अगरबत्ती विकणाऱ्या पित्याने मुलींच्या शिक्षणासाठी विकले स्वतःचे घर…

सध्याच्या काळात लैंगिक असमानता मोठ्या पप्रमाणात वाढलेली आहे, मुलींना अजूनही गर्भातच मारले जात आहे, शाळांमध्ये मुलींच्या उपस्थितीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. पण अशातच एक प्रेरणा बनून पुढे आले आहेत बैद्यनाथ प्रसाद शाह. प्रसाद शाह बिहारच्या मोतिहारीचे रहिवाशी आहेत. त्यांचा अगरबत्ती विकण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी आपल्या 3 मुलींचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वतःचे घर विकले आहे. त्यावेळी त्यांची सर्वात मोठी मुलगी 14 वर्षाची होती.

आज रूपा राज जज आहे. रूपाने राज्य लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत 173 व रँक मिळवला आहे. रूपाने पुण्यातून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार नुकतेच राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या 29 व्या बिहार न्यायिक सेवा प्रतियोगी परीक्षेत यशस्वी झालेल्या मुलींमध्ये एक नाव रूपाचे होते. फक्त रुपाच नाही तर शाह यांच्या अन्य दोन मुली रुची आणि लक्ष्मीने सुद्धा आपल्या वडिलांचे नाव अभिमानाने वेगळ्याच उंचीवर नेले आहे. शाह यांची दुसरी मुलगी चीनमध्ये डॉक्टर बनली आहे. तसेच त्यांची तिसरी मुलगी लक्ष्मी नवी दिल्लीतील बिहार भवन मध्ये काम करते आणि नुकतेच राष्ट्रीय पात्रता परीक्षण नंतर ती एक व्याख्याताच्या रुपात नोकरी करण्यासाठी पात्र ठरली आहे.

रूपाने सांगितले की, ‘मी खूप भाग्यवान आहे कारण आम्हाला शिकवता यावे म्हणून वडिलांनी आपली संपत्ती विकली. त्यांनी आमच्यासाठी जे काही केलं आहे ते आम्ही आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. आता त्यांच्यासाठी काही तरी करायची आमची वेळ आहे.’ बैद्यनाथ प्रसाद शाह आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून एक महिन्याला 15000 रुपये कमवत असत. शाह यांनी 2014 पर्यंत दिल्लीमध्ये आपल्या अगरबत्ती बनवण्याच्या आणि विकण्याचा व्यवसाय सुरू ठेवला.

देशातील अनेक अशा मुलींना जन्मानंतर लगेच मारले जाते. भारतात मुलींना सामाजिक आणि आर्थिक ओझे म्हणून बघितले जाते, त्यामुळे लोकं समजतात की त्यांना जन्माच्या अगोदरच मारलेले बरे आहे. असेच हाल राहिले तर पुढच्या 20 वर्षानंतर आपल्या देशातील परिस्थिती न फक्त चिंताजनक बनेल तर खूप भयानक व बनेल.

बैद्यनाथ यांच्या या त्यागाची आणि पित्याचे कर्तव्य पूर्ण करण्याची प्रेरणा प्रत्येक भारतीयाने घ्यायला हवी. ही कहाणी देशातील त्या लाखो लोकांसाठी एक प्रेरणास्रोत आहे जे मानतात की मुली या ओझे असतात. मुलींचे गर्भपात करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यावर गंभीरतेने विचार होणे आवश्यक आहे. अशातच बैद्यनाथ सारख्या लोकांची गोष्ट थोड्या प्रमाणात का होईना आशा पल्लवित करतात.

बैद्यनाथ प्रसाद शाह यांच्या या संघर्षासाठी आणि त्यांच्या मुलीने मिळवलेल्या यशासाठी त्यांचे खासरे कडून मनःपूर्वक अभिनंदन व भविष्यासाठी शुभेच्छा…
अधिक वाचा: एका आदिवासी जमातीतील महिलेच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *