चहा बस नाम ही काफी है: वाचा चहाचा संपूर्ण इतिहास व वर्तमान

अनेक लोकांची सकाळ चहा पिल्या शिवाय होताच नाही, त्यात मी पण आलेच. मात्र तुम्ही कधी विचार केलाय हा जो चहा आपण पितो त्याचा शोध कसा लागलाय? किंवा काय फायदे आहेत काय तोटे आहेत, चला तर मग आज तुम्हाला सर्व काही कळणार आहे तुमच्या जिवाभावाच्या चहा बद्दल. चहा म्हणजे आपल्यापैकी अनेक जणांची जिवाभावाची गोष्ट जाणून घेऊयात काही खास गोष्टी या खास रे लेखात.

सर्वात अगोदर १८१५ साली काही इंग्रजी पर्यटकांचे लक्ष आसाममधील चहा च्या झाडावर गेले जे की स्थानिक आदिवासी लोक एक पेय म्हणून पित असत. पुढे १८३४ मध्ये चहाची परंपरा भारतात सुरू करण्यासाठी आणि चहाचे उत्पादन करण्याची शक्यता पडताळणीसाठी भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड बैंटिक यांनी एका समितीची स्थापना केली. त्यानंतर १८३५ ला आसाममध्ये चहाचे बाग लावण्यात आले.

बोलले जाते की एक दिवस चीनचे सम्राट शॅन नुंग यांच्या गरम पाण्याच्या ग्लासमध्ये काही पाने येऊन पडली आणि पाण्याला रंग आला आणि मग जेव्हा त्यांनी ते पिले तर त्यांना ते खुप आवडले. बस इथूनच चहाचा सफर सुरू झाला. चहापानाच्या परंपरेचा पहिला उल्लेख ३५० साली म्हणजेच २७३७ वर्षापूर्वीचा आहे. १६१० मध्ये डच व्यापारी चीनमधून चहा युरोपमध्ये घेऊन गेले आणि हळू हळू चहा हे संपूर्ण जगभराचे आवडते पेय बनले आहे.

१)चहाचा शोध हा अपघातानी लागला होता, एसवी सन पूर्व ३७२७ मध्ये चीनमधली एका सम्राटाच्या कपामध्ये काही पाने पडली प्यायला ते चांगलं लागल्यामुळे तिथूनच चहावर शोध करण्यास सुरुवात झाली. २)पेय म्हणून ओळखल्या जाण्याअगोदर चहा उपचारासाठी वापरला जायचा. ३)खुला चहा २ वर्षांसाठी आरामात वापरल्या जाऊ शकतो. ४) एसवी सन पूर्व काळात चीन मध्ये चहा चलन म्हणून वापरला जायचा. ५) खूपच जास्त चहा पिल्याने जठराचा अल्सर होऊ शकतो.

६) १७७३ मध्ये बोस्टन टी पार्टी नंतरच अमेरिकन स्वतंत्र युद्ध सुरु झाले होते. ७) अद्रक चहा सर्दीसाठी तसेच सकाळी येणाऱ्या आळसा साठी रामबाण उपाय आहे. ८) गुडदी फुलाचा चहा डोकेदुखी साठी व तापासाठी उपयुक्त आहे. ९) तिबेटमध्ये बटर आणि मिठाचा चहा पिला जातो.

मग चहा प्यावा वाटतोय वाचून? आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
Credit:- Ashwini Khandagale
परदेशी पर्यटक भारतात येतात तेव्हा काय घडते नक्की वाचा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *