कशी असते आमदारकीचा राजिनामा देण्याची संपूर्ण प्रक्रिया?

58 मुकमोर्चे शांततेत काढूनही पदरी काही पडलं नाही अशी भावना झाल्याने मराठा समाज अत्यंत आक्रमकपणे रस्त्यावर उतरला आहे. राज्यात विविध ठिकाणी रास्ता रोको व बंद पुकारण्यात येत आहेत. राज्यभरात मागील 2-4 दिवसात अनेक ठिकाणी जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. कायगाव टोका येथील तरुण काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेऊन बलिदान दिल्याने मराठा समाज अधिकच आक्रमकपणे रस्त्यावर उतरला आहे. आंदोलन चिघळल्यानंतर याचा फटका विविध लोकप्रतिनिधीना देखील बसला. विशेष करून मराठा समाजातील आमदारांना आरक्षण मंजूर करून घेता येत नसेल किंवा समाजासाठी काही योगदान देता येत नसेल तर राजीनामे द्या असे आवाहन करण्यात येत होते.

कन्नड सोयगावचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा म्हणून प्रथम आपला राजीनामा दिला. या नंतर राज्यातील विविध पक्षांच्या आमदारांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. मागील 2 दिवसात विविध पक्षाच्या तब्बल 10 आमदारांनी राजीनामे दिले. पण सर्वाना हा प्रश्न पडला आहे की खरंच या आमदारांचे राजीनामे स्वीकारले जातील का? अनेक आमदारांनी लेटरपॅड वर राजीनामे दिल्याने शंका व्यक्त केली जात आहे. आज खासरेवर बघूया कशी असते आमदारकीचा राजिनामा देण्याची संपूर्ण प्रक्रिया?

आमदारकीचा राजीनामा देण्याची प्रक्रिया-

मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेल्या सर्व आमदारांचा राजीनामा पुढच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत स्वीकारणे शक्य नसल्याने त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. 19 नोव्हेंबरला हिवाळी अधिवेशनापर्यंत हे राजीनामे स्वीकारले जाऊ शकत नाही असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केले आहे.

आमदारांनी राजीनामा देताना कोणत्याही कारणाविना किंवा अटी आणि शर्थीविना देणे बंधनकारक आहेत. पण आमदारांनी त्याचे उल्लंघन केल्यास राजीनामे फेटाळले जाऊ शकतात. राजीनामा देताना प्रत्येकाने प्रत्यक्षात विधानसभेच्या अध्यक्षांकडे एका ठरलेल्या फॉरमॅट मध्ये द्यायचा असतो.
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर तो राजीनामा सभागृहात वाचून दाखवला जातो. त्यानंतर कारण नमूद करून तो स्वीकारला किंवा फेटाळला जातो. राजीनामा स्वीकारल्यास रिक्त झालेल्या जागांची माहिती निवडणूक आयोगाला दिली जाते.

आमदारकीचा राजीनामा देण्याचा अधिकृत फॉरमॅट-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

आरक्षण वादावर विलासराव देशमुख यांचा तोडगा, दहा वर्षांपूर्वीचं भाषण व्हायरल..

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. मराठा समाजाने शांततेत 58 मूक मोर्चे काढल्यानंतरही समाजाच्या पदरी काहीच पडलं नाही अशी भावना झाल्याने मराठा समाज आता अधिक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक जेष्ठ अभ्यासकांचे काय म्हणणे आहे हे विविध माध्यम दाखवत आहेत. पण 10 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे एक भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले आहे. ABP MAJHA च्या कार्यक्रमात विलासराव देशमुख यांनी आरक्षणावर तोडगा सांगितला होता. बघा काय म्हणाले होते विलासराव देशमुख..

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

कॅप्टन विक्रम बत्रा भारतीय सैन्याचा शेर शहा..

अशी तर हि एका थंडपेय कंपनीची लाईन आहे- ये दिल मांगे मोर, परंतु या ओळीस कोणी ओळख दिली तर ती काश्मीर रायफलचा शूर सैनिक कॅप्टन विक्रम बत्रा. विक्रम बत्रा भारतीय सैन्यात एक अधिकारी होते ज्यांनी कारगिल युद्धात अद्वितीय साहसाचा परिचय देऊन शहीद झाले. मृत्युपश्चात त्यांना सर्वोच्च परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.

चला आज आपण या वीर सुपुत्रा विषयी काही माहिती बघूया ज्याचा सर्व भारतीयांना गर्व वाटेल. वाटायलाच हवा कारण विक्रम बात्राने कामच असे केले…

कोण होते विक्रम बत्रा ?

पालमपूर येथील जी एल बत्रा व कमलकांता बत्रा याच्या घरी ९ सप्टेंबर १९७४ रोजी दोन मुली नंतर जुळे झाले, म्हणून त्यांनी त्याचे नाव लव कुश ठेवले. लव म्हणजे विक्रम आणि कुश म्हणजे विशाल. पदवी पूर्ण झाल्यावर विक्रमनि सैन्यात जाण्याच ठरविले आणि सीडीएस ची तयारी सुरु केली. या दरम्यान विक्रम ला हॉंगकॉंग येथे चांगल्या पगाराची मर्चट नेवी मध्ये नौकरीची संधी मिळाली , परंतु देश सेवा हेच स्वप्न असेलला विक्रमने हि नौकरी स्वीकारली नाही. १९९७ मध्ये जम्मू मधील सोपोर नामक ठिकाणी सेन्याच्या १३ जम्मू कश्मीर रायफल्स मध्ये लेफ्टनंट या पदावर नियुक्ती मिळाली.

कारगिल चे युध्द

एक जून १९९९ ला त्याची तुकडीला कारगिल युद्धास रवाना करण्यात आले. हम्प व राकी हे दोन ठिकाण जिंकल्या मुले विक्रमला कॅप्टन म्हणून पदोन्नती मिळाली. यानंतर श्रीनगर लेह मार्गाच्या ठीक वर सर्वात महत्वाचे ठिकाण ५१४० शिखर हे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यातून सोडविण्या करिता जवाबदारी कैप्टन विक्रम बत्रा यांच्या वर देण्यात आली. अतिशय दुर्गम क्षेत्र असून विक्रम ने आपल्या सोबत्या सोबत २० जून १९९९ ला शकली तीन वाजता अंधारात या शिखरावर आपला ताबा मिळवला.

शेर शाह नावाने प्रसिध्द

विक्रम बत्रा ने या शिखरा वरून आपला विजयी घोष ‘ये दिल मांगे मोर’ असा दिला तेव्हा संपूर्ण सैन्यात व भारतात त्याचे नाव प्रसिध्द झाले. ये दिल मांगे मोर हि लाईन बघता बघता कारगिल युध्दात संपूर्ण क्षत्रूला फजितीची ठरली. सगळी कडे हाच घोष ये दिल मांगे मोर…

याच दरम्यान विक्रमला कोड नाव शेर शहा व कारगिल का शेर या नावाने लोक ओळखू लागले. ४८७५ ताब्यात घेण्याची सैन्याने तयारी सुरु केली. याची जवाबदारी विक्रमला देण्यात आली. त्याने संधीचे सोने केले आणि जीवाची पर्वा न करता लेफ्टनंट अनुज नायर सोबत अनेक पाकिस्तानी सैनिकांना मुतृच्या दारात धाडले.

अंतिम शब्द ‘जय माता दी’

मिशन जवळपास पूर्ण झालच होता. परंतु आपल्या सोबत्याला वाचविण्या करिता जीवाचे बलिदान दिले.

एका ग्रेनेडच्या स्फोटात डावा हात उखळतो, -दुसऱ्या ग्रेनेडने उजवा हात दूरवर फेकला जातो. तरी पुढे झेप घेतो…
मशीन गनच्या दोन मोठ्या गोळ्या मांडीत घुसतात. दुसरा पाय rmg स्फोटाने निखळतो. नुसतं धड शिल्लक राहिलं तरी, त्या नुसत्या धडाने सरकत-सरकत शत्रूदिशेने जात राहतो.
अशा अनेक कोवळ्या 24 वर्षाच्या विक्रम बत्रांसारख्याच्या मेंदूच्या त्या 24 वेटोळ्यात, काय असतं नेमकं? की ईवल्याशा एका वितभर छातीत, 24-24 गोळ्या घुसत असताना अन सगळं शरीर निकामी झालं असताना — फक्त उरल्या काही श्वासानी सरपटत शत्रूवर चवताळून जायची अशक्य इच्छा कुठून येते यांच्यात ?

जय माता दि म्हणत त्याने जीव सोडला…

अद्भुत साहस आणि पराक्रम विक्रम बत्रा ला १५ जून १९९९ ला संरक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार परमवीर चक्राने त्याला सन्मानित करण्यात आले.
१६ जूनला आपला जुळा भाऊ विशाल ला त्याने पत्र लिहिले होते त्यात लिहल कि “ प्रिय कुश, आई व बाबाची काळजी घे… इथे काहीही होऊ शकते….

विक्रम च्या आयुष्यावर चित्रपट

LOC Kargil या चित्रपटात विक्रमच्या भूमिकेत आपण अभिषेक बच्चन ला बघू शकता…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

२६ जुलै २०१८ ला कारगिल विजयाला १९ वर्ष पूर्ण…

भारतीय सेना हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करते. खरं तर युद्धात विजय हा फक्त सेनेचाच नसतो, तर तो संपूर्ण देशाचा असतो. म्हणून संपूर्ण देशात हा दिवस उत्साहाने साजरा व्हायला हवा. मात्र, तसे होत नाही. हा दिवस विसरला जातो, ही खेदाची बाब होय.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याची, पराक्रमाची, त्यागाची, कष्टाची, सहनशीतलेची, निष्ठेची, जिद्दीची, देशाभिमानाची व बलिदानाची सातत्याने उजळणी आपल्या देशवासीयांकरिता होणे गरजेचे आहे. कारण या उजळणीमुळे लोकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवली जाते. साऱ्या देशबांधवांनी आपल्या जीवनात देशप्रेमालाच प्राथमिकता देऊन आपापली कामे केली तरच देश प्रगतिपथावर अग्रेसर राहील.

१९६२ चे चीन विरुद्धचे युद्ध वगळता पाकिस्तानविरुद्धच आपले युद्ध झाले आहे. १९४८ नंतर १९६५ चे युद्ध झाले, ज्यात भारतीय सेनेने लाहोरला धडक दिली. १९७१ च्या युद्धात आपला निर्णायक विजय झाला, ज्यात बांगलादेशाची निर्मिती झाली व आपल्या सेनेने ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना युद्धकैदी केलं. भारत-पाकिस्तानच्या युद्धाचे मूळ कारण नेहमीच काश्मीर असते. काश्मीर समस्येमुळे संबंध नेहमीच ताणलेले असतात. नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना म्हटले होते की, भारत- पाकिस्तान बससेवा सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. परंतु, जर पहिल्या बसमधून भारताचे पंतप्रधान लाहोरला आले तर आम्ही समजू की, भारत-पाक संबंध सुधारावे ही खरोखरीच भारताची इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेतला व लाहोरला बसने यात्रा केली. परंतु, याच सुमारास पाकिस्तानने कारगिल युद्धाच्या जय्यत तयारीला सुरुवात केली. आता प्रश्न उद्भवतो की कारगिलच का ?

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले. पाकिस्तानला ही गोष्ट मान्य नव्हती. परंतु, त्यांचा नाईलाज होता. कारण महाराजा हरीसिंगनेच पुढाकार घेऊन काश्मीर भारताचा अविभाज्य घटक राहील, अशा करारावर स्वाक्षरी केली होती. १९४८ साली पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैन्य घुसविले व बऱ्याच मोठय़ा भूभागावर ताबा मिळविला. भारतीय सेनेनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली व पाकिस्तानी सेनेवर हल्ला चढविला. पाकिस्तानी सेना माघार घ्यायला लागली असताना तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंनी यूनोकडे धाव घेतली. मग युद्धबंदी झाली. दोन्ही देशांच्या फौजा जिथं होत्या तिथं थांबल्या. जिथं दोन्ही देशाच्या फौजा थांबल्या तिलाच एलओसी (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल) म्हणतात. यामुळेच काश्मीरचा बराच मोठा प्रदेश आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे, ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. यूनोने हे प्रकरण चिघळत ठेवण्याची भूमिका घेतली नसती तर भारतीय सेनेने पाकिस्तानी सेनेला हुसकावून लावले असते व पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दिसला नसता.

जम्मूपासून श्रीनगर, कारगिल व लेहपर्यंत राष्ट्रीय राजमार्ग नंबर एक ए वापरात आहे. संपूर्ण सेनेचं मेंटेंनन्स याच राजमार्गामुळे होतं. त्यामुळे या मार्गाला सेनेकरता जीवन रेषा मानल्या जात. कारगिल, बटालिक, द्रास व मइको व्हॅली एल.ओ.सी.ला अगदी लागून आहेत. पाकिस्तानी सेनेने योजना केली की, जर या चार ठिकाणांवर ताबा मिळविला तर राष्ट्रीय राजमार्गाचा बराच मोठा भाग त्यांच्या ताब्यात येईल. त्यामुळे भारतीय सेनेचा लेहशी संपर्क तुटेल व लेहशी संपर्क तुटल्या मुळे लेव्ह व सियाचीनला मेंटेन करणं फारच कठीण होईल. थोडक्यात यामुळे लेह व लेहवरील भूभाग अगदी सियाचीनपर्यंत, पाकिस्तानच्या ताब्यात जाईल.

काश्मीरच्या या संपूर्ण भागात नोव्हेंबर ते मार्च प्रचंड प्रमाणात बर्फ पडतो. बऱ्याच ठिकाणी स्टँडिंग स्नो २० ते ३० फूट असतो. अशावेळी पहाडांच्या शिखरांवर असलेल्या ठाण्यांचे व्यवस्थापन करणे फारच अवघड असतं. आपल्याला व पाकिस्तानला देखील ! त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक अलिखित करार होता की, या महिन्यात दोन्ही देशांच्या फौजा शिखरांवरून खाली येतील. आपल्या परमनंट बेसमध्ये म्हणजे साधारणत: ९ ते १० हजार फुटावर. भारतीय सेना ठरल्याप्रमाणे आपल्या ठाण्यांपासून खाली आली. पाकिस्तानी फौजांनीसुद्धा दाखविलं की, आम्ही खाली जात आहोत. परंतु, नंतर परत जाऊन आपण खाली केलेल्या ठाण्यांवर ताबा मिळविला. कारगिल युद्धाची सुरवात येथून होते. म्हणजे आपल्या हद्दीत शिरून पाकिस्तानने आपल्या ज्या ठाण्यांवर ताबा मिळविला तेथून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना तेथून हुसकावून लावणे, हे भारतीय सेनेचे काम होतं. शत्रू पर्वतरांगांच्या शिखरावर बसला होता. भारतीय सेनेने पहाडावर चढून जाणे व हल्ला करणे अत्यंत कठीण होते. काश्मीरमध्ये १० हजार फुटानंतर प्राणवायूची कमतरता असते. थोडं चालल्यावर थकायला होतं, दम लागतो. याकरता एक्लेमेटाईसेझन करणे आवश्यक असते. १० हजार फुटापासून १२ हजार फुटापर्यंत चालत जाऊन तेथे सैनिक दिवसा थांबतात व रात्री परत खाली येतात. हे सात दिवस रोज करायचे असते.

सात दिवसांनंतर १२ हजार फुटावर लढण्याकरता सैनिक शारीरिक व मानसिक दृष्टय़ा तयार होतो. यालाच एक्लेमेटाईझेशन म्हणतात. हीच कारवाई दोन दोन हजार फुटांकरता करायची असते. कारगिल युद्धाच्या वेळेस आरोप होत होता की, इतका वेळ का लागत आहे? पर्वतीय भागातील युद्ध अतिशय अवघड असते. पुष्कळ ठिकाणी आपले हल्ले रात्रीच्या अंधारात झाले जे खूपच कठीण आहे.
कारगिल युद्धात बरेच हल्ले अतिशय दुर्गम ठिकाणांहून केल्या गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच शत्रूच्या अनपेक्षित मार्गातून जाऊन त्यावर अचानक हल्ले करण्यात यश मिळाले. अखेर भारतीय सेनेला शत्रूला हुसकावून लावण्यात यश मिळाले. कारगिल युद्धात अद्वितीय शौर्याची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी देशवासीयांच्या मनात घरे केली आहेत.

कॅप्टन विक्रम बत्राच्या कंपनीने शत्रूच्या एका ठाण्यावर विजय मिळविला. त्याच्या साहसी वृत्तीमुळे सर्व सैनिकांना तो अतिशय आवडत असे. या विजयानंतर विक्रमच्या युनिटला ४८७५ या शिखरावर हल्ला करायचा होता. त्याच्या युनिटच्या कमांडिग ऑफिसरने योजना आखली. ६ जुलै १९९९ रोजी हा हल्ला करायचा होता. नेमके त्याच दिवशी विक्रमची प्रकृती बिघडली व त्याला १०३अंश ताप आला. त्याला सांगण्यात आले की, या हल्ल्यात तो जाणार नाही. त्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो ताबडतोब म्हणाला की, मी माझ्या कंपनीसोबत या हल्ल्यात जाणारच प्रकृती ठीक नसताना देखील त्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने शत्रूवर हल्ला चढविला. हल्ला चढवीत असताना त्याला गोळ्या लागल्या व तो जबर जखमी झाला. त्या अवस्थेत पुढे सरकत जाऊन त्याने शत्रूच्या मिडीयम मशीन गनवर हातगोळे फेकले व ती गन उडविली.

जखमी झाल्यावर देखील त्याने स्ट्रेचर वरून डॉक्टरकडे जाणे अमान्य केले. तो म्हणाला की, हे शिखर आपल्या ताब्यात आल्याचं मला मरणापूर्वी बघायचय. अखेर शिखर काबीज झाले व विक्रमने अखेरचा श्वास घेतला.
कारगिल युद्धात दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सैनिकांना विनम्र अभिवादन !

वादळी कारकीर्द लाभलेला नेता… नक्की वाचा हर्षवर्धन जाधव जिवनप्रवास..

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. अतिशय शांततेत 58 मूक मोर्चे काढल्यानंतरही पदरात काहीच पडलं नाही अशी भावना झाल्याने मराठा समाज आक्रमक झालेला बघायला मिळत आहे. आरक्षणाच्या मागणीवरून 2 दिवसांपूर्वी औरंगाबाद जवळील कायगाव टोका येथील 28 वर्षीय काकासाहेब शिंदे या युवकाने गोदावरी जलपात्रात उडी घेऊन आत्मदहन केले. यानंतर भावना अधिकच तीव्र झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कन्नड सोयगावचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काल सरकारने आरक्षणाबाबत भूमिका जाहीर न केल्यास आमदारकीचा राजीनामा असल्याचे घोषित केले होते.

अद्यादेश काढण्यासाठी त्यांनी आज चार वाजेची वेळ दिली होती. चार वाजेची डेडलाईन संपल्यानंतर आज हर्षवर्धन जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनस्थळावरूनच आपल्या आमदारकीचा राजीनामा लिहलेले पत्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना मेलद्वारे पाठवून दिले आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे हर्षवर्धन जाधव हे पहिलेच आमदार ठरले आहेत. जाणून घेऊया आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविषयी खासरे माहिती…

वादळी कारकीर्द लाभलेले आमदार हर्षवर्धन जाधव-

काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य, मनसेकडून आमदार आणि नंतर शिवसेनेचे आमदार असा राजकीय प्रवास राहिलेले आमदार हर्षवर्धन जाधव हे नेहमीच चर्चेत राहणारे मराठवाड्यातील कन्नड सोयगावचे आमदार आहेत. नेहमीच स्पष्ट भूमिका घेणारे आमदार अशी त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे.

माजी मंत्री आणि कन्नडचे माजी आमदार रायभान जाधव यांचे सुपुत्र असलेले हर्षवर्धन जाधव यांना घरूनच राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांच्या आई तेजस्विनी जाधव या सुद्धा आमदार होत्या. महत्वाचे म्हणजे भाजपचे महाराष्ट्रातील महत्वाचे नेते व भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे ते जावई आहेत.

काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य असताना 2009 मध्ये त्यांनी आमदारकी लढवण्यासाठी तयारी सुरू केली. मात्र काँग्रेस कडून तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत आमदारकी लढवली. ते 2009 च्या निवडणूकित मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले.

औरंगाबाद मध्ये पोलिसांनी त्यांना मारहाण केल्यानंतर पक्षांनी त्यांना साथ दिली नाही असा आरोप करत राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यानी शिवसेनेत प्रवेश केला व ते पुन्हा आमदार झाले. नुकतेच काही दिवसांपूर्वी शिवसेनेचेच खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावीरोधात भूमिका घेत ते चर्चेत आले होते.

मराठा आरक्षणासाठी राजीनामा देऊन ते पुन्हा एकदा चर्चेत आले असून. मराठा समाजाकडून त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

विविध अभिनेत्याच्या आवाजात कचोरी विकणारा एकदा नक्की बघा

कोणत्याही व्यवसायात एखाद्या वस्तूची विक्री करण्यासाठी काही तरी नवीन शक्कल लढवली तर ती खूप फायद्याची ठरते. अनेकदा आपल्या वस्तूची विक्री करण्यासाठी मार्केटिंग चा खूप महत्त्वाचा रोल असतो. त्यामुळं मार्केटिंग करताना नवनवीन युक्त्या वापरल्या जातात. असंच काहीसं एका कचोरी वाल्याने केलं आहे. रस्त्यावर कचोरी विकणाऱ्या या युवकाने कचोरी विकण्यासाठी चक्क अभिनेत्यांचे आवाज काढलेले बघायला मिळत आहेत. बॉलीवूड मधील अनेक मोठमोठ्या सेलेब्रिटीचे आवाज काढून तो कचोरी विकतो. या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. अमरीश पुरी पासून संजय दत्तचे आवाज तो काढतो. बघा व्हिडीओ..

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

मराठा मोर्चाच्या आंदोलनात वायरल होणा-या या फोटोचे काय आहे सत्य? नक्की वाचा

नुकताच मराठा मोर्चाचे आंदोलन सुरू असताना एक फोटो भयंकर वायरल झालेला आहे. ज्यामध्ये पोलीसाच्या पाठीवर बुटाचा ठसा आहे. आणी या मेसेजमध्ये लिहण्यात आले आहे कि पाठीवर हातावर थाप देण्या एवजी बुटाने दिली आहे.
फोटोत पोलीसांची विवंचना लेखकाने मांडली आहे. परंतु हा फोटो खरच मोर्चातील आहे का. याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. खरच ही घटना मोर्चातील आहे का?

प्रत्येक फोटोला exif data असतो. हा डाटा म्हणजे माहिती फोटो कुठे काढला कोणी काढला, कधी काढला ईत्यादी बाबतीत माहिती देतो. सदर फोटोचा exif data तपासल्यास फोटो काढणा-याचे gps बंद असल्याने त्या ठिकाणची माहिती मिळाली नाही परंतु फोटो हा २२ ऑगस्ट २०१७ चा आहे. मराठा आंदोलन व या फोटोचे कसले ही देणे घेणे नाही. मुद्दाम मोर्चेक-यांवर आक्षेप निर्माण करण्या करीता हा खोडकर पणा करण्यात आलेला आहे. आपण खाली दिलेल्या फोटोमध्ये exif data बघु शकता.

सदर फोटो बारकाईने बघितल्यास लक्षात येईल की हा फोटो अपघात ठिकाणचा आहे कारण रस्त्यावरील डिवायडर वर गाडी चढलेली आहे. कदाचीत सोबतच्या पोलीस कर्मचा-यास गाडीवर चढण्याकरीता ह्या दुस-या पोलीस कर्मचाऱ्यांने मदत केली व त्याचा बुटाचा ठसा पाठीवर उमटला आहे. ठस्याच्या आकारावरुन हा पोलीस बुट आहे हे स्पष्ट दिसते. त्यामुळे या सोशल जगात एखादा फोटो वायरल करण्यापूर्वी नक्की लक्ष द्या व कुठल्याही समाजाची बदनामी होणार नाही असे पाऊल उचलु नका.

वेगवेगळ्या पेजवर फोटो वायरल करण्यात आले आहेत-

फोटोची माहिती बघितल्यावर तुम्हाला तिथे त्याची तारीख दिसेल-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

अवघ्या महाराष्ट्रात गाजलेल्या आर्चीचा हा डान्सच्या प्रॅक्टिसचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल..

आर्ची अर्थात रिंकू राजगुरूने आपल्या पहिल्याच सैराट या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. नुकताच या सिनेमाचा हिंदी रिमेक देखील रिलीज झाला आहे. रिंकू राजगुरु आता कागर या नवीन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं पोस्टर खूप दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलं होतं. आता नुकतेच या सिनेमातील एका गाण्याची प्रॅक्टिस करतानाचा रिंकुचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा सिनेमा कधी रिलीज होणार याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

मुख्यमंत्रीसाहेब मी काकासाहेब बोलतोय… वाचा काकासाहेबांचे मुख्यमंत्र्यांना पत्र..

मुख्यमंत्रीसाहेब,
मी काकासाहेब बोलतोय…

मुख्यमंत्रीसाहेब आज मी गोदावरीत उडी मारून प्राण त्याग केला. माझं आयुष्य मी संपवलं. पण मला आता तुमची चिंता लागलीय. तुमचं आता कसं होणार ? हा प्रश्न वारंवार सतावतोय, कारण साहेब आज एक काकासाहेब गेलाय, पण तुमच्या अजुन लक्षात येत नाहीय, “असे किती तरी काकासाहेब आपल्या प्राणाची बाजी लावायला तयार आहेत”.

मी तर सुरुवात केलीय, पण शेवट कोण करेल, याची कृपया वाट बघू नका. तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो, जर ही विनंती मान्य नसेल, तर तुम्हाला मग घरची “वाट” पकडावी लागेल, एवढं मात्र लक्षात ठेवा !!

सीमेवरील सैनिक क्षत्रूच्या गोळीनं शहिद होतो, त्याचा संपूर्ण देशाला अभिमान असतो. तो सैनिक कायमचा सर्वांच्या मनात घर करून राहतो. पण मी माझ्या बांधवांसाठी गोदावरीत झेप घेतली आणि माझा मृत्यू झाला. याचा मला एका सैनिकाप्रमाणे अभिमान आहे. खरं तर अनेक बांधव मला ओरडतायत, काकासाहेब हे काय केलं ? अशी आर्त आरोळी देत आहेत. पण खरं सांगू माझ्यासमोर काहीच पर्याय दिसत नव्हता. खरं तर हा गोदावरीत उडी मारून सरकारला इशारा देणं हा काही पर्यायच असू शकत नाही. पण इशारे तरी किती द्यायचे तुम्हाला ? तुम्हीच सांगा ? जगाने दखल घ्यावी असे ऐतिहासिक शांतपणे आम्ही मोर्चे काढले, काय झालं ? काय मिळालं ? याचा विचार तुम्हीपण करायला हवा. तुम्ही केलेल्या घोषणा सत्य परिस्थितीमध्ये किती उतरतायत याची माहिती तुम्ही घ्या ? म्हणजे तुम्हाला कळेल, खदखद काय आहे !

आम्ही साधी माणसं आहोत. प्रत्येकाला स्वप्न बघायचा अधिकार आहे आम्हीही ते बघतो पण आकाशात झेप घेताना पंखात जे बळ लागतं तेच बळच आमच्याकडे नाहीय मग तुम्ही सांगा आम्ही आकाशात झेप घ्यायचं स्वप्न कसं बधायचं ?

आषाढी एकादशीला पंढरपूरात विठूरायाची पूजा करायला तुम्हाला जाता आलं नाही, तुम्ही म्हणता” *दगडफेक करून आरक्षण मिळत असेल तर मी तयार आहे*” साहेब जर एवढंच हिंसक बनायचं असतं, तर आतापर्यंत झालेले ऐतिहासिक मोर्चे हे शांतेतेच्या मार्गानं झाले नसते. लाखोंच्या संख्येने झालेल्या मोर्चानंतर रस्त्यावर साधा एक पाण्याचा ग्लास दिसला नाही तो तुमचं डोकं कशाला फोडेल ?

दुसरं तुम्ही सापांबद्दल बोललात, साहेब हे काही आपल्याला पटलं नाही. पंढरपूरात पुजेला न जाण्याच्या निर्णयानंतर तुमची सोशल मीडिया चांगलीच सज्ज झाली होती. तुमच्या समर्थनासाठी फेक अकांउटवरून अतिरिक्त फौज मागवली होती. माझा प्रश्न एकच आहे पण कशासाठी ? सहानुभूतीसाठी ?

आजच्या आषाढी एकदाशीला जसा माझा वारकरी पाडुरंगाचं दर्शन घेऊन घराकडे जातो मला वाटतंय महाराष्ट्राच्या जनेतेचं दर्शन झालं असेल तर आता तुमचीही घरी जायची वेळ आलीय. सत्तेवर आल्यापासून मोर्चे, दंगली, हत्यांचे प्रमाण काही कमी झालेले नाहीय. मराठा, दलित, धनगर, मुस्लिम, आदिवासी, अशा विविध समाजाच्या लोकांनी तुमच्या कारकिर्दीत ऐतिहासिक मोर्चे काढले. माझा शेतकरी बांधव तुमच्याच कारकीर्दीत संपावर गेला. दुधासाठी सलग चार दिवस आंदोलन झालं. शेकडो किलोमीटरची पायपीट करत नाशिकवरून किसान मोर्चा मुंबईत दाखल झाला, यापेक्षा तुमचं अपयश ते काय?

बस्स करा आता, आता नाही सहन होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सत्तेवर आलात, पण महाराजांच्या नावाला साजेसं असं काम तुम्हाला करता आलं नाहीय. तुमचं हे अपयश आहे. आज जे मी केलं आहे त्यामुळे माझा आत्मा शांत असेल पण इतरांचे पेटलेले आत्मे शांत करताना तुमचा दम निघेल.मी फक्त एक ठिणगी पेटवली आहे, वेळीच दखल घेतली नाही तर वणवा पेटून राख व्हावला वेळ लागणार नाही.
-वैभव परब

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

आज साबुदाणा खाल्लाच असेल एकदा बघा साबुदाणा कसा बनतो..

आषाढी एकादशीही आली. महाराष्ट्रात लाखो लोकांचा हा उपवासाचा दिवस. “एकादशी- दुप्पट खाशी” असा वाक्प्रचार या आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रचलित झालाय. कारण सहाजिकच आहे. या दिवशी बर्‍याच लोकांच्या उपवासाच्या थाळीमध्ये अनेक सुग्रास खाद्यपदार्थ असतात. बटाट्याचा किंवा रताळ्याचा कीस, शिंगाड्याचा शीरा, उपवासाच्या भाजणीचे थालिपीठ, राजगिर्‍याच्या पुर्‍या आणि अर्थातच साबुदाण्याची खीर किंवा खिचडी ! भारतात साबुदाण्याचे उत्पादन तामिळनाडुतील सालेम परिसरात होते. कोइंबतूर ते सालेम या भागातील हा एक मोठा उद्योग आहे. अनेक लोकांना यातून रोजगार मिळतो. काहींच्या मते या भागातील हा उद्योग बंद पाडण्यासाठी केलेले हे कारस्थान आहे.