या व्यक्तीमुळे शिवसेना पोहचली घराघरात आणि गावागावात…

एका सामान्य घरात जन्मलेला एक तरुण घर चालवण्यासाठी कधी दुध टाकायचा तर कधी पेपर टाकायचा पण लोकांच्या मदतीला जात असे लोकांना मदत करत गेला त्यातून मोठा मित्र परिवार जमला.वयाच्या २३ वी मध्ये जय अंबे नावाने मंडळ काढून लोकांची सेवा केली नंतर शिवसेनेत प्रवेश करून १०० टक्के समाजकारण हाच वसा त्याने घेतला आणि दिला त्यातून शिवसेना हा पक्ष वाढला. कार्यकर्त्याच्या घरातील राशनवर पण आनंद दिघे यांचे लक्ष असायचे त्यामुळे त्यांच्या साठी जीव देणारे अनेक कार्यकर्ते तयार झाले.मुस्लीम किंवा हिंदू असा भेद नाही कोणीच कोणावर अन्याय करायचा नाही आणि अन्याय ज्यांनी केला तो कोणीही असो त्याला सोडायचे नाही.

‘शिवसेनेचे ठाणे-ठाण्याची शिवसेना’ असा नारा देत गेल्या ४५ वर्षांपासून सर्वार्थाने ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला.ठाणेकरांनी शिवसेनेला भरभरून दिले आणि त्यामुळेच ‘शिवसेनेचे ठाणे’अशी या शहराची राजकीय ओळख निर्माण झाली.१९६७ मध्ये वसंतराव मराठे यांच्या रूपाने शिवसेनेला ठाण्याने पहिला नगराध्यक्ष दिला. शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत हे पहिले आणि तितकेच महत्त्वाचे यश होते. साहजिकच तेव्हापासून गेली चार दशके या शहरावर शिवसेनेची एकहाती हुकूमत राहिली आहे. आनंद दिघे म्हणजे तर शिवसेनेचा ढाण्या वाघच. आनंद दिघे हे जिल्ह्य़ातील राजकीय वाटचालीत एकमेव असे निर्विवाद नेतृत्व मानले गेले. आनंद दिघे यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या ठाणेकरांनी सलग १९ वर्षे महापालिका शिवसेनेच्या ताब्यात ठेवली.

स्वर्गीय दिघे यांचेही ठाणेकरांशी जिव्हाळयाचे नाते होते. शहरातला टेंभी नाका हा केवळ शिवसैनिकांसाठी नाही, तर सर्वसामान्य ठाणेकरांसाठीही न्यायमंदिर होते. दिघे यांच्या कार्यपद्धतीविषयी कदाचित वेगवेगळे मतप्रवाह असतीलही, परंतु या शहरावर दिघेंची हुकूमत निर्विवाद होती, हे कुणालाही नाकारता येणार नाही. ठाणे आणि शिवसेना यांच्यामधील हा दुवा एकप्रकारची ऐतिहासिक ठेव मानली पाहिजे. जोवर आनंद दिघे होते तोवर शिवसेनेपेक्षा दिघे यांच्यावर विश्वास ठेवून आणि दिघेंच्या पश्चात त्यांच्या कार्याची पोहोचपावती म्हणून ठाणेकरांनी शिवसेनेच्या पारडय़ात मतांचे भरभरून दान घातलेय. १९८९ मध्ये आनंद दिघे यांनी ठाण्याला मुंबईतील बेस्टच्या धर्तीवर उत्तम सार्वजनिक व्यवस्था मिळावी म्हणून ‘टीएमटी’ परिवहन सेवा सुरू केली. स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र निर्णयक्षमता परिवहनला दिला. सामाजिक एकोपा, जनजागृती आणि प्रबोधन असे व्यापक उध्दीष्ठ डोळ्यासमोर ठेवून मा.धर्मवीर श्रीमंत श्री. आनंद दिघे साहेब यांनी टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवास प्रारंभ केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव चालू राहिला व अल्पावधितच तो भक्तांचे श्रध्दास्थान म्हणून गणला जावु लागला. आज ही त्यांनी घालुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत या उत्सवाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.

ठाणे जिल्हय़ात ९०च्या दशकात शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी केले. दिघे यांच्या कार्यपद्धतीवर लोकशाहीवर प्रेम करणारा माणूस विश्वास ठेवेलच याची शाश्वती नाही. पण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना थेट मोखाड्याच्या पाड्यापर्यंत पोहोचवण्याचे काम दिघे यांनी यथाशक्ती केले. रिक्षाचालक असणारे एकनाथ शिंदे हे सर्व काही पाहत होते. रिक्षा चालवता चालवता ते विजू नाटेकर रिक्षा युनियनमध्ये सक्रिय झाले. याच दरम्यान किसननगर येथे शिवसेनेचे काम त्यांनी सुरू केले. हळूहळू शाखाप्रमुख म्हणून शिंदे यांचा शिवसेनेत वावर वाढला. दिघे यांच्या नजरेस शिंदे यांचे काम भरल्याने त्यांनी शिंदेंना महापालिकेच्या निवडणुकीत उभे केले. शिंदे निवडून आले. शिंदे हे २०००मध्ये सातारा येथे सहलीसाठी गेले असताना त्यांच्या दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. हे दु:ख शिंदे यांनी विसरण्यासाठी त्यांना दिघे यांनी महापालिकेत सभागृह नेतेपद बहाल केले, असे जुने जाणते शिवसेना कार्यकर्ते सांगतात. त्यानंतर त्यांच्या राजकारणाचा आलेख वाढतच राहिलेला आहे.

ठाणे व ठाणे जिल्हय़ावर, विशेषतः आनंद दिघेंवर बाळासाहेबांचे उदंड प्रेम.प्रत्येक निवडणुकीला शिवसेनाप्रमुख ठाण्यात यायचे. त्यांच्या सभा व्हायच्या, त्यांच्या भाषणाला तुफान गर्दी व्हायची. `मला ठाण्याची चिंता नाही. ठाणेकर माझे सगळे उमेदवार विजयी करतील, याची मला खात्री आहे. त्यामुळे मी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात एखादी सभा घेईन,’ अशा शब्दात ते ठाणेकरांवर विश्वास व्यक्त करत. `ठाणे जिल्हा माझा जिल्हा आहे. मी ज्या दगडाला शेंदूर फासेन, त्याला ठाणेकर विजयी करतील.’ याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी बेलापूरमधील दिग्गज उमेदवार गणेश नाईक यांच्या विरोधात सीताराम भोईर यांना आमदारकीसाठी उभे केले. यावर आनंद दिघे यांनी सर्वस्व पणाला लावून गणेश नाईकांसमोर काहीशा नवख्या अशा सीताराम भोईर यांना निवडून आणले. ठाण्याच्या विधानसभा मतदारसंघात चार भाग झाले तेव्हा ३ जागांवर शिवसेना निवडून आली. एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि राजन विचारे असे तिघेजण आमदार झाले.

ज्यावेळी उद्धव व राज यांच्यात धुसफूस सुरू होती, तेव्हा आनंद दिघे अस्वस्थ होते. या दोन्ही भावात संघर्ष झाल्यास आपण हिमालयात जाऊ किंवा शिवसेना प्रमुखांजवळ जाऊन राहू. २६ ऑगस्ट २००१, रोजी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचा अपघाती मृत्यू झाल्याने अवघा महाराष्ट्र हळहळला होता. आनंद दिघे यांच्या मृत्यूपश्चात शिवसैनिकांच्या उद्रेकावेळी सुलोचनादेवी सिंघानिया इस्पितळाला आग लावण्यात आली होती. या आगीत हे संपूर्ण इस्पितळ आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. त्यामुळे गेली आठ वर्षे तेथे इस्पितळाच्या इमारतीचा सापळा उभा होता. आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल आज हि शिवसैनिकांच्या मनात एक शंका आहे.

२७ जानेवारी हा आनंद दिघे यांचा जन्मदिन. बाळासाहेबांनी दिघे यांच्यावर पुत्रवत प्रेम केले. बाळासाहेब आणि दिघे या दोन नेत्यांमधील असलेले विश्वासाचे नाते शेवटपर्यंत टिकून होते. दिघे शिवसेनेच्या वाटचालीतील अनेक घटनांचे साक्षीदार होते. धगधगती मशाल होती. गुंडगिरीबरोबरच समांतर सरकार राबवीत असल्याचा आरोप त्यांच्यावर नेहमीच झाला. त्यांची निष्ठा होती ती शिवसेनाप्रमुखांवर आणि शिवसेनेवर. मुक्त हस्ते मदत हाच त्यांचा धर्म होता. त्यांच्या “दरबारा’त म्हणूनच साधुसंताबरोबरच मुल्ला-मौलवी, पाद्रीही दिसत. चार खासदार, आठ-दहा आमदार निवडून आणण्याची ताकद ज्या माणसाकडे होती, ते दिघे आमदारच काय मंत्रीही झाले असते; परंतु आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांप्रमाणे एकच पद घेऊन शिवसेनेत जगले. ते पद होते “शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख”.

कसाब विरुद्ध साक्ष दिली म्हणून साधं भाड्याने घरही देत नाहीयेत लोकं…

ज्या धाडसी मुलीच्या साक्षीमुळे मुंबईवरील भ्याड हल्ल्यातील आतंकवादी अजमल कसाबला फाशी झाली, त्याच मुलीला या साक्षीमुळे आज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिला एक साधं भाड्याने घर देण्यास सुद्धा लोकं नकार देत आहेत. तिला मुंबईत अक्षरशः घर भाड्याने घेण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे. मुंबईची रहिवासी असलेल्या देविका रोटावनला तिने केलेल्या देशसेवेबद्दल मोठी किंमत चुकवावी लागत आहे. या परिवाराला भाड्याने घर दिल्यास त्यांच्या देशभक्तीमुळे आपल्यावर सुद्धा संकट येईल अशी भीती लोकांमध्ये आहे.

आपण केलेल्या देशभक्तीमुळे एवढी मोठी किंमत मोजावी लागेल याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. मुंबईचा 26/11 हल्ला होऊन नऊ वर्षे लोटली तरी देविका आणि तिच्या वडिलांना या साक्षेची किंमत मोजावी लागत आहे. 26/11 हल्ला झाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जेव्हा कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल बेछूट गोळीबार करत होते तेव्हा देविका भाऊ आणि वाडीलांसह तिथे होती. तिच्या पायात कसाबची एक गोळीही लागली होती. यानंतर देविका आणि तिचे वडील सरकारी साक्षीदार बनले होते. यांनातर कसाबला फाशी झाली होती.

अंतर ठेवून आहेत नातेवाईकही-

देविका आणि नटवरलाल यांनी सांगितले की एवढे वर्षे उलटूनही गावकडील नातेवाईक आमच्या सोबत संबंध ठेवल्यास ते सुद्धा आतंकवाद्यांच्या निशाण्यावर येतील या भितीने अंतर ठेवून आहेत. याचाच परिणाम म्हणजे त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाने लग्नपत्रिकेत त्यांचे नाव टाकले नाही. नटवरलालमुलगी देविका आणि मुलगा जयेश सोबत बांद्रा मधील भाड्याच्या घरात राहतात. जिथंही ते राहायला जातात तिथे लोकं त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कारण काय तर त्यांनी 26/11 हल्ल्यामुळे कोर्टात साक्ष दिली. पुण्यात राहणाऱ्या देविकाच्या मोठ्या भावानेची त्यांच्यापासून दूर राहणे पसंत केले आहे. त्याने याना साधं लग्नाला सुद्धा बोलवलं नाही.

मोदींकडून सुद्धा नाही मिळाले उत्तर-

नियमित घर बदलावा लागत असल्याने नटवरलाल यांची इच्छा होती की त्यांना सरकारी कायमस्वरूपी घर मिळावं. या समस्येला कंटाळून देविकाने पंतप्रधान मोदींनाही पत्र लिहिले आहे. पण त्याच अजून काही उत्तर नाही मिळालं. त्यांना मोदींना भेटून ही समस्या मांडायची आहे पण मोदींची भेट काही त्यांना मिळाली नाही. त्यांनी खुप प्रयत्न करूनही त्यांना यश मिळालं नाही. सध्या देविका घक्त 19 वर्षाची आहे. पण या हल्ल्यामुळे तिचे शिक्षण प्रभावित झाले आहे. शाळेतील परीक्षा सुद्धा ती नापास झाली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

प्रजासत्ताक दिनाच्या शिवरायांच्या चित्ररथात झाली फार मोठी चुक वाचा लेख..

दिल्ली येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ राजपथावर अवतरला याचा अभिमान वाटला परंतु ज्या राजाने दिल्लीच्या औरंगजेबाला भरल्या दरबारात डोळ्यात डोळे घालून अपमानास्पद वागणूकीबद्दल ठणकावून महाराष्ट्राची अस्मिता जोपासली त्याच दिल्लीवर राजाचा खाली मान झुकलेला अश्वारूढ पुतळा मिरवला गेला. अरे गावात साधं घरात लावायला शिवरायांचे पोष्टर जरी घ्यायचे म्हणले तरी राजाच्या बाणेदार नजरेला आपण महत्व देतो पण ज्या सोहळ्यावर साऱ्या जगाचे लक्ष होते त्या महाराष्ट्राच्या चित्ररथातल्या महाराजांच्या मुर्तीची नजर उंच आणि मान ताठ दाखवणे बंधनकारकच असायला हवे होते.

मी कुणी ईतिहासकार वगैरे अजिबात नाही. परंतु महाराजांच्या विचारावर प्रेम करणारा एक युवक या नात्याने मला एवढं तरी नक्कीच कळतं की माझ्या राजाने दिल्लीत कधीच मान झुकवली नव्हती. मग हा चित्ररथातला पुतळा नेमका असाच का बरं बनवला? तो बनवताना एवढी साधी गोष्ट का बरं कुणाच्या लक्षात आली नाही? एरवी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बनवताना उधळलेल्या घोड्यावर बसुन तलवार उंच उगारलेली, मान ताठ ठेवून महाराजांची नजर आभाळाकडे असते मग नेमकं या चित्ररथातल्या दर्शनीय पुतळ्यातच तलवार जमिनीकडे, मान आणि नजर झुकलेली असे का बरे ? हि मुर्ती बनवलेल्या त्या कलाकाराच्या कलेला मी दाद देतो परंतु चित्ररथावरची मुर्ती अशीच असावी अशी संकल्पना मांडलेल्या मेंदुचा मी निषेध करतो.

महाराजांची प्रतिभा, किर्ती, पराक्रम, साहस, आणि अस्मिता या एका चित्ररथामुळेच प्रचंड वाढली किंवा कमी झाली हा विषय नाही परंतु जर दिल्लीत राजाची मुर्ती मिरवायची होती तर नजर आणि मान ताठच असायला हवी होती असे मला वाटते. बाकी सगळ्या गोष्टींत भव्य दिव्यता नसती तरी चालले असते पण निदाना नजरेत तरी ती दाखवायला हवी होती. आज हा चित्ररथ शेअर करताना करोडो लोकं पाहिली परंतु राजाच्या नजरेकडे कुणाचे लक्ष गेले नाही याचे दुःख वाटले. या चित्ररथातली शिवरायांची झुकलेली नजर पाहुन तो व्हिडीओ शेअर करण्याची माझी ईच्छाच नाही झाली. उलट सकाळपासुनच राजाची ही खिन्न मुद्रा पाहुन माझ्या मनात कालवाकालव सुरू होती. सरतेशेवटी मनातुन उचंबळून बाहेर पडलेला माझा हा वैयक्तिक विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जिवावर आपल्या सर्वांसमोर मांडला आहे. अखेरीस एवढंच वाटतं की; महापुरूषांसंदर्भातली कोणतीही गोष्ट बनवताना, दाखवताना, लिहिताना, बोलताना आणि मिरवताना खबरदारी घ्यायलाच हवी अन्यथा विचारांची विटंबना होते जी सहजा सहजी भरून काढता येत नाही.

ज्यांना छत्रपतींचा ईतिहास माहित नाही त्यांनी फक्त कलाकृती पाहुण आनंद व्यक्त करणे स्वाभाविक आहे परंतु ज्यांना माहित आहे त्यांनी तरी निदान विचार करावा. महापुरूष हे मुर्त्यामध्ये जिवंत नसुन ते विचारांनी जिवंत आहेत पण जर मुर्त्यांतून कुणी विचार मारण्याचा प्रयत्न करत असेल तर हे कदापी खपवून घेतले जाणार नाही.
लेखक : प्रा.विशाल गरड
Source https://vishalgarad.blogspot.in

प्रजासत्ताक दिनाच्या शिवरायांच्या चित्ररथात झाली फार मोठी चुक वाचा लेख..

दिल्ली येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ राजपथावर अवतरला याचा अभिमान वाटला परंतु ज्या राजाने दिल्लीच्या औरंगजेबाला भरल्या दरबारात डोळ्यात डोळे घालून अपमानास्पद वागणूकीबद्दल ठणकावून महाराष्ट्राची अस्मिता जोपासली त्याच दिल्लीवर राजाचा खाली मान झुकलेला अश्वारूढ पुतळा मिरवला गेला. अरे गावात साधं घरात लावायला शिवरायांचे पोष्टर जरी घ्यायचे म्हणले तरी राजाच्या बाणेदार नजरेला आपण महत्व देतो पण ज्या सोहळ्यावर साऱ्या जगाचे लक्ष होते त्या महाराष्ट्राच्या चित्ररथातल्या महाराजांच्या मुर्तीची नजर उंच आणि मान ताठ दाखवणे बंधनकारकच असायला हवे होते.

मी कुणी ईतिहासकार वगैरे अजिबात नाही. परंतु महाराजांच्या विचारावर प्रेम करणारा एक युवक या नात्याने मला एवढं तरी नक्कीच कळतं की माझ्या राजाने दिल्लीत कधीच मान झुकवली नव्हती. मग हा चित्ररथातला पुतळा नेमका असाच का बरं बनवला? तो बनवताना एवढी साधी गोष्ट का बरं कुणाच्या लक्षात आली नाही? एरवी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बनवताना उधळलेल्या घोड्यावर बसुन तलवार उंच उगारलेली, मान ताठ ठेवून महाराजांची नजर आभाळाकडे असते मग नेमकं या चित्ररथातल्या दर्शनीय पुतळ्यातच तलवार जमिनीकडे, मान आणि नजर झुकलेली असे का बरे ? हि मुर्ती बनवलेल्या त्या कलाकाराच्या कलेला मी दाद देतो परंतु चित्ररथावरची मुर्ती अशीच असावी अशी संकल्पना मांडलेल्या मेंदुचा मी निषेध करतो.

महाराजांची प्रतिभा, किर्ती, पराक्रम, साहस, आणि अस्मिता या एका चित्ररथामुळेच प्रचंड वाढली किंवा कमी झाली हा विषय नाही परंतु जर दिल्लीत राजाची मुर्ती मिरवायची होती तर नजर आणि मान ताठच असायला हवी होती असे मला वाटते. बाकी सगळ्या गोष्टींत भव्य दिव्यता नसती तरी चालले असते पण निदाना नजरेत तरी ती दाखवायला हवी होती. आज हा चित्ररथ शेअर करताना करोडो लोकं पाहिली परंतु राजाच्या नजरेकडे कुणाचे लक्ष गेले नाही याचे दुःख वाटले. या चित्ररथातली शिवरायांची झुकलेली नजर पाहुन तो व्हिडीओ शेअर करण्याची माझी ईच्छाच नाही झाली. उलट सकाळपासुनच राजाची ही खिन्न मुद्रा पाहुन माझ्या मनात कालवाकालव सुरू होती. सरतेशेवटी मनातुन उचंबळून बाहेर पडलेला माझा हा वैयक्तिक विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जिवावर आपल्या सर्वांसमोर मांडला आहे. अखेरीस एवढंच वाटतं की; महापुरूषांसंदर्भातली कोणतीही गोष्ट बनवताना, दाखवताना, लिहिताना, बोलताना आणि मिरवताना खबरदारी घ्यायलाच हवी अन्यथा विचारांची विटंबना होते जी सहजा सहजी भरून काढता येत नाही.

ज्यांना छत्रपतींचा ईतिहास माहित नाही त्यांनी फक्त कलाकृती पाहुण आनंद व्यक्त करणे स्वाभाविक आहे परंतु ज्यांना माहित आहे त्यांनी तरी निदान विचार करावा. महापुरूष हे मुर्त्यामध्ये जिवंत नसुन ते विचारांनी जिवंत आहेत पण जर मुर्त्यांतून कुणी विचार मारण्याचा प्रयत्न करत असेल तर हे कदापी खपवून घेतले जाणार नाही.
लेखक : प्रा.विशाल गरड
Source https://vishalgarad.blogspot.in

अपमानाचे उत्तर देण्याकरिता त्याने घेतल्या पगडीला मँचिंग जगातील सर्वात महाग गाड्या…

सिंघ इस किंग म्हणतात हे खरच आहे. पंजाबी लोकाच्या आत्मसन्मानाच्या गोष्टी प्रसिद्ध आहे. यात आणखी एका व्यक्तीची भर पडली आहे. रुबेन सिंघ यांची स्वतःचा अपमान केला म्हणून यांनी जे उत्तर दिल त्या घटनेचा संपूर्ण जगात बोलबोला होत आहे. आज खासरेवर बघूया कोण आहे रुबेन सिंघ आणि काय होता तो प्रसंग

रुबेन सिंग यांना ‘ब्रिटीश बिल गेट्स’ म्हणूनही ओळखतात. ९० च्या दशकात त्यांचा ‘मिस अॅटिट्यूड’ हा कपड्यांचा ब्रँड प्रसिद्ध होता. २००७ मध्ये ते कर्जबाजारी झाले. पण, ते पुन्हा शून्यातून उभे राहिले आणि व्यवसायात आपला जम बसवला. रुबेन सिंग हे ‘ऑल डे पा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी कपड्याचा ब्रँड सुरु केला होता हे विशेष आहे. रुबेन सिंघ याच्या प्रयत्नाने त्यांचे साम्राज्य परत उभे राहिले आहे. सध्या रुबेन सिंग परत एकदा चर्चेत आले ते म्हणजे त्यांच्या पगडी वरून. त्यांच्या पगडीचा झालेला अपमानाचे उत्तर त्याने चांगलेच दिले आहे. आपल्या पगडीला साजेश्या रोल्स रॉयस उभ्या करून त्यांनी सोशल मिडीयावर फोटो अपलोड केला आहे. रोल्स रॉयस हि जगातील उच्चभ्रू लोकांची पसंद आहे या गाडीची किंमत ५.२५ करोड पासून सुरवात आहे. रुबेन सिंघ यांनी एक दोन नाही तर तब्बल ७ रोल्स रॉयस गाड्या सोबत साजेशी पगडी घालून तहलकाच केला आहे. रुबेन सिंग सोबत परंतु असा कोणता मोठा अपमानाचा प्रसंग झाला कि त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला हे बघूया.

ब्रिटनमधल्या एका व्यावसायिकाणे काही दिवसांपूर्वी रुबेन सिंग यांची खिल्ली उडवली कि ‘तुमच्या डोक्यावर बांधलेली पगडी ही मलमपट्टी केल्यासारखी भासते’ यावर रुबेन सिंग यांनी त्याला सांगितल कि “ही पगडी भलेही तुम्हाला हास्यास्पद वाटू शकते पण, आमच्या पेहरावाचा आम्हाला अभिमान आहे. ही पगडी आमच्या संस्कृतीचा भाग आहे पण ती पगडी माझा स्वाभिमानदेखील आहे’ इतकंच नाही तर पेहरावावरून कमी लेखणाऱ्या ब्रिटीश माणसाला त्यानी एक आवाहन देखील दिलं. माझ्या प्रत्येक पगडीला मॅचिंग गाडी माझ्याकडे आहे असं सांगत त्यांनी आपल्या आलिशान रोल्स-रॉयससोबत आपले फोटो शेअर केले. आठवडाभर सुरू असलेल्या रुबेन सिंग यांच्या ‘टर्बन चॅलेन्ज’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळाली. रुबेन यांनी दरदिवशी आपल्या आलिशान रोल्स-रॉयसगाडीसोबत एक एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. यात आपल्या डोक्यावर असणार्या पगडीला मॅचिंग आलिशान गाडी आपल्याकडे आहे हे त्यांनी कमी लेखणाऱ्या माणसाला दाखवून दिलं. त्यामुळे एखाद्याच्या कपड्यावरून त्याला हिणवणाऱ्या ब्रिटीश व्यक्तीला चांगलीच चपराक बसली.

याला म्हणतात स्वाभिमान परत तो इंग्रज भारतीयांची खिल्ली उडविणार नाही… लेख आवडल्यास अवश्य शेअर कराच..

बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईत चंपासिंग थापा `खास माणूस`

बाळासाहेब ठाकरे हे उभ्या महाराष्ट्रातील अनेकांचे गळ्यातील ताईत होते. पण बाळासाहेब यांच्या गळ्यातील ताईत कोणी झालं असेल तर त्यांचे सेवक चंपासिग थापा हे होय. २७ वर्षांपूर्वी ते नेपाळहून मुंबईत आले . गोरेगावात रस्त्यावर काही तरी छोटीमोठी ते कामे करत असत . शिवसेनेचे भांडुपमधील तत्कालीन नगरसेवक दिवंगत के . टी . थापा यांच्या संपर्कामुळे ते ` मातोश्री ` त शिवसेनाप्रमुखांचे सेवक म्हणून रुजू झाले. बाळासाहेबांचे जेवण, औषधे अशा प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची माहिती थापा यांनी जाणून घेतली . त्यामुळे अल्पावधीतच ते शिवसेनाप्रमुखांच्या गळ्यातील ताईत बनले. थापांचा सेवाभाव , काम करण्याची धडाडी यामुळे शिवसेनाप्रमुख त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करत . मीनाताई ठाकरेंनतर शिवसेनाप्रमुखांची काळजी घेणारी दुसरी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख झाली . बाळासाहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांची सावली बनून राहिले .

` मातोश्री ` त शिवसेनाप्रमुखांच्या रूमशेजारीच थापा यांची छोटी खोली आहे. बाळासाहेब सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी थापांची धावपळ सुरू असायची. थापा यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. दोन मुलांची नेपाळमध्ये मेडिकलची दुकाने असून एक मुलगा व्यवसायानिमित्त दुबईत असतो. थापांचे कुटुंब नेपाळमध्ये असले तरी त्यांचे सर्वस्व ` मातोश्री ` त आहे. बाळासाहेबांच्या वाढदिवसाला दरवर्षी नेपाळमधून रुद्राक्ष आणून त्याने त्यांची तुला करायची आणि ती वाटायची या शिवसनेच्या नेपाळ शाखेच्या उपक्रमात थापा हिरीरीने पुढाकार घेत. नेपाळमधील शिवसैनिकांना थापा हा नेहमीच आधार वाटत राहिला आहे.

बाळासाहेब मुंबईबाहेर दौऱ्यावर जाताना त्यांची बॅग भरण्यापासून त्यांना आवश्यक त्या गोष्टी बॅगेत घेतल्या आहेत की नाही याची खबरदारी थापा घेत. बाळासाहेबांचे आवडते लेखक पु. ल. देशपांडे यांच्या एकपात्री प्रयोगाच्या कॅसेट्स , सीडी , प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या व्याख्यानाच्या सीडी घ्यायला थापा कधीच विसरत नसत. बाळासाहेबांच्या सुरक्षारक्षकांच्या नजरेमधून थापा यांचीही नजर फिरत असे.
शिवसेनाप्रमुखांच्या व्यस्त अशा दैंनदिन कार्यक्रमामुळे थापा यांना सारखे नेपाळला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे दोन वर्षांतून एकदा ते नेपाळला जात असत. शिवसेनाप्रमुखांना भेटायला येणारी मंडळी थापा यांना दिवाळी वगैरे सणात काही भेटवस्तू देत असत. त्या वस्तू साठवून ठेवून नेपाळला जाताना ते घेऊन जात. या भेटवस्तू इतक्या असत की त्यांना एक ट्रेनची अख्खी बोगी बुक करावी लागत असे. या भेटवस्तू ते नेपाळमध्ये जाऊन लोकांना वाटत असत. आपल्या गावचा माणूस शिवसेनाप्रमुखांसारख्या बड्या नेत्याच्या सानिध्यात असतो याचे गावकऱ्यांना खूप कौतुक वाटत असे. त्या प्रेमापोटी त्यांचा गावात ठिकठिकाणी सत्कारही करण्यात येत असे.

पाटील या शब्दाची सुरूवात कोणी व कशासाठी केली?

चछत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्यविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा साम्राज्य उभे केले. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष, कल्याणकारी राजा असलेले छत्रपती शिवाजी महाराराज सदैव हिंदवी स्वराज्यातील प्रजेच्या हितासाठी प्रयत्नशील असत. महाराजांकडे अनेक निस्वार्थीपणे सेवा करणारे मावळे होते. महाराजांनी त्याकाळी विविध पदे देऊन मावळ्यांची रयतेच्या सेवेसाठी निवड केलेली होती. त्यापैकी एक म्हणजे पाटील. पाटील या शब्दाची सुरूवात कोणी व कशासाठी केली याविषयी अनेकांना नेहमी प्रश्न पडतो. पाटील या शब्दाची सुरुवात कशी झाली याविषयी आपण जाणून घेऊया…

उत्तर:- पाटील हा नुसता शब्द नसून शिवरायांनी दिलेली एक जबाबदारी आहे. हिंदवी स्वराज्य आकाराने मोठे असल्याने स्वराज्याचा कारभार स्वच्छ व जनहिताचा व्हावा. यासाठी अनेक लहान मोठे प्रांत शिवरायांनी पाडले, अत्ताचे हे “जिल्हे.” रयतेचे प्रश्न सोडवीण्यासाठी हर एक प्रांतावर निस्वार्थी पणाने अहोरात्र अविरत एकनिष्ठे काम करणारे अधिकारी नेमले आणि त्या अधिका-यांना पदे दिली ते म्हणजे पाटील. छत्रपती शिवरायांनी आदेश दिले तुमच्या घरात काहीही शिल्लक नाही राहीले तरी चालेल, परंतू रयतेला (जनतेला) कोणत्याही गोष्टीच कमी पडू देवू नका. स्वराज्यात एकही दिवस कोणी “उपाशी” झोपता कामा नये नाहीतर त्याची गय केली जाणार नाही ‘म्हणून हिंदवी स्वराज्य हे सुराज्य होते.’ या पाटीलकीची सुरवात म्हणजेच स्वराज्याचा पहीला पाटील “”नागनाक”” या मावळ्या पासून केली…
पा – पालन करणारा टी – टिकुन ठेवणारा ल – लक्ष देणारा

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
अधिक वाचा: चिमुकलीच्या पत्राला ९१ वर्षीय आमदार गणपतराव देशमुख यांनी दिलेले उत्तर नक्की वाचा..
अधिक वाचा: महिला नागा साधूंचे काही धक्कादायक रहस्य, पुरुष नागा साधुपेक्षा वेगळ्या असतात महिला नागा साधू
अधिक वाचा: छत्रपती उदयनराजे भोंसले यांच्या बद्दल ह्या गोष्टी आपणास माहिती आहे का ?
अधिक वाचा: जाणून घ्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील हि चिमुरडी आहे तरी कोण?

चिमुकलीच्या पत्राला ९१ वर्षीय आमदार गणपतराव देशमुख यांनी दिलेले उत्तर नक्की वाचा..

शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्यातील आमदार गणपतराव देशमुख हे आपल्या साध्या राहणीमानामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीत ११ वेळा आमदार होण्यामागे या बाबीचाही मोठा वाटा आहे. नुकतेच एका विद्यार्थीनीने त्यांच्याकडे गावात बसचा थांबा करावा अशी मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा करून आमदार देशमुखांनी तसे पत्रही विद्यार्थीनीला पाठविले आहे. त्यामुळे परिसरात आमदार गणपतराव देशमुखांची कार्यशैली चर्चेचा विषय ठरली आहे.

मोहोळ तालुक्यातील पेनूरच्या प्रेरणा विष्‍णू गवळी या मुलीने आमदार देशमुख यांना मोहोळला कॉलेजला जाण्यासाठी गावात बस थांबत नसल्याबद्दल पत्र लिहले होते. याठिकाणाहून मोहोळला जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या जास्‍त आहे. त्यामुळे बसमध्ये जास्‍त गर्दी होते. तसेच काही विद्यार्थ्यांना जागाही मिळत नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते, अशा आशयाचे पत्र लिहले होते. तसेच या बाबत पाठपुरावा करून सकाळी ७ ते ८.१५ दरम्यान दुसर्‍या बसला थांबा करण्याची विनंती केली होती.

या पत्राची दखल घेऊन आमदार देशमुख यांनी पंढरपूर आगारप्रमुखांना फोन करून दुसर्‍या बसला थांबा देण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पेनुर येथे पंढरपूर-सोलापूर बस सकाळी ८ वाजता थांबणार आहे, असे आमदार देशमुख यांनी पत्राद्वारे प्रेरणा गवळी हिला कळविले. तसेच पत्रात आमदार देशमुख यांनी, विद्यार्थीनीने पत्र पाठविले तेव्‍हा अधिवेशनासाठी नागपुरात होतो. दुसरे पत्र मिळाल्यानंतर आगारप्रमुखांशी बोलून निर्णय झाल्याचे म्‍हटले आहे. आमदार गणपतराव देशमुख सांगोला विधानसभा मतदार संघातून आमदार आहेत. त्यांची कर्मभूमी सांगोलाच असली तरी त्यांची जन्‍मभूमी मोहोळ तालुक्यातील पेनूर हे गावच आहे.

रिलीज से पहले लीक हुआ फिल्म ‘पद्मावत’ का वीडियो…

संजय लीला भंसाली की फिल्म पद्मावत 25 जनवरी को सिनेमाघरों में आ रही है। लेकिन इसके रिलीज से पहले ही फिल्म का वीडियो लीक हो गया है। लीक हुए इस वीडियो में रणवीर सिंह बेहद खतरनाक अवतार में नजर आ रहे हैं। लीक वीडियो में रणवीर अलाद्दीन खिलजी के क्रूर अवतार में दिख रहे हैं। रणवीर का ये अवतार इतना भयानक है कि इसे देख कई लोग कांप उठेंगे।

वीडियो में रणवीर सिंह कहते हुए दिख रहे है कि, ‘हम खिलजियों ने साथ मिलकर एक ही ख्वाब देखा था कि एक दिन हमारा परचम सारे जहां में लहरायेगा।’ इस वीडियो को देखने के बाद आप भी रणवीर सिंह की मेहनत को सलाम जरूर करने लगेंगे। देखें वो लीक वीडियो…

इस वीडियो को ट्विटर पर राहुल राउत नाम के एक यूजर ने ट्वीट किया है। इसके अलावा भी राहुल ने एक और वीडियो शेयर किया जिसमें दीपिका पादुकोण रानी पद्मिनी के किरदार में बेहद सुंदर नजर आ रही हैं। इस वीडियो में भी एक डायलॉग है जो रानी पद्मिनी का है। इस वीडियो में रानी पद्मिनी खिलजी को छत्राणी ताकत दिखाने की बातें करते नजर आ रही हैं।

लीक वीडियो में रानी पद्मिनी का डायलॉग है कि असुरों का विनाश करने के लिए देवी को भी गढ़ से उतरना पड़ा था। चित्तौड़ के आंगन में एक और लड़ाई होगी जो न कभी किसी ने देखी न सुनी होगी। और वो लड़ाई हम छत्राणियां लड़ेंगी और ये ही अलाउद्दीन खिलजी के जीवन की सबसे बड़ी हार होगी। डर नाम का गहना कभी पद्मावती ने पहना ही नहीं। लीक हुए वीडियो में कई ऐसे सीन है तो आपको इस फिल्म को देखने के लिए सिनेमाघरों की ओर खीचेंगे। वीडियो से ही फिल्म की भव्यता का अंदाजा आसानी से लगाया जा सकता है।

त्या एका झाडामुळे झाला यवतमाळ येथील शेतकरी रातोरात करोडपती…

झाड हे देव आहे असे जुने लोक सांगतात. आणि याची प्रचीती सध्या आली आहे. पूर्वजांनी लावलेले असेच एक झाड देवाच्या रूपाने अवतरले आहे. आत्महत्या आणि दुष्काळ यामध्ये विदर्भातील शेतकरी होरपळून गेला आहे. परंतु पंजाबराव शिंदे हर्षी ता.पुसद जिल्हा. यवतमाळ येथील शेतकरी रातोरात एका झाडामुळे कसा करोडपती झाला आज खासरेवर बघूया..

लालूप्रसाद यादव याच्या कार्यकाळात २००७ मध्ये वर्धा-नांदेड़ हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला. तब्बल १० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाचे काम प्रगती पथावर आहे. भुसंपादनाचे काम सुरु असताना कर्मचारी व अधिकाऱ्यांचे एक वृक्षाने लक्ष वेधून घेतले. रक्तचंदनाचे झाड असल्याचे सांगण्यात आले. सदर रेल्वे मार्ग हा पुसद येथील शेतकरी पंजाबराव शिंदे यांच्या शेतातुन जात असल्याने शिंदे हे करोडपती होणार आहे. हे झाड साधेसुधे नव्हे तर हे झाड आहे रक्तचंदनाचे. त्यानंही अनेक वर्ष कल्पना न्हवती कि त्याच्या शेतातील पूर्वजाने लावलेले हे झाड रक्तचंदनाचे आहे. या झाडाला अंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कोट्यावधि रुपयांची किंमत आहे. सदर झाड हे रक्त चंदनाचे आहे किंवा नाही ह्याची पड़ताळनी करण्यासाठी जिल्हा स्तरीय समितीमार्फ़त या झाडाचे नमूने घेऊन प्रयोगशाळेत पाठविन्यात आले आहे.

रक्तचंदनाचे झाड महाराष्ट्रात आढळत नाही परंतु आंध्रप्रदेशात रक्तचंदन आढळते. त्यामुळे या झाडाची खात्री करण्यासाठी अहवाल पाठविण्यात आला होता. सदर झाडाचे वजन अर्धा टन आहे. बाजारपेठेत रक्तचंदन मोठ्या किंमतीला विकले जाते. अभावाने दिसणारा रक्तचंदनाचा वृक्ष पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रक्तचंदनाला मोठी मागणी असून त्याला भरपूर किमत येत असल्याचे सांगितले. सुरक्षेसाठी उपाय योजना बहुमूल्य रक्तचंदनाचे झाड कोणी तोडून नेऊ नये म्हणून शेतकरी पंजाबराव शिंदे यांनी सुरक्षेच्या उपाय योजना केल्या आहे. तसेच या झाडापासून आपल्याला आर्थिक प्राप्ती होईल असेही त्यांनी सांगितले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
बापरे बाप हा साप विकल्या जातो ५० लाखाला, वाचा काय आहे सत्य?