ही मुलगी होणार मुकेश अंबानी यांची सुनबाई, बघा कोण आहे ती? 0

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगू लागली आहे. आकाश सध्या 4G कंपनी जिओ चा संपुर्ण कारभार सांभाळतात. या वर्षाच्या शेवटी आकाश अंबानी हे विवाहबंधनात अडकू शकतात अशी खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

कोण होणार अंबानी कुटुंबाची सुनबाई?

सूत्रांच्या मते आकाश अंबानी हे हिऱ्याचे प्रसिध्द व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता हिच्याशी विवाहबद्ध होणार आहेत. श्लोका ही हिरे व्यापारी रसेल मेहता यांनी सर्वात छोटी मुलगी आहे. श्लोका ही कनेक्टफॉर या संस्थेची संस्थापक सुद्धा आहे. त्यांची ही संस्था NGO ना मदत करते. दोन्ही कुटुंबाकडून मात्र या विषयावर अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झाली नाहीये. पण सूत्रांच्या माहितीप्रमाणे लवकरच याविषयी अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. रसेल मेहता यांचे कुटुंब दक्षिण मुंबईत राहते. यावर्षी डिसेंबर मध्ये हे लग्न होऊ शकते.

आकाश आणि श्लोका यांनी सोबत घेतले आहे शिक्षण-

अंबानी आणि मेहता कुटुंबाचा अगोदरपासून चांगला परिचय आहे. आकाश आणि श्लोका यांनी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुल मध्ये सोबत शिक्षणही घेतले आहे. दोन्ही कुटुंबाकडे मीडियाने याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अजून पर्यंत कोणतेही उत्तर अंबानी आणि मेहता कुटुंबाकडून आलेले नाहीये. श्लोकाने 2009 मध्ये आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रिंस्टन विद्यापीठातून अंतरोपोलॉजि मधून पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर तिने लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मधून लॉ मध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे.

24 मार्चला साखरपुडा?

सूत्रांनी दिलेली माहिती खरी असेल तर आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा येत्या 24 मार्चला साखरपुडा होणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *