चेंडू किंवा काळ्या ठिपक्यास टच केल्यास का होते whatsapp हँग वाचा कारण 0

whatsapp वर वेगवेगळ्या करामती येत असतात यापैकी सध्या एक मेसेज अत्यंत वायरल होत आहे. त्या मेसेज मध्ये चेंडूवर क्लिक केल्यास मोबाईल हँग होतो. हा प्रकार नवीन नाही आहे. whatapp वर किडा बॉम्ब इत्यादी मेसेज हेच काम करतात परंतु हे मेसेज कसे बनवले जातात आणि याचा काय फायदा या बद्दल आज आपण बघूया खासरे वर

तुम्हाला वाटेल कि चेंडू मध्ये किंवा एखाद्या काळ्या ठीपक्यात काही प्रॉब्लेम असेल परंतु तसे नाही आहे. आणि हा मेसेज तयार करणे हि अगदी सोपे आहे तुम्ही सुद्धा हे घरी बसून करू शकतात. या अगोदर एक तमिळ मेसेज असाच वायरल झाला होता त्याला क्लिक केल्यास आयफोन बंद पडत असे. हा चेंडू वाला मेसेज android मोबाईल बंद करत आहे. हा विषय html सोबत निगडीत आहे इंटरनेट वर अनेक वेबसाईट अश्या आहेत ज्या html चे रुपांतर text message मध्ये करता येऊ शकते. “‎ &rlm:” हे शब्द html मध्ये अनेक वेळेस लिहल्यास मोबाईल हँग होतो.

या प्रकारास Control character म्हणतात. या वेबसाईटवर उर्दू अथवा अश्या भाषेत वाक्य लिहल्या जाते ज्यामुळे मोबाईल बंद पडतो आणि हे text मध्ये convert केल्यामुळे आपल्याला हि वाक्य दिसत नाही. त्या एवजी आपल्याला एखादा दुसरा शब्द अथवा चिन्ह दिसतात. खाली दिलेल्या फोटो मध्ये आपण बघू शकता कि कश्या प्रकारे काळा ठिपका हा text मध्ये convert केलेला आहे.

अश्या मेसेज मुळे मोबाइलमध्ये वायरल वगैरे काही येत नाही परंतु या मेसेजवर क्लिक केल्यास आपले अप्लिकेशन नक्की बंद पडेल त्यामुळे हा मेसेज डीलेट केलेला बरा आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *