हेलिकॉप्टर छतावर उतरवून देवदूत ठरलेला हा पायलट आहे महाराष्ट्राचा सुपुत्र..

केरळमध्ये सलग ९ दिवसांच्या जलप्रलयामुळे उत्पात माजला होता. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्यातील 14 पैकी 11 जिल्हे पुराच्या पाण्याखाली गेले होते. मागील १०० वर्षातील सर्वात भयानक पूर केरळमध्ये आला होता. यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले. केरळमध्ये जवळपास २० हजार कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. केरळमधील पूरस्थितीला केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘गंभीर नैसर्गिक आपत्ती’ घोषित केलं आहे. केरळमध्ये पावसाने आतापर्यंत 400 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत. ही गोष्ट लक्षात घेत ही गंभीर नैसर्गिक आपत्ती असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं.केरळमधील पूर ओसरला असला तरी अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. त्यामुळे जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. हजारो घरं पुरात वाहून गेल्यामुळे नागरिक बेघर झाले आहेत.

केरळमध्ये बचावकार्य करताना सैनिकांनी अक्षरशः आपले प्राण धोक्यात घातले. केरळमधील बचावकार्यात थरारक पद्धतीने नागरिकांना बाहेर काढण्यात आले. त्यापॆकी एक बचावमोहीम म्हणजे 23 जणांचे प्राण वाचविण्यासाठी थेट घराच्या छतालाच हेलिपॅड करून हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. या मोहिमेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता. आणि हि कामगिरी करणारा धाडसी पायलट दुसरा-तिसरा कोणी नसून महाराष्ट्राचा सुपुत्र असल्याचे समोर आले आहे.

हा भीम पराक्रम केला आहे लेफ्टनंट कमांडर अभिजीत गरुड यांनी. अभिजित यांच्याकडून यावेळी एकजरी चूक झाली असती तरीही केवळ तीन सेकंदात होत्याचे नव्हते झाले असते. अभिजीत गरुड यांनी आपला केरळमधील बचावकार्याचा थरारक अनुभव सांगितला आणि सबंध महाराष्ट्राचा उर अभिमानाने भरून आला.

चालाकुढी क्षेत्रामध्ये एका गर्द झाडांनी व्यापलेल्या ठिकाणी 23 जण अडकले होते. त्यांना वाचविणे म्हणजे हेलिकॉप्टर बऱ्याच काळासाठी जमिनीवर उतरविणे गरजेचे होते. मात्र, आजुबाजुला पाणी आणि झाडी असल्याने ते अशक्य होते. यामुळे हेलिकॉप्टर चालविणारे लेफ्टनंट कमांडर अभिजीत गरुड आणि त्यांचे सहकारी पी राजकुमार यांनी हेलिकॉप्टर एका घराच्या छतावर उतरविण्याचा धाडसी परंतू तितकाच धोक्याचा निर्णय घेतला.

घर जरी स्लॅबचे असले तरीही हेलिकॉप्टरच्या हजारो किलोंच्या वजनाने स्लॅब कोसळन्याची शक्यता नाकारता येत नव्हती. गरुड यांनी ‘लाइट ऑन व्हील्स’ म्हणजेच छतावर हलके वजन ठेवत नौदलाचे सी किंग हे हेलिकॉप्टर उडते परंतू स्थिर ठेवले होते. या स्थितीत ८ मिनिट हेलिकॉप्टर ठेवण्यात आले. सर्वांना दोरीने वर घेऊन सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. अभिजित आणि सहकार्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हि धाडशी कामगिरी पार पाडली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

भारतातील सर्वात मोठी दहा धरणं बघितली आहेत का? बघा व्हिडीओ…

धरण बांधण्याचा निसर्गावर आणि पर्यावरणावर आघात होतोच. पण मोठी आणि उथळ धरणं एका परीने पाणथळ जागा निर्माण करून निसर्ग वाढीला हातभारच लावतात. धरणांमुळे शेतीला पाणी, पेयजल, विद्युतनिर्मिती यांच्यासारखे अनेक लाभ मिळतात. भारतातील अनेक धरणं स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना आहेत. उत्तराखंडमधील टिहरी, पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवर सतलज नदीवर असलेले भाक्रा धरण हे भारतातील सर्वात मोठे धरणं आहेत. तर हिराकुंड हा स्वतंत्र भारतातील हा पहिला सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प होता. बघूया भारतातील १० सर्वात मोठी धरणं व्हिडीओमधून…

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

जगातील अव्वल श्रीमंतांपैकी एक असेलेल्या बिल गेट्स यांचे घर बघितले का ?

जगात अब्‍जाधीशांची संख्‍या सातत्‍याने वाढतच चालली आहे. आता या लोकांच्‍या लक्‍जरी लाईफस्‍टाईलचा लुकही पाहायला मिळतो. यांचे घरही लक्‍जरी रिसोर्टसारखे असते. मग तो मुकेश अंबानींचे अँटीलिया असो वा सिंघानियांचा जे के हाऊस किंवा विजय मल्‍ल्‍या यांचा गोवा व्हिला. चला तर आज बघूया घर जगातील श्रीमंतापैकी एक बिल गेट्सचे खासरे वर..

लोकांचे डोळे दिपतील असे या सर्वांचे घर आहेत. या घरापैकी एक आहे, जगातील सर्वात श्रीमंत व्‍यक्‍तींमध्‍ये समावेश असलेले मायक्रोसॉफ्टचे प्रमूख बिल गेट्स यांचे घर. जगात श्रीमंतीमध्‍ये बिल गेट्सयाचे नाव अव्वल ठिकाणावर नेहमी असते. या व्‍यक्‍तीकडे पर्यंत 6300 कोटी डॉलरची संपत्ती होती. तसं पाहिलं तर बिल गेट्स यांचे जगात अनेक ठिकाणी बंगले आहेत. मात्र, वॉशिंग्‍टनचे अल्‍ट्रा लक्‍जरी घरात राहणे त्‍यांना आवडते. सुमारे 66 हजार वर्गफूटमध्‍ये बनलेल्‍या या घरात एकापेक्षा एक अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्‍यात आला आहे. त्‍यामुळे या घराला Xanadu 2.0 या टोपणनावानेही ओळखले जाते.

पृथ्‍वीवर स्‍वर्गासारखी सुविधा देणा-या या घराची किंमत सुमारे 150 मिलियन डॉलर इतकी आहे. आकाशातून गेट्स यांच्‍या घराकडे पाहिल्‍यास ते एखाद्या शहरासारखे वाटते. मायक्रोसॉफ्ट प्रमूखांच्‍या या घरात सात मोठे बेडरूम, 24 बाथरूम्‍स, सहा स्‍वयंपाक घर, सहा फायरप्‍लेस, 11500 वर्गफूटमध्‍ये कुटुंबियांसाठी खासगी क्‍वार्टर आणि 2100 वर्गफूटात लायब्ररी बनवण्‍यात आली आहे. गेट्स यांचे हे घर 92 फूट लांब आणि 63 फूट उंच आहे. लक्‍जरी कारचे शौकिन असलेल्‍या गेट्स यांनी घरात 3 गॅरेज बनवले आहेत. यापैकी एका गॅरेजमध्‍ये 6300 वर्गफूट क्षेत्रात 10 कार उभ्‍या करण्‍याइतकी जागा आहे. मनोरंजनासाठी 20 लोकांना बसण्‍याची क्षमता असलेले शानदार थिएटर आहे. खाली दिलेल्या विडीओ मध्ये आपण घरातील पूर्ण फोटो बघू शकता…

गेट्स यांच्‍या आलिशान घरात गेल्‍यानंतर सर्वात प्रथम एक मोठे रिस्‍पेशन हॉल लागते. यामध्‍ये सुमारे 150 लोक बसून जेवण करू शकतात तर 200 लोकांबरोबर कॉकटेल पार्टीही होऊ शकते. जगातील सर्वात श्रीमंत माणसाच्‍या या घरात अंडरवॉटर म्‍युझिक सिस्टिमसहित स्विमिंग पूल आहे. 2500 वर्गफुटात जिम आणि 1000 वर्गफुटात डायनिंग रूम बनवण्‍यात आले आहे.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

फेसबुकचा शोध लावणारा खरा मालक मार्क झुकरबर्ग नसुन हा भारतीय आहे…

फेसबुक ही जगातील सर्वात प्रसिध्द सोशल नेटवर्किंग साईटपैकी एक साईट आहे. फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही आपल्या परिवारातील सदस्य, मित्र आणि अनेक लोकांशी जोडलेले राहू शकता. आपण सर्व जाणतो की फेसबुकची सुरुवात मार्क झुकरबर्ग याने केली होती. पण प्रत्यक्षात मात्र फेसबुकच्या शोधाची कहाणी खूप वेगळी आहे. फेसबुकचा शोध लावणारा खरा मालक हा मार्क झुकरबर्ग नसून एक भारतीय व्यक्ती आहे. चला तर मग आज खासरेवर जाणून घेऊया फेसबुकच्या शोधाची खरी कहाणी…

दिव्य नरेंद्र हे नाव खूप कमी भारतीयांना माहिती असेल. ते एक अमेरिकेचे नागरिक आहेत पण ते मूळचे भारतीय आहेत. त्यांचे आईवडील अडचणीच्या काळात भारतातून अमेरिकेत स्थायिक झाले होते. दिव्य नरेंद्र यांचं शिक्षण बालपण अमेरिकेतच झाले. दिव्य नरेंद्र यांचे आई वडील हे पेशाने डॉक्टर आहेत.स्वतासारखं दिव्यला सुद्धा डॉक्टरच करावं असं त्यांचं स्वप्न होतं. पण दिव्यला काही हे मान्य नव्हते. त्यांच्यामध्ये इंटरप्रिन्योर बनण्याची जिद्द होती, त्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. त्यांच्या या संघर्षाला यशही आले, कारण जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकची आयडिया ही त्यांची होती. लन त्यांना हे सिद्ध करण्यासाठी 2008 पर्यंत कोर्टाच्या निर्णयाची वाट बघावी लागली.

फेसबुकची खरी आयडिया ही दिव्य, त्याचा मित्र विंकलवास आणि इतर मित्रांची होती. पण मार्क झुकरबर्गने यामध्ये काही बदल करून ही आयडिया चोरली. दिव्यने 2004 मध्ये अमेरिकेत एका न्यायालयात मार्क विरुद्ध कायदेशीर केस दाखल केली. त्यांना यामध्ये यश आले, न्यायालयात सिद्ध झाले की फेसबुकची खरी आयडिया ही दिव्य आणि त्याच्या इतर मित्रांचीच आहे. यासाठी न्यायालयाने मार्क झुकरबर्ग याला 650 लाख डॉलर्सचा दंड ठोठावला. परंतु दिव्य याने समाधानी नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की शेअर बाजारात जशी फेसबुकच्या शेअरची किंमत आहे त्याप्रकारे त्यांना पैसे नाही मिळाले.

दिव्य यांनी पुन्हा एकदा न्यायालयात याविरुद्ध दाद मागितली मात्र न्यायालयात यावेळी दिव्य याना हार पत्करावी लागली. मात्र कोर्टाने 2008 सालीचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. फेसबुकचा मालक आणि शोध लावणारा व्यक्ती म्हणून भलेही दिव्य याला कोणी ओळखत नसेल पण जेव्हा फेसबुकच्या शोधाची कहाणी लिहिली जाईल तेव्हा दिव्य यांची नक्कीच आठवण काढली जाईल.

फेसबुकच्या शोधाची खरी कहाणी-

फेसबुकचा शोध हार्वर्ड कनेक्शन सोशल साईटच्या निर्मिती प्रक्रियाच्या वेळी झाला. दिव्य हार्वर्ड कनेक्शन प्रोजेक्टवर खूप पुढेपर्यंत पोहचला होते. त्यानंतर बऱ्याच अवधीनंतर मार्क हा त्या प्रोजेक्टमध्ये सामील झाला होता. मार्कने यानंतर या प्रोजेक्टवर ताबा मिळवला आणि फेसबुक या नावाने एक डोमेन रजिस्टर करून त्याने तो जगासमोर आणला. दिव्य आज अमेरिकन बिझनेसमन म्हणून ओळखले जातात. 18 मार्च 1982 साली जन्मलेल्या दिव्य यांचे शिक्षण हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधून झालेले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

राजीव गांधी यांच्या बाबत तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहे का ?

राजीव गांधी उर्फ राजीव रतन गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ ला मुंबई येथे झाला. फिरोज गांधी व इंदिरा गांधी यांचे सुपुत्र राजीव गांधी. भारताचे ७ वे प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा कार्यकाल १९८४ ते १९८९..

आपल्या मोठ्या भावासोबत राजीव गांधी यांनी प्राथमिक शिक्षण ड्युन स्कूल,देहरादून येथे पूर्ण केले त्यानंतर , Trinity College मध्ये त्यांचे शिक्षण झाले व पुढील शिक्षणा करिता ते Cambride Imperial Collge लंडन येथे पूर्ण केले. इंदिरा गांधीची हत्या झाल्या बरोबर त्यांना भारताचे प्रधानमंत्री घोषित करण्यात आले. त्यांचे भाऊ संजय गांधी यांच्या मृत्यू नंतर त्यांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेतला.

राजीव गांधी यांचे नाव राजीव कसे ठेवण्यात आले ?
त्यांची आजी कमला गांधीच्या नावावरून त्यांचे नाव राजीव ठेवण्यात आले कारण असे कि कमला म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मीचे सिंहासन कमळ म्हणजे राजीव…

वयाच्या ४० व्या वर्षी प्रधानमंत्री पदाची शपथ घेणारे राजीव गांधी हे सर्वात तरून भारताचे प्रधानमंत्री होते. राजीव गांधी यांचे प्रेम Antanio Manio (त्यांना आपण सध्या सोनिया गांधी म्हणून ओळखतो ) यांच्या सोबत झाले त्यानंतर दोघानेही लग्न करण्याचा निर्णय घेतला. UKमध्ये college मध्ये असताना दोघाच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

१९६६ ला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राजीव गांधी भारतात परतले व त्यांनी एअर इंडियात पायलटची नौकरी केली. येथे त्यांना ५००० रुपये महिन्याला पगार मिळत होता. राजीव गांधी हे संगीताचे चाहते होते Rolling Stones व Beetles हे त्याचे आवडते संगीत समूह होते. १९८० पर्यंत संजय गांधी यांच्या मृत्यु होण्यापूर्वी राजीव गांधी राजकारणापासून दूर होते. भावाच्या मृत्य नंतर राजीव गांधी १९८१ साली सर्वात पहिले लोकसभेवर निवडून आले.

Sam Pitroda सुध्दा मान्य करतात कि भारतातील डिजिटल क्रांतीचे जनक हे राजीव गांधी आहे. १९८२ साली त्यांना कॉंग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली. याच काळात त्यांना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची तयारी करण्याची जवाबदारी देण्यात आली व त्यांनी ती जवाबदारी सार्थपणे पार पाडली. आईच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांनी कॉंग्रेसला सर्वात मोठा विजय मिळवून दिला. ५४२ पैकी ४११ जागेवर कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले. निवडणूक प्रचारात त्यांनी २५० सभा घेतल्या व त्याचे अंतर पृथ्वीच्या अर्धी परिक्रमा होईल एवढे होते.

३० जुलै १९८७ रोजी त्याचावर प्राणघातक हल्ला झाला परंतु राजीव गांधी या हल्ल्यातून बचावले. विजयमुनिगे रोहणा डिसिल्वा हे हल्ला करणार्याचे नाव कारण २९ जुलै १९८७ रोजी त्यांनी श्रीलंका सोबत झालेला शांती प्रस्ताव आहे. राजीव गांधी यांना २१ मे ११९१ रोजी चेन्नई येथील श्रीपेरूमब्दूर येथील सभेत आत्मघाती बॉम्ब हल्यात वीरगती प्राप्त झाली. LITTE ह्या दहशतवादी संघटने तर्फे हा हल्ला करण्यात आला. १९९१ साली त्यांना मृत्यूपश्चात भारतातील सर्वोच्च सन्मान भारत रत्न देण्यात आला..

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

एम्सच्या डॉक्टरांनी अटलजींना वाहिली श्रद्धांजली म्हणून व्हायरल झालेल्या या फोटोची सत्यता आहे मात्र वेगळीच..

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नुकतंच दुःखद निधन झालं. सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांच्यासाठी लोकांनी प्रार्थना देखील केली. पण 16 ऑगस्ट ला संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. सोशल मीडियावर त्यांच्या नावाचा हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये होता. त्यांचे अनेक किस्से सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत होते. त्यांचे अनेक भाषणांचे कवितांचे व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. पण यामध्ये खोटी माहिती पसरवणारे देखील अनेकजण सक्रिय झालेले दिसले.

एम्सच्या इतिहासात डॉक्टरांनी पहिल्यांदाच कोण्या पेशंटला मृत्यू झाल्यानंतर श्रद्धांजली वाहिली म्हणून एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. हा फोटो एवढा व्हायरल झाला की मोठ्या मीडिया हाऊसने त्यावर चक्क स्टोरी करून टाकली. त्यांनी नंतर त्यांची चूक सुधारली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट-

फोटोची सत्यता काय आहे?

या फोटोची सत्यता तपासली असता हा, या फोटोत एम्सचे डॉक्टर तर सोडा पण हा फोटो भारतामधील देखील नाहीये. हा फोटो चीनमधील आहे. 22 नोव्हेंबर 2012 ला एका 17 वर्षीय मुलीचा मृत्यु झाला होता. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी तिला श्रद्धांजली वाहिली होती. त्या मुलीने अवयव दान केले होते त्यामुळे डॉक्टरांनी तिला श्रद्धांजली वाहिली होती. एवढ्या कमी वयात माणुसकी म्हणून अवयव दान आणि तिच्या विचारांना सलाम म्हणून डोकं खाली वाकवून उभे आहेत. पण नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर हा फोटो खोट्या महितीसोबत व्हायरल करण्यात आला.

चीनमध्ये असे अनेकदा घडले आहे. एखाद्या मृत व्यक्तीने अवयव दान केल्यानंतर त्याला डॉक्टरांच्या टीमने श्रद्धांजली वाहिली आहे. अश्याप्रकारे श्रद्धांजली वाहतानाचे अजून काही फोटो देखील सापडले आहेत.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

कोण आहे ही लाखो भक्त असलेली 21 वर्षीय युवा साध्वी, जिच्या सौंदर्यापूढे बॉलीवूड अभिनेत्रीही आहेत फिक्या..

भारतीयांना भक्ती दान धर्म करण्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे इथे असलेल्या साधू साध्वीना चांगलच महत्व आहे. अनेक साधू साध्वीना लाखो करोडो भक्त आहेत. भारतीय त्यांच्या आयुष्यात भक्तीभावाला चांगलेच महत्व देतात. सहसा साधू साध्वी हे जेष्ठ असतात. पण आज आपण अशा साध्वी विषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचे वय अवघे 21 वर्षे आहे आणि भक्तांची संख्या मात्र लाखोंमध्ये आहे. बघूया या साध्वी विषयी माहिती…

या 21 वर्षीय साध्वी आहेत जया किशोरी. जया किशोरी यांचे वय अवघे 21 वर्षे आहे. जया किशोरी या राजस्थानच्या सुजानगढ येथील आहेत. जया यांचा जन्म 1996 साली गौड ब्राम्हण परिवारात झाला. जन्मच गौड ब्राहन परिवारात झाल्याने घरात लहानपणी पासून जया याना सुद्धा भक्तीची आवड लागली. जयाचा कल हा लहानपणी पासून कृष्ण भक्तीकडे होता. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षीच जया संस्कृत मध्ये लिंगाष्टकम, शिव तांडव स्तोत्रम, रामाष्टकम आदी स्रोत गायच्या. दहाव्या वर्षी एकटीने सुंदर कांड चे पाठ केला. तेव्हापासून जयाला एक वेगळी ओळख मिळायला सुरुवात झाली. पण जयाने शिक्षणही सुरु ठेवले. जयाने कोलकता येथील महादेवी बीडला वर्ल्ड अकॅडमी मधून शिक्षण घेतले.

जयाने सुरुवातीला दीक्षा पंडित गोविंदराम मिश्र यांच्याकडून घेतली. पंडित मिश्र जयाला राधा म्हणून बोलवायचे. त्यांनीच जयाचे कृष्ण प्रेम बघून तिला किशोरी जी अशी उपाधी दिली होती. आता जयाला भक्त किशोरी जी म्हणूनच ओळखतात.

जयाचे ‘नानी बाई का मायरा, नरसी का भात’ हे सत्संग खूप प्रसिद्ध आहे. जयाच्या या सत्संगाला लाखो भक्तांची गर्दी होते. जया सोशल मीडियावर पण चांगलीच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या फेसबुक पेजला तब्बल 8 लाख लाईक्स आहेत.

जयाच्या सत्संगामधून जो पैसा जमा होतो तो नारायण सेवा ट्रस्ट, उदयपूरला दान केला जातो. या दानातून ट्रस्ट अपंगांना मदत करते.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने अटलजींचं हे भाषण ऐकलंच पाहिजे..

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी 16 ऑगस्ट रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील भीष्म पितामह हरपला आहे.अटलबिहारी वाजपेयी हे फक्त राजकारणीच नाही तर एक हळव्या मनाचे कवी, लेखक आणि पत्रकार देखील होते.

अटलजींच्या निधनानंतर त्यांचे अनेक भाषणं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. पण एक खास भाषण बघण्याचा सल्ला आनंद महिंद्रा यांनी दिला आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून त्यांचं भाषण खासकरून विद्यार्थ्यांनी बघण्याचा सल्ला दिला आहे. वाजपेयींचं हे भाषण आवर्जून ऐकावं असंही ते म्हणाले आहेत.

केरळच्या बचावकार्यातील हे व्हिडियो पाहून तुम्हीही थक्क व्हाल..

केरळमध्ये पावसाचे थैमान मागील अनेक दिवसांपासून सुरु असून येथील जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत जवळपास ३५७ जणांचे या पूरामध्ये प्राण गेले असून अद्यापही हजारो जण या पूरात अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केरळच्या नागरिकांना या परिस्थितीतून सुखरुप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या १६९ टीम काम करत आहेत. २२ हेलिकॉप्टर, नेव्हीच्या ४० बोटी, कोस्ट गार्डच्या ३५ बोटींच्या सहाय्याने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. याशिवाय स्थानिक तरुण, पोलीस यंत्रणा आणि काही सामाजिक संस्था यांची मदत मिळत आहे.

या बचावकार्यातील काही फोटो आणि व्हिडियो सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत. यामध्ये बचाव करणारे लोक आपला जीव कशापद्धतीने धोक्यात घालून हे कार्य करत आहेत ते दिसत आहे. यामध्ये वयस्कर लोकांपासून ते लहान मुलांपर्यंत अनेकांचे प्राण वाचविण्यात यश येत आहे. हे व्हिडीओ बघितल्यावर आपल्याला त्यातील भीषणता लक्षात येईल . बचावकार्य करणाऱ्या टीममध्ये भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल, भारतीय तटरक्षक दल, एनडीआरएफ, सीआरपीएफचे जावं सामील आहेत.

देशाच्या वेगवेगळया भागातून केरळला अन्न-पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी केरळची हवाई पाहणी केल्यानंतर ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. सोबतच मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे सुद्धा केरळ साठी मोठ्या प्रमाणात मदत प्राप्त होत आहे.

अटलजीच्या मृत्यू नंतर नरेंद्र मोदी यांचा हसताना वायरल फोटोचे काय आहे सत्य..

माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचा १६ ऑगस्ट ला मृत्यू झाला. त्यानंतर लगेच नेटीजनकडे एक फोटो आला ज्यामध्ये मोदीजी हे ४ डॉक्टरासोबत उभे आहे आणि बोलताना हसताना दिसत आहे. आणि त्या नंतर सोशल मिडीयावर हि फोटो मोदी विरोधकांनी पसरवली आणि या फोटो वर टीका होण्यास सुरवात झाली. ज्यामध्ये लिहण्यात येत आहे कि अटलजीच्या मृत्युनंतर नरेंद्र मोदी हसत आहे. किती असवेदनशील आहे देशाचे प्रधानमंत्री जे आपल्या नेत्याच्या मृत्युनंतर हसत आहे, अश्या प्रकारे टीका करण्यात आली. आणि या फोटोस सोशल मिडीयावर हजारो शेअर मिळाले आहे.

सोशल मिडीयावर हा फोटो शेअर होत होता त्यामध्ये कांग्रेस नेता बृजेश कलप्पा यांनी हा फोटो twitter वर शेअर केला आणि पुढील प्रकारे टिपणी केली- “दुख से ग्रस्त पीएम नरेंद्र मोदी भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी की मौत पर दिल्ली के एम्स अस्पताल में शोक प्रकट करते हुए” या प्रकारा नंतर नरेद्र मोदीच्या बचावात काही लोक नाराज झाले आणि त्यांनी बचावात सांगितले कि हा फोटो जुना १० एप्रिल २०१६चा आहे एम्स मधील नाही आहे. हा दावा रिषी बाग्री आणि अंकुर सिंह या दोन twitter युजरनि सर्वप्रथम केला आहे.

या नंतर आम्ही १६ ऑगस्टचा तो व्हीडीओ शोधला ज्यामध्ये नरेंद्र मोदी हे अटल जिना भेटायला जात आहे. एम्स बाहेरील हा व्हीडीओ आहे ज्यामध्ये नरेंद्र मोदी फुल स्लीव कुर्ता घालून आहे जसा वायरल फोटो मध्ये आहे. या नंतर जो बॉडीगार्ड नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहे तो सुध्दा फोटो मध्ये आहे. खाली आपण व्हीडीओ बघू शकता.

नरेद्र मोदि यांचा बॉडीगार्डचा फोटो आपण बघू शकता दोन्ही हि फोटो मध्ये दिसणारे बॉडीगार्ड सारखे आहेत.

अजून हि विश्वास ज्यांना होत नाही त्यांच्या करिता वायरल फोटो मध्ये जे डॉक्टर आहे त्यांचे नाव डॉ. शिवकुमार चौधरी हे आहे. आणि ते एम्स मध्ये कार्डियोथोरैकिक सर्जरी चे प्राध्यापक आहे.

आणि काही युजर जे सांगत आहेत कि फोटो एप्रिल २०१६चा आहे. त्यांच्या करिता आम्ही जुना फोटो देत आहो ज्यामध्ये मोदीजी यांनी फुल स्लीवचा कुर्ता घातलेला नाही आहे. वायरल फोटोत फुल स्लीवचा कुर्ता आहे.

हि गोष्ट सत्य आहे कि फोटो एम्स मधील आहे. नरेंद्र मोदी अटल जी यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेले होते तेव्हाचा आहे. परंतु खोट हे सांगण्यात येत आहे कि हा फोटो अटल जी च्या मृत्यू नंतरचा आहे. हि गोष्ट अतिशय खोटी आहे कारण नरेंद्र मोदी २:४५ ला एम्स मधून चालले गेले होते आणि अटलजी चा मृत्यू सायंकाळी ५:०५ ला झाला. हा फोटो अटलजी च्या मृत्यू अगोदरचा आहे. हे फोटो राजकीय फायद्या करिता अनेक लोक शेअर करतात आणि सामान्य व्यक्ती या खोट्या गोष्टीत फसला जातो. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.