आकाश अंबानीची लग्न पत्रिका झाली आहे वायरल बघा काय आहे सत्य.. 0

देशभरात सध्या क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का यांच्या शाही विवाह सोहळ्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या विवाह सोहळ्याबद्दल प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. अखेर सोमवारी रात्री या बहुचर्चित विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर ‘विरानुष्का’च्या विवाह सोहळ्याचा प्रत्येक तपशील सामान्यांना थक्क करत गेला. विराट आणि अनुष्काची जोडी या फोटोंमध्ये अगदी दृष्ट लागण्यासारखी दिसत होती. यावेळी दोघांनी केलेला पेहराव आणि ज्या रिसॉर्टमध्ये हा सोहळा पार पडला तेथील डोळे दिपवणारी सजावट असा एकूणच थाट पाहून सामान्यांचे डोळे नक्कीच आश्चर्याने विस्फारले असतील. मात्र, या सगळ्याचं कौतुक सरत नाही तोच आता उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजे आकाश. त्यांच्या लग्नाची लग्नपत्रिका सोशल मिडियावर आल्याने हा नेटीझन्ससाठी तत्काळ चर्चेचा विषय झाला. मुळात आकाश याचे लग्न ठरले आहे किंवा नाही हे अजून अंबानी कुटुंबीयांनी जाहीर केलेले नाही. एकवेळ लग्न ठरले असे म्हटले तर या विराट साम्राज्याची सून कोण होणार आहे, हे अजून गुलदस्त्यात आहे. मात्र, लग्नाच्या घोषणेअगोदरच लग्नपत्रिका सोशल मिडीयावर दौडू लागल्याने यापाठीमागचे गौडबंगाल काय, हा प्रश्‍न नेटिझन्सना सतावत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंनुसार, आकाश अंबानीची लग्नपत्रिका छापून तयार आहे. या पत्रिकेची किंमत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल दीड लाख आहे. पत्रिका मोती व सोन्याने सजवण्यात आली आहे. ही किंमती पत्रिका फक्त ५० लोकांना पाठवण्यात येणार आहे. म्हणजे याचा एकूण खर्च ७५ लाख असेल. नीता आणि मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा असून तो रिलांयन्स जिओ टेलीकॉमचे चीफ ऑफ स्ट्रेटजी आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या एका सर्वेमध्ये या कंपनीचे नेट वर्थ २.२ लाख करोड आहे.

परंतु नुकत्याच आलेल्या Times Now च्या बातमीनुसार हि लग्नपत्रिका खोटी असून यात कुठलेही तथ्य नाही आहे. रिलायन्सने या विषयी अधिकृत सूचना दिली आहे. सोशल मिडीयावर अफवांचा पाउस नेहमी पडत असतो. त्यापैकी हि एक अफवा आहे. यात कुठलेही तथ्य नाही आहे. त्यामुळे अफवा पासून सावधान प्रत्येक गोष्टीची सोशल मिडीयावर पडताळणी करून घ्यावी..

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वेश्या वस्ती बुधवार पेठ बद्दल संपूर्ण माहिती

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *