सुदर्शनने हिंमत दाखवली, प्रशासन कधी दाखवणार ?

उंची 6 फूट, पिळदार शरीरयष्टी, बोलण्यात गोडवा, चेहऱ्यावर सतत स्मित हास्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा म्हणजे मंबई पोलीस दलातला कॉस्टेबल सुदर्शन शिंदे. वेळ कुठलीही असो, सुदर्शन ड्युटीवर असोत किंवा नसोत, अडचणीत सापडलेल्यांना मदत करायला हे नेहमी सज्ज असतात.

सुदर्शन यांचा सुरुवातीपासूनचा हाच स्वभाव आणि म्हणूनच सुदर्शननं कमला मिल कपाऊंडच्या आगीत झेप घेऊन मृत आणि जखमींना बाहेर काढलं. खरं तर या आगीत सुदर्शन यांच्या जीवाला धोका होता. पण समाजसेवी वृत्ती अंगात भिनलेले आणि या समाजाचे आपण देणं लागतो, ही भावना मनात रुजलेली असल्याने, सुदर्शन आगीच्या धुरात घुसले आणि त्यांनी काही लाख मोलाचे जीव वाचवले.

मुंबई पोलिसांच्या र्शौर्याची गाथा आपण ऐकलीच असेल. त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या बातम्याही तितक्याच गाजल्यालेल्या ऐकल्या असतील, पण सुदर्शनसारखे कॉस्टेबल पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचे काम करतात. खरं तर कौतुक त्या फोटो काढणाऱ्याचं करायला हवं, ज्यानं आज मुंबई पोलिसांना नावं ठेवणाऱ्या लोकांची तोंडं बंद केली. जे लोक कर्तव्य बजावणा-या पोलीसांवर बात उचलतात आज सुदर्शनचा हा फ़ोटो पाहुन लाज वाटली असेल कारण वेळ कोणावर आणि कधी येईल हे सांगता येत नाही पण जेव्हा येईल तेव्हा पोलीस अशा लोकांनाच खांद्यावर धेतील, कारण यांच्या धर्माचा रंग फक्त खाकी आहे

पोलिस दलात काम करताना सुदर्शन यांची शोर्य दाखवण्यीची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही वरळी सीफेसवर बुडणाऱ्या युवकाला सुदर्शन यांनी मदतीचा हात दिला होता. वरळी सी फेसवर आपलं कर्तव्य बजावत असताना एक युवक पाण्यात बुडत असल्याचं त्याच्या कानावर आलं आणि क्षणाचाही विलंब न करता सुदर्शननं वर्दी काढली आणि समुद्रात झेप घेत तरुणाचे प्राण वाचवले होते. त्यावेळीही सुदर्शन याचं सर्वच स्तरावरून कौतुक झालं होतं. टीव्हीवर मुलाखती आल्या होत्या. पण शासनाकडून ज्या पद्धतीनं दखल घ्यायला पाहिजे होती, त्यापद्धतीनं कौतुक केलं गेलं नाही. जेव्हा असे शौर्य दाखवणाऱ्या हिम्मतवान पोलीसांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडते, तेव्हा या शूरवीरांमध्ये दहा हत्तीचं बळ मिळतं. सुदर्शनालाही बळ नक्कीच मिळेल अशी आशा आहे. पण हा सन्मान योग्य वेळी
होणे गरजेचे आहे. सुदर्शनसारखे अनेक हिम्मतवान लोक पोलीस दलात आहे. सुदर्शनाचा झालेला योग्य सन्मान युवकांसाठी आणि पोलीस दलासाठी

प्रेरणा देणारा असेल. सुदर्शन शिंदे यांनी आपली हिंमत दाखवून स्वत:ची नाही तर, पोलीस दलाची छाती अभिमानाने फुगवली आहे. आता वेळ आहे ती प्रशासनाची.

वरळीच्या पोलीस दलाच्या इतिहासावर नजर टाकली तर दोन पोलीस जवांनाना आपलं कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं आहे, एक म्हणजे कसाबला पकडणारे शहीद तुकाराम ओंबळे आणि दुसरे म्हणजे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या युवकांवर कारवाई करताना वीरमरण आलेले शहीद विलास शिंदे, सुदर्शन शिंदे याच वरळीच्या मातीतले आहेत.

नक्कीच स्वताच्या कामगिरीने ते पोलीस दलाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरतील यांत शंका नाही

एक सलाम मुंबई पोलिसला
।। जय हिंद।।

वैभव परब
9870993080

जाणून घ्या बॅटवर स्टीकर लावण्याचे किती पैसे घेतात स्टार क्रिकेटर ?

क्रिकेट मध्ये व्यावसायीकरण मोठ्या प्रमाणात आहे आणि हा प्रचंड लोकप्रियतेचा खेळ बनलेला आहे. परंतु आपण कधी विचार केला का कि एक क्रिकेटर एक वर्षात किती कमाई करतो. यांचे आकडे आहे करोडोत हे सर्वाना माहित आहे. BCCI कडून मिळणारी फी तर तुम्हाला माहितीच आहे. परंतु मोठमोठ्या ब्रॅडची जाहिरात करून सुध्दा क्रिकेटर फीपेक्षा अधिक पैसा कमवितात. खेळाडूची लोकप्रियता बघून मोठ मोठ्या कंपनी त्यांच्या सोबत करार करतात. जेव्हा ते मैदानात उतरणार तेव्हा त्यांच्या बॅटवर कंपनीचे स्टीकर लावून तर प्रचार करायचा. रन सोबत पैश्याचाही पाउस पाडायचा असतो त्यांना आज खासरेवर बघूया कोण खेळाडू आपल्या बॅटवर स्टीकर लावायचे किती पैसे घेतो…

एम एस धोनी
सर्व जाहिरातदारांची दोन नंबरची पसंद आहे एम एस धोनी, धोनीच्या अगोदर सर्वात लोकप्रिय विराट कोहली हा आहे. धोनीची एका स्पोर्ट कंपनी सोबत डील झालेली आहे. धोनीच्या बॅटवर स्पार्टन या कंपनीचे स्टीकर आहे. तो हे स्टीकर लावण्याकरिता ६ करोड रुपये एवढी रक्कम घेतो.
शिखर धवन
भारतीय क्रिकेट संघाचा गब्बरसिंघ उर्फ शिखर धवन यांची MRF सोबत डील झालेली आहे आणि याच बॅटने तो रनसोबत पैसा हि कमावतो. तो आपल्या बॅटवर MRFचे स्टीकर लावायचे ३ करोड रुपये घेतो.

रोहित शर्मा
भारतीय टीमचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याची २०१५ साली CEAT सोबत डील झालेली आहे. रोहित आपल्या बॅटवर CEAT या प्रसिध्द कंपनीचे स्टीकर लावतो त्याला याकरिता कंपनीतर्फे ३ करोड रुपये मिळतात. परंतु रोहित शर्माचा सध्याचा फॉर्मबघता त्याची रक्कम वाढणार हे नक्की आहे.
युवराज सिंघ
युवराज सिंघ आपल्या बॅटवर प्युमाचे स्टीकर लावतो. प्युमा हि नामांकित स्पोर्ट कंपनी आहे. या करिता युवराजला तब्बल ४ करोड रुपये मिळतात. या सोबतच ते प्युमाचा शूज आणि व्रीस्टबैडची देखील जाहिरात करतो.

विराट कोहली
सर्वाना उस्तुकता असेल कि विराट कोहली किती रक्कम घेतो त्याच्या या डील करिता. विराटचे स्टार देखील यशाच्या शिखरावर आहे. त्याची MRF सोबत १०० करोडची डील झालेली आहे. विराट कोहलीची किंमत सध्या २०१७मध्ये सर्वात जास्त आहे.
क्रिस गेल
क्रिस गेल देखील धडाकेबाज फलंदाज आहे क्रिस गेलचा करार स्पार्टन या कंपनी सोबत झालेला आहे त्याला या डीलनुसार स्टीकर करिता ३ करोड रुपये मिळतात.

एबी डी विलियर्स
दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डी विलियर्स चा करार MRF कंपनी सोबत झालेला आहे. त्याला या करारानुसार ४ ते ४.५ करोड रुपये मिळतात.
अश्या पद्धतीने सर्व फलंदाज आपल्या बॅटने फक्त रनच नाहीतर पैश्याचा पाउस देखील पाडतात. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

भारतीय सैनिकाने पाकिस्तानच्या सैनिकाला कुत्र्यागत हाणलं, व्हिडीओ झालाय प्रचंड वायरल…

देशाच्या विभाजनानंतर भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे कट्टर दुष्मन बनत गेले. विभाजनापासूनची ही दुष्मनी कधी कमी झालीच नाही फक्त तणाव मात्र कधी प्रचंड वाढतो तर कधी कमी होतो. पण देशवासियांच्या मनात जी दुष्मनी आहे ती कमी होण्याचे नाव घेत नाही. पाकिस्तान सुद्धा अनेक अशा हरकती करतो ज्यामुळे भारतीयांच्या मनात असलेला राग वाढतच जातो. उरी हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये पाकिस्तान विरुद्ध प्रंचड राग आहे. आणि भारतीय सैनिकांनी पाकिस्तान मध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तान सुद्धा खुप दहशतीखाली आहे. पाकिस्तान सुद्धा आता समजला आहे की भारतीय सेना आता आपल्याला जशास तसे उत्तर देण्यास सज्ज झालेली आहे.

बाप बाप असतो आणि मुलगा मुलगा-

आज आपण एक दिवस असा वायरल व्हिडीओ बघणार आहोत हो पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल खरच बाप बाप असतो आणि मुलगा मुलगाच. हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच वायरल झाला आहे. भारतीयांनी खूप शेअर करून हा व्हिडीओ सर्वत्र पोहचवला आहे. हा व्हिडिओ तसा भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असणारा आहे. या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे भारतीय सीआरपीएफ जवानांने पाकीस्तानच्या एका सैनिकाला कुत्र्यागत हाणला आहे. ही पूर्ण घटना आहे हुसैनिवाल बोर्डरची. जिथे क्लोजिंग सेरेमनी दरम्यान दोन्ही देशातील सैनिक हे झेंडा घेऊन एकत्र उभा होते. याच दरम्यान पाकीस्तानच्या सैनिकाने भारतीय जवानाला धक्का देऊन मोठी चूक केली.

भारतीय सैनिकाने पाकिस्तानच्या त्या सैनिकाला या चुकीसाठी असी काही अद्दल घडवली की पूर्ण पाकिस्तान हा व्हिडीओ बघुन घाबरून जाईल. एका धक्क्याच्या बदल्यात भारतीय जवानाने पाकिस्तानी सैनिकावर लाथा बुक्याची बरसात सुरू केली. पाकिस्तानी सैनिक सांभाळायच्या आतच अधिकारी मध्ये बचाव करू लागले आणि भांडण सोडवलं. काही ही झालं तर शेवटी या घटनेने पाकिस्तानला हा संदेश मिळाला की भारत आता पाकिस्तानला त्यांची औकात दाखवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मागे सरकणार नाही.

बघा कसा धो धो धुतला पाकिस्तानी सैनिक या भारतीय सैनिकाने-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
शाहिद होण्यापूर्वी मेजर प्रफुल्ल यांच्या वायरल झालेल्या व्हीडीओची धक्कादायक सत्यता

शाहिद होण्यापूर्वी मेजर प्रफुल्ल यांच्या वायरल झालेल्या व्हीडीओची धक्कादायक सत्यता

सोशल मीडिया आपली भूमिका किंवा माहिती अगदी कमी वेळात पूर्ण जगासमोर मांडायचं साधन बनला आहे. परंतु काही लोकं याचा उपयोग फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आणि अफवा पसरवण्यासाठी करत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. ताजी गोष्ट म्हणजे शनिवारी जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकने शास्त्रसंधी करून केलेल्या गोळीबारात शहिद झालेले मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचा एक शहिद होण्यापूर्वीचा शेवटचे क्षण म्हणून व्हिडीओ वायरल होत आहे.

या व्हिडीओ मध्ये तुम्ही बघू शकता की कथितरित्या मेजर प्रफुल्ल जखमी असताना सुद्धा शत्रूवर हल्ला करण्याच्या सूचना आपल्या सहकाऱ्यांना देत आहेत आणि आपल्या तुकडीला सुद्धा तिथून सुरक्षित बाहेर काढण्यास सांगत आहेत. परंतु या व्हिडिओची सत्यता ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही या व्हिडीओ मध्ये बघू शकता की जखमी असताना सुद्धा मेजर प्रफुल्ल सहकाऱ्यांना सुरक्षित बाहेर पडण्याच्या सूचना देत आहेत. व्हिडीओ मध्ये मेजर प्रफुल्ल यांचे इतर सहकारी त्यांना आराम करण्यास आणि शांत राहण्यास सांगत आहेत. पण यानंतरही मेजर प्रफुल्ल त्यांना विरोधी शत्रूवर हल्ला चढवण्याच्या सूचना देताना दिसत आहेत.

सोबतच या व्हिडीओच्या शेवटी मेजर प्रफुल्ल आपल्या सहकाऱ्यांना आग लावण्यास सांगत आहेत जेणेकरून हेलिकॉप्टर त्यांना बघू शकेल. परंतु धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडिओ फेक असल्याचे समोर आले आहे. तुम्ही बातम्या बघितल्या असतील की मेजर प्रफुल्ल शनिवारी शहीद झाले आहेत पण हा व्हिडीओ युट्युबवर तब्बल सात वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आलेला आहे.

याशिवाय हा व्हिडीओ खोटा असण्याचा दुसरा पुरावा म्हणजे याला जानेवारी 2017 मध्ये एका सीआरपीएफने ऑफिशियल ट्विटर हँडल वर ट्विट करून सांगितले होते की हा व्हिडीओ 8 जून 2009 चा आहे.

मेजर प्रफुल्ल यांचे नाव या व्हिडीओ सोबत कसे जोडले जाणून घेऊया. काही दिवसांपूर्वी माजी सेना प्रमुख जनरल व्हीके सिंह यांनी फेसबुक पोस्टवर व्हिडीओ शेअर करत भारतीय सैन्याच्या युवा सैनिकांचे कौतुक केलं होतं.

लोकांनी व्हीके सिंह यांच्या या पोस्टला मेजर प्रफुल्ल यांच्या सोबत जोडून व्हिडीओ वायरल करण्यास सुरुवात केली. या पोस्टद्वारे तुम्हाला या व्हीडीओची सत्यता करावी हा उद्देश आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

हमालाचा मुलगा ते महाराष्ट्र केसरीचा उपविजेता किरण भगत

महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या अंतिम सामन्यानंतर उपविजेता ठरलेल्या किरण भगत ने सर्व महाराष्ट्रातील जनतेचे हृदय जिंकले.तो जरी महाराष्ट्र केसरी झाला नाही पण महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी तोच आहे.

किरण भगत हा अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगा मोहेगाव जिल्हा सातारा हे त्याचे गाव वडील मुंबई मध्ये हमालीचे काम करतात. किरण ला एक भाऊ आहे तो सैन्यात आहे. किरणच्या वडिलांची इच्छा होती की दोन मुलांपैकी एकाने कुस्ती करावी.किरण ची ओढ कुस्तीकडे दिसल्याने वडिलांनी त्याला आटपाडी येथील नामदेव बडरे यांच्या तालमीत टाकले.तिथे किरण चे कुस्तीचे प्राथमिक शिक्षण झाले. या तालमीत पाया पक्का केल्यानंतर त्याला पुढे कुस्ती शिकण्यासाठी पुणे येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात अर्जुनवीर काका पवार यांच्या कात्रज येथील तालमीत प्रवेश घेतला.

वयाच्या 15 व्या वर्षी किरण पुणे येथील काका पवार यांच्या तालमीत जॉईन झाला. तिथे त्याने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली. किरणच्या वडिलांनी हमाली केली लोकांची ओझी वाहून आपल्या मुलाच्या कुस्तीच्या शिक्षणासाठी पैसे पाठवले. आपल्या मुलाला त्यांनी काहीच कमी पडू दिले नाही. किरणनेही वडिलांच्या विश्वासाला कुठेही खाली पडू दिले नाही प्रचंड मेहनत घेऊन त्याने आज मोठे यश मिळवले.
महाराष्ट्रात सोबतच किरण ने आपले नाव देशभर गाजवले आहे. हरियाणा पंजाब मधील अनेक कुस्त्यांचे मैदाने किरण ने मारली आहेत. महाराष्ट्रातही किरण ने शेकडो मैदाने मारली आहेत. किरण चा स्वभाव अत्यंत शांत आणि संयमी आहे.

महाराष्ट्र केसरी च्या स्पर्धेत किरणने माती मधील कुस्ती खेळत दमदार कामगिरी केली. त्याने अंतिम सामान्यांपर्यंत मजल मारली. किरणच्या खेळाने संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती प्रेक्षकांच्या मनात त्याने घर केले. अंतिम सामन्यात त्याच्या हाताला दुखापत झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात एक आपल्या घरातीलच व्यक्तीला दुखापत झाली अशी भावना तयार झाली होती.

अंतिम सामना जरी अभिजित कटके यांनी जिंकला असला तरी खऱ्या अर्थाने कुस्ती प्रेक्षकांच्या मनातील किरण भगत हा महाराष्ट्र केसरी ठरला. सामना जरी अभिजित कटके यांनी जिंकला असला तरी लोकांची मने मात्र किरण भगत यांनी जिंकली.
किरणच्या पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा !!

आपल्याला ही माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका..

नांदेड येथील २२ वर्षिय आयपीएस अधिकाऱ्याच्या वायरल फोटोची सत्यता नक्की वाचा…

सोशल मीडिया जेवढा मोठा आणि वेगवान माहिती पोहचवण्याचे साधन बनला आहे तितकाच मोठा हा फेक न्यूज पसरवण्याचे सुद्धा साधन बनला आहे. कोणत्याही फेक माहितीचा जन्म जास्तीतजास्त वेळा सोशल मीडियावर होत असल्याचं निष्पन्न होतं. यावेळी फेक न्यूजचे शिकार बनले आहेत नुकतेच आयपीएस झालेले नुरुल हसन.

महाराष्ट्र केडरचे नुरुल हुसेन यांच्या वयाविषयी सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवली जात आहे. २२ व्या वर्षी आयपीएस बनून ते सर्वात तरुण आयपीएस अधिकारी बनल्याची खोटी माहिती सर्व महाराष्ट्रात वेगाने पसरली. एका नामांकित वेबसाईटने याविषयी बातमी दिली त्यानंतर ही माहिती व्हाट्सएप आणि फेसबुकवर प्रचंड वायरल झाली. परंतु नंतर स्वतः नुरुल हसन यांनी आपल्या फेसबुकवर याविषयी पोस्ट टाकून याचे खंडन केले आणि ती सर्वात तरुण आयपीएस बनल्याची माहिती फेक असल्याचे सांगितले.

नुरुलने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘मागच्या तीन दिवसात अनेक लोक मला सिव्हिल सर्व्हिसेस आणि माझ्या वयाविषयी माहिती विचारत आहेत. व्हाट्सएपवर खोटी माहिती पसरवली जात आहे. ज्यामध्ये दावा केला जातोय की माझं वय २२ वर्षे आहे आणि मी सर्वात युवा आयपीएस आहे. माझे वय यापेक्षा खूप जास्त आहे.’

नुरुलच्या मतेत्यांचे वय २८ वर्षे आहे. बरेलीचे असलेले नुरुल यांनी २०१५ मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस ची परीक्षा पास केली होती. याच्या अगोदर त्यांनी एएमयू मधून इंजिनिअरिंग केली आणि ४ वर्षे नोकरी केली होती. आयपीएस मध्ये त्यांना महाराष्ट्र केडर मिळालं आहे आणि नांदेडमध्ये त्यांना सहायक पोलीस अधिक्षक म्हणून पहिलं पोस्टींग मिळालं आहे.

सर्वाना यानिमित्ताने आवाहन आहे की सोशल मीडियावर कधीही कोणती माहिती पुढे पाठवण्याच्या अगोदर त्याची खात्री करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून सोशल मीडियावर अफवा पसरल्या जाणार नाहीत. ही माहिती जास्तीत जास्त शेअर करून सर्वात तरुण आयपीएस बद्दलचे सत्य जास्त लोकांपर्यंत पोहचवा आणि आमचे फेसबुक पेज अवश्य लाईक करा…
अधिक वाचा: मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वेची कहाणी…

कस्टमरनी वेश्यांकडे केलेल्या अशा काही मागण्या ज्या ऐकून त्यांना फुटला घाम…

वेश्यांच्या जीवनाविषयी हजारो तथ्य आपल्या समोर येत असतात. वेश्यावृत्ती अशी जागा आहे जिथे एकदा गेलं की बाहेर पडणे खूपच कठीण काम आहे. मुली इथे 14, 15 किंवा 16 वर्षाच्या असताना येतात आणि आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे इथं घालून त्या वृद्ध होईपर्यंत इथेच राहतात. हे एक असं दलदल मध्ये असं फसतात की येथून निघणे अशक्य होते. नेहमी बघितलं जातं की वेश्या व्यवसायात मुलींना कमी वयातच पाठवले जाते. सामान्यतः मुलींना 12 ते 14 वर्षे वय असतानाच या धंद्यात पाठवले जाते.

एका वेश्या तीचं आयुष्य कस जगते हे कळल्यावर तुमच्या सुद्धा डोळयातून पाणी येईल. आज आम्ही या चिखलात फसलेल्या काही वेश्यांचे अनुभव तुम्हाला सांगणार आहोत. आज आपण जाणून घेऊया कस्टमर त्यांच्याकडे कशा कशा प्रकारच्या मागण्या करतात. जगापासून वेगळे झालेल्या या मुलींसाठी कस्टमरच सर्व काही असतो. यांचे जीवनच कस्टमरवर अवलंबून असते. त्यामुळे वेश्या कस्टमरची प्रत्येक गोष्ट ऐकण्यास मजबूर असतात. आज आपण बोलत आहोत वेश्या वस्त्यांमध्ये येणाऱ्या कस्टमरच्या या वेश्या समोर ठेवलेल्या काही विचित्र मागण्याविषयी.

कस्टमर या मुलींसामोर कधी कधी अशा मागण्या ठेवतात की त्यांना त्या बिलकुल करू वाटत नाहीत. तुम्हीही या कस्टमरच्या विचित्र मागण्या ऐकून थक्क व्हाल. वेश्या व्यवसायात असणाऱ्या एका मुलीने आपल्याला झालेला त्रास शेअर करताना सांगितले की बरेचदा तिला एक कस्टमर ग्लासमध्ये लघवी करण्यास सांगत होता आणि त्या कामासाठी तिला तो 13 हजार रुपये द्यायचा. एका अन्य सेक्स वर्करने सांगितले की त्यांच्या इथे एक कस्टमर येतो जो सात मुलींना नग्न करून त्यांचं तोंड भिंतीकडे करून हस्तमैथुन करतो.

अजून एका सेक्स वर्करने खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली, त्यांच्याकडे एक असा कस्टमर येतो जो नकली गनफाइट करायचे पूर्ण पैसे देतो. हा कस्टमर नकली बंदुकीने एक दुसऱ्यावर फायरिंग करून एकमेकांना शिव्या देण्यास सांगतो. एका दुसऱ्या सेक्स वर्करने सांगितलं की तिचा एक कस्टमर तिला आपली आई बनण्यास सांगतो आणि लहान मुलांप्रमाणे रुममधे धावतो.

एका अन्य कस्टमरने एका सेक्स वर्करला कॉंबेट बूट घालून कविता म्हणण्यास सांगितली होती. खरंतर तुम्हाला हे वाचून विचित्र वाचेल पण एका सेक्स वर्कर साठी रोज अशा विविध विचित्र डिमांड पूर्ण कराव्या लागतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

मुकेश-नीता अंबानी आपल्या मुलांना किती पॉकेट मनी द्यायचे, वाचून आश्चर्याचा धक्का बसेल…

मुकेश अंबानी हे भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती व सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. एवढेच नव्हे तर मुकेश हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून सुद्धा ओळखले जातात. मुकेश अंबानी हे नेहमीच आपल्या रॉयल लाईफमुळे आणि वेगवेगळ्या बिझनेसमुळे चर्चेत राहतात. नीता यांनी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्या आयपीएल आणि विविध सामाजिक कामांमुळे नेहमी चर्चेत असतात.

नेहमी लाईमलाईट मध्ये असणारे मुकेश आणि नीता अंबानी यांच्या विरुद्ध त्यांच्या मुलांचं आहे. ते नेहमी लाईमलाईट पासून दूर राहणे पसंत करतात. मोजक्याच वेळी कॅमेऱ्यासमोर ते नजरेस पडतात. नीता आणि मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाविषयी जाणून घेणे भारतीयांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. त्यांच्या घराविषयी, गाड्यांविषयी जाणून घेणे भारतीय पसंत करतात. अजून एक प्रश्न भारतीयांच्या मनात येतो, तो म्हणजे एवढे श्रीमंत व्यक्ती आपल्या मुलांना पॉकेट मनी किती देत असतील. तुम्हाला माहिती आहे का मुकेश अंबानींच्या तीन मुलांचा(अनंत, आकाश आणि इशा) महिन्याचा पॉकेटमनी किती असेल? जेव्हा ते शाळेत जायचे तेव्हा त्यांना किती पॉकेटमनी मिळायला. याचं रहस्य खुद्द नीता अंबानी यांनी एका मुलाखतीदरम्यान खोलले होते.

Idiva ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नीता अंबानी यांनी मुलांबाबत एम किस्सा सांगितला होता. नीता यांनी सांगितले की मुले जेव्हा शाळेत जायची तेव्हा त्यांना मी पॉकेटमनी म्हणून फक्त 5 रुपये द्यायची. यामागे खूप मोठं कारण असल्याचं त्यांनी सांगितले. मुकेश यांनी आपल्या वडिलांकडून कमी पैशात सर्व कसे मॅनेज करायचे याचे धडे घेतले होते. मुकेश यांनी पैशाची बचत कशी करावी याची शिकवण धीरूभाई अंबानी यांच्याकडून घेतली होती. हीच शिकवण मुलांनाही द्यावी म्हणून ते प्रयत्न करत असत. मुकेश याना यामुळेच यश मिळाल्याचे नीता यांनी सांगितले. मुलांना लहानपणी आपण खूप श्रीमंत आहोत हे जाणवू द्यायचे नाही हा एक हेतू त्यांचा यामागे होता. नीता या त्यांना फक्त दर शुक्रवारी 5 रुपये द्यायच्या ज्याद्वारे मुलं कॅन्टीनमध्ये स्नॅक्स खात असत. इतर मुले मात्र त्यांना यावरून सारखं चिडवत असत.

आकाश, अनंत आणि इशाचे शिक्षण मुकेश नीता यांच्याच मालकीच्या शाळेत झाले. नीता यांची बहिन या शाळेत मुख्याध्यापिका असल्याने त्यांच्यावर नकळत विशेष लक्ष ठेवले गेले. नीता यांनीही मुलांवर वयक्तिक लक्ष ठेवून त्यांना चांगले संस्कार दिले.

अजून एक आश्चर्याची बाब म्हणजे मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलं कारने नव्हे तर चक्क पब्लिक ट्रान्सपोर्टने शाळेत जायचे. एव्हड्या मोठ्या जगातील दिगग्ज उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांची मुलं महागड्या कारने शाळेत जात असतील असे वाटणे साहजिक आहे पण याविपरित होतं. नीता अंबानी यासुद्धा त्यांच्या शाळा कॉलेजच्या जीवनात बेस्ट बसमधून जात असत. हेच संस्कार त्यांनी आपल्या मुलांमध्ये उतरवले आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

मातोश्रीवर नमाज पढणारा तो कोण होता?

कालच ‘ठाकरे‘ चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला, त्यात एक मुस्लिम व्यक्ती बाळासाहेबांपुढे नमाज पढताना दाखवली गेली. यात बाळासाहेबांपुढे नमाज पढत असलेली व्यक्ती दुसरी कोणी नसून त्यांचे नाव आहे मेहमूद शेख, वाचा नक्की काय घडले होते…

मेहमूद शेख नावाचे व्यावसाईक काही कामा निमित्त मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी “मातोश्री” वर गेले होते, त्यांचे काम खूप महत्वाचे होते. कारण त्यांच्या कोणत्या तरी जवळच्या नातेवाईकाचे काहीतरी शस्त्रक्रिया की काय ते करायचे होते आणि साहेबांकडे मदत मागायला गेले होते. तेव्हा त्या डॉक्टरांना बाळासाहेबांनी मातोश्री वर बोलावणे धाडले. तेवढ्यातच नमाजाची वेळ झाली, मेहमूद शेख यांच्या चेहर्यावर दिसत होते कि त्यांना कुठे तरी जायचे आहे. त्यांच्या मनात चलबिचल चालू होती,तेव्हा साहेबांनी विचारले,काय रे? काय झाले ??

तेव्हा मेहमूद शेख म्हणाले ‘काही नाही साहेब’…! साहेब म्हणाले बोल रे, का इतका विचारात पडलास? तर दचकत दचकत ते म्हणाले साहेब ‘नमाजाची’ वेळ झाली, पटकन जाऊन येऊ का? साहेब म्हणाले, अरे त्या डॉक्टरांना बोलावले आहे….. त्यांची तुझी चुकामुक व्हायला नको. साहेब म्हणाले ‘एक काम कर, तू आत मध्ये जाऊन नमाज पड’. देवाला प्रार्थना कुठूनही करा श्रद्धा पाहिजे, ती पोहचते. साहेबांनी त्यांच्या एका खोलीत जागा साफ करण्यास सांगितले. शेखचे डोळेच चक्रावले, नमाज आणि ‘मातोश्री’ मध्ये ? विश्वास बसत नव्हता त्यांना.त्यांना राहवले नाही, त्यांनी साहेबांना विचारले कि साहेब तुम्ही तर कट्टर ‘हिंदुत्ववादी‘…. मग हे कसे ? तेव्हा साहेब उत्तरले, मी कट्टर #हिंदुत्ववादीच आहे पण तुझ्यासारख्या #राष्ट्रप्रेमी मुसलमानाला मी कधीच विरोध केला नाही. माझा #साबीर_शेख #शिवसेनेच्या सरकार मध्ये मंत्री होता, कारण तो ‘राष्ट्रप्रेमी’ होता.

पाकिस्तान-प्रेमी देशद्रोही मुसलमांना मी लाथा घालणारच आणि ते मी वेळो वेळी दाखवून दिले आहे. राहिली गोष्ट नमाजाची, तर हि तुझी श्रद्धा आहे. ‘मातोश्री‘ मध्ये नमाज पडून, ‘मातोश्री‘ काय अपवित्र झाली नाही आणि ‘मातोश्री’ मध्ये नमाज पडलास म्हणून ते ‘अल्ला‘ पर्यंत पोहचले नाही असे नाही. फक्त ‘राष्ट्प्रेमी‘ राहा, हिंदूंशी प्रेमाने राहा. कुठेही आम्ही ताकदवान आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका. माझा कुठल्याही धर्माला विरोध नाही, मी माणुसकी मानतो. हे आम्हाला महाराजांनी शिकवलंय. मेहमूद शेख यांना गहिवरून आले त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी साहेबांचे #चरण स्पर्श केले.

साभार – अनिल गुडेवार

शिवरायांच्या इतिहासातील दुर्लक्षित व्यक्तिरेखा…

छत्रपती शिवरायांच्या युद्ध, लढाया आणि गडकिल्ल्यांचा इतिहास आपण इयत्ता चौथीपासुन शिकत आलो आहोत. परंतु आजही अनेक शिवप्रेमींना महाराजांच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती नाही. त्या सर्वांसाठी महाराजांच्या कौटुंबिक जीवनाची थोडक्यात माहिती देण्याचा इथे प्रयत्न केला आहे.

स्वराज्यनिर्मिती कार्यात महाराष्ट्रातील वजनदार सरदारांची आपल्याला गरज भासणार आहे हे शहाजीराजे आणि आऊसाहेब जिजाऊ यांनी ओळखलं होतं. त्या मातब्बर सरदारांशी नाते जोडुनच त्यांना एकत्र आणता येईल या उद्देशाने त्यांनी शिवरायांचे आठ वेगवेगळ्या सरदारांच्या मुलींसोबत विवाह लावुन दिले. शहाजीराजे-जिजाऊंचा उद्देश सफल झाला आणि हे सरदार स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात सहभागी झाले. शिवरायांच्या या आठ पत्नी कोणत्या, त्यांच्यापासुन शिवरायांना झालेल्या मुले-मुली कोण हे जाणुन घेऊया…

शिवरायांच्या पत्नी
१) सईबाई – सईबाई या शिवरायांच्या प्रथम पत्नी असुन त्या सातारा जवळच्या फलटण येथील निंबाळकर घराण्यातील होत्या. मुधोजीराजे निंबाळकर हे त्यांचे वडील तर बजाजी निंबाळकर हे बंधु होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४० मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना चार अपत्ये झाली.त्यांचा मृत्यु ५ सप्टेंबर १६५७ रोजी राजगडावर झाला.
२) सगुणाबाई – सगुणाबाई या शिवरायांच्या द्वितीय पत्नी असुन त्या कोकणातील शृंगारपुर येथील शिर्के घराण्यातील होत्या. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४१ मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना एक अपत्य झाले.
३) सोयराबाई – सोयराबाई या शिवरायांच्या तृतीय पत्नी असुन त्या तळबीडच्या मोहिते घराण्यातील होत्या. संभाजी मोहिते हे त्यांचे वडील तर स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे त्यांचे बंधु होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६५० पुर्वी झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना दोन अपत्ये झाली. त्यांचा मृत्यु १६८१ च्या उत्तरार्धात रायगडावर झाला.
४) पुतळाबाई – पुतळाबाई या शिवरायांच्या चौथ्या पत्नी असुन त्या पालकर घराण्यातील होत्या. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६५३ मध्ये झाला. त्या निपुत्रीक असुन जुन १६८० मध्ये शिवरायांच्या निधनाने खचुन जाऊन रायगडावर त्यांचा मृत्यु झाला.
५) लक्ष्मीबाई – लक्ष्मीबाई या शिवरायांच्या पाचव्या पत्नी असुन त्या विचारे घराण्यातील होत्या. जावळीच्या गुप्त मोहिमेवर असताना १६५६ पुर्वी महाराजांशी त्यांचा विवाह झाल्याचे सांगितले जाते. त्या निपुत्रीक असुन त्यांचा मृत्यु १६७० मध्ये झाला.

शिवरायांचे कुटुंब – चित्रकार दिनेश कांची, पुणे.

६) सकवारबाई – सकवारबाई या शिवरायांच्या सहाव्या पत्नी असुन त्या गायकवाड घराण्यातील होत्या. शिवरायांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड हे त्यांचे बंधु होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६५७ मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना एक अपत्य झाले. त्यांचा मृत्यु १७०७ मध्ये झाला.
७) काशीबाई – काशीबाई या शिवरायांच्या सातव्या पत्नी असुन त्या सिंदखेडच्या जाधवराव घराण्यातील होत्या. जिजाऊंचे बंधु अचलोजी जाधवराव हे त्यांचे आजोबा तर संताजी जाधवराव हे त्यांचे वडील होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह एप्रिल १६५७ मध्ये झाला. त्या निपुत्रीक असुन त्यांचा मृत्यु १६७४ मध्ये झाला.
८) गुणवंताबाई – गुणवंताबाई या शिवरायांच्या आठव्या पत्नी असुन त्या विदर्भातील चिखलीच्या इंगळे घराण्यातील होत्या. सरदार शिवाजीराव इंगळे हे त्यांचे वडील होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह एप्रिल १६५७ मध्ये झाला. त्या निपुत्रीक असुन त्यांचा मृत्यु १६७० मध्ये झाला.
शिवरायांची अपत्ये
छत्रपती शिवाजी महाराजांना महाराणी सईबाई, सगुणाबाई, सोयराबाई आणि सकवारबाई या चार पत्नींपासुन सहा मुली आणि दोन मुले झाली. महाराणी पुतळाबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई आणि गुणवंताबाई या निपुत्रीक होत्या.

शिवरायांच्या मुली
१) सखुबाई – सईबाईंच्या पोटी जन्मलेल्या सखुबाईंचा विवाह फलटणच्या महादजी निंबाळकर यांच्यासोबत झाला. २) राणुबाई – सईबाईंच्या पोटी जन्मलेल्या राणुबाईंचा विवाह सिंदखेडराजा येथील अचलोजी जाधवराव यांच्यासोबत झाला. ३) अंबिकाबाई – सईबाईंच्या पोटी जन्मलेल्या अंबिकाबाई यांचा विवाह तारळे (सातारा) येथील हरजीराजे महाडिक यांच्यासोबत झाला. ४) राजकुंवरबाई उर्फ नानीबाई – सगुणाबाईंच्या पोटी जन्मलेल्या राजकुंवरबाई यांचा विवाह दाभोळच्या गणोजी शिर्के यांच्यासोबत झाला. ५) दिपाबाई उर्फ बाळीबाई – सोयराबाईंच्या पोटी जन्मलेल्या दिपाबाई यांचा विवाह विसाजी उर्फ विश्वासराव यांच्यासोबत झाला. ६) कमळाबाई – सकवारबाईंच्या पोटी जन्मलेल्या कमळाबाई यांचा विवाह नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी पालकर यांच्यासोबत झाला.

शिवरायांची मुले
१) संभाजी – सईबाईंच्या पोटी जन्मलेल्या संभाजी महाराजांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांची कन्या जिऊबाई उर्फ येसुबाई यांच्यासोबत झाला.
२) राजाराम – सोयराबाईंच्या पोटी जन्मलेल्या राजाराम महाराजांचा विवाह प्रतापराव गुजर यांची कन्या जानकीबाई, हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराराणी, कागलकर घाटगेंची कन्या जानकीबाई, अंबिकाबाई यांच्यासोबत झाला.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
ना अत्याधुनिक तंत्रज्ञान, ना इंजिनीअर; 350 वर्षांपूर्वीचा शिवकालीन पूल