माहिती शोधण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याकडे हि माहिती देत आहोत.

अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म एका मोठ्या सयुंक्त कुटुंबात झाला आहे. त्यांना ३ भाऊ व ३ बहिणी आहेत. त्यांचे भाऊ आणि बहिण काय करतात ह्या विषयी माहिती आता आपण बघूया, १) अवध बिहारी यादव हे त्यांचे भाऊ मध्य प्रदेश सरकार मध्ये उप सचिव होते. त्यांचा जन्म ग्वालीअरला झाला आणि त्यांचा मृत्यू फेब्रुवरी १९९८ मध्ये झाला. २) सदा बिहारी यादव हे पुस्तक प्रकाशनचा व्यवसाय करतात. जन्म ग्वालीअरचा असून त्यांची मुलगी करुणा शुक्ला हि रायपुर येथून आमदार सुध्दा राहलेली आहे. ३) प्रेम बिहारी वाजपेयी मध्य प्रदेश राज्य सहकारी संस्थेत लिपिक होते. त्यांचा मुलगा नवीन वाजपेयी हा मेडिकल चालवितो आणि दुसरा मुलगा दीपक वाजपेयी हा बीजेपीचा पदाधिकारी आहे.

४) उर्मिला मिश्रा त्यांची बहिण गृहिणी आहे. जन्म १९३१ साली आणि मृत्यू ९ मे २००३ला झाला. त्यांचा मुलगा अनुप मिश्र हा माजी आमदार आहे. ५) विमल मिश्रा ह्या सुध्दा गृहिणी आहेत. त्यांचा मुलगा अरुण हा सार्वजनिक बांधकाम विभागात काम करतो. ६)कमला देवी ह्या सर्वात लहान बहिण त्यांच्या बद्दल आम्हाला जास्त माहिती उपलब्ध होऊ शकली नाही परंतु त्या गृहिणी आहेत. आणि आपल्या परिवारासोबत आजही असतात.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *